आयडियाची कल्पना - फिकी मिसळ
काल नीलायमला चक्क ब्लॅकमध्ये तिकिट घेऊन 'आयडियाची कल्पना' पाहिला. बर्याच दिवसांनी मराठी चित्रपट ब्लॅकमध्ये बघण्याचा योग आला. गर्दी चिक्कार होती. कधी नव्हे ते नीलायमचे पार्किंग फुल्ल झाले होते. हे चित्र बघून नयन सुखावले. सचिनची जादू अजूनही कायम आहे हे निदर्शनास आले.
आत गेल्यावर पाहिले तर बाल्कनी गच्च भरलेली होती. प्रेक्षक आतूरतेने चित्रपट सुरु होण्याची वाट बघत होते. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या एका सांस्कृतिक स्पर्धेने चित्रपट सुरु होतो. नायक जयराम (सचिन) एक हौशी नट असतो. त्याचा नायिकेच्या गाडीमुळे एक छोटासा अपघात होतो.
मिसळपाव