Skip to main content

मृत्यूपत्राविषयक माहिती

लेखक यशोधरा यांनी बुधवार, 29/12/2010 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
मला मृत्यूपत्राविषयक माहिती हवी आहे. सद्ध्याच काही वेब साईटस वर वा काही जणांशी बोलून मी जी माहिती गोळा केली ती परस्पर विरोधी वाटली. कोणाला खालील पैकी माहिती असल्यास इथे लिहाल का? १. मृत्यूपत्र रजिस्टर करावेच लागते का? २. मृत्यूपत्र रजिस्टर न केल्यास, ते व्हॅलिड धरले जात नाही का? ३. मृत्यूपत्र हे लीगल डॉक्यूमेंट असल्याने ते स्टॅम्प पेपर वर करुन नोटराईज वगैरे करावे लागते का? की साध्या पेपरवर केले तरी चालते? अजून काही ह्या विषयासंबंधी काही माहिती कोणाला असल्यास ती इथे लिहिण्याची विनंती. धन्यवाद.

वदनी कवळ घेता … पुंडलिक वरदा हरी विठ्ठल

लेखक खादाड अमिता यांनी बुधवार, 29/12/2010 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणापासूनची सवय : लग्नातल्या पंगतीत बसलं की फक्त ‘पुंडलिक वरदा’ म्हणेस्तोवर धीर धरायचा. एकदा त्या काकांचं ते जोरात म्हणून झालं की मग आपण जेवणावर अगदी अ‍ॅटॅक करायचा...!! एक मात्र आहे, की असं अन्नावर तुटून पडायला आधीच ठरवून ठेवावं लागतं. हल्ला आधी कश्यावर करायचा? जिलबी, लाडू, भजी, श्रीखंड, पुरी, पापड, मिरगुंड, आमटी, की उसळ? (अहो, लग्नात काय काय पक्वान्नं असतात ते आता मी तुम्हाला सांगायला नकोय ! उगीच यादी करता करता मलाच इथे भूक लागायची, काय?!) सांगण्याच तात्पर्य हे की मी जन्मापासूनच खादाड. हो हो..!! अगदी कुणाला पण विचारून बघा.

लझिझ बिर्यानि विथ चिकन बटर ग्रेवि...............

लेखक पियुशा यांनी बुधवार, 29/12/2010 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
बिर्याणी विथ बटर चिकन ग्रेवी बिर्याणी साठी : - अर्धा किलो तांदूळ ,अर्धा किलो चिकन , ३ चमचे दही ,तमालपत्र ,शहाजिरे ,दालचिनी , लवंग ,काळेमिरे,मोठा वेलदोडा , आल लसून पेस्ट २ चमचे , २ मोठे कांदे उभे चिरलेले ,२ मोठे टोमाटो चिरलेले ,.कोथिंबीर ,हिरवी मिरची ५-६ ,हळद ,मीठ .१-२ चमचे बिर्याणी मसाला ,१ चमचा लाल तिखट कृती :- तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा , चिकन मध्ये थोडेस दही ,हळद,आणि आल लसून पेस्ट घालून कुकरमध्ये एक शिट्टी काढून घ्या ,पाणी थोड जास्त अस

प्रॉव्हिडंट फंड : मदत हवी आहे

लेखक स्मिता. यांनी बुधवार, 29/12/2010 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! सध्या मी बंगलोर येथे आय. टी. क्षेत्रात काम करत असून आता नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता नंतर किमान २ वर्ष तरी माझा कोठेही, कोणत्याही प्रकारचे अर्थार्जन करण्याचा विचार नाही. या पार्श्वभुमीवर मला काही प्रश्न पडले आहेतः (ऑफिसमध्ये याबद्दल विचारले असता फंडातली रक्कम काढून घ्या असे तुटकपणे सांगून वाटेला लावले.) १. माझ्या प्रॉव्हिडंट फंड मध्ये जमलेली रक्कम मी काढून घ्यावी की तशीच राहू द्यावी? २. मी असेही ऐकले आहे की प्रॉव्हिडंट फंड असा मधेच काढून घेतला असता ३०% रक्कम कमी केली जाते. असे खरेच आहे का? ३.

मुलगी ही लायाबिलिटी ?

लेखक तिमा यांनी बुधवार, 29/12/2010 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्याच टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार एका सुप्रीम कोर्टाच्या महिला न्यायाधीशांनी आपल्या दोन्ही अविवाहित मुलींना 'लायाबिलिटी' म्हणून दाखवले आहे. आधीच आपल्या देशांत मुलींचे प्रमाण कमी होत चालले आहे म्हणून सरकारी पातळीवरुन ' मुलगा किंवा मुलगी' काहीच फरक नाही अशा अर्थाच्या जाहिराती चालू आहेत. त्याच्या विरुध्द जाणारे हे विधान आहे. स्त्री ही कधी समाजाच्या गळ्यातली धोंड होऊ शकते का ? लग्नाचा खर्च तर हल्ली मुलांनाही येतो. स्त्री पुरुष समानता या देशात कधी येणार ? हा स्त्री वर घोर अन्याय आहे म्हणून त्याचा तीव्र निषेध !!!

Bachelor's चिकन करी

लेखक खादाड अमिता यांनी बुधवार, 29/12/2010 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या चिकन करीला bachelor's हे विशेषण देण्याचे कारण हे कि ही चिकन करी बनवायला काही पण वाटणे, घोटणे, कालवण करावे लागत नाही. फक्त एक कुकर आणि तो ही नसेल तर एक मोठं भांडं लागतं. तर तुमच्या मित्रांना किंवा (अम्म्म्म ... ) मैत्रिणींना impress करायचं असेल तर ही चिकन करी नक्कीच तुमच्या मदतीस येईल.

गणपा ह्यांची बेक्ड वांग्याची रेसिपी तसेच शॅलो फ्राय भरले वांगे.

लेखक जागु यांनी बुधवार, 29/12/2010 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
परवा गणपा यांची बेक्ड वांग्याची रेसिपी पाहीली आणि ही करायचीच असे मनाशी ठरवले. त्यांच्या सगळ्याच पाककृती म्हणा अस ठरवायला भाग पाडतात. घरी सकाळीच मोठ्या वांग्याची भेट आलेली हाही एक योगायोग होता. मग घरी जाताना भाज्या घेउन जाण्याचा खटाटोप केला.