Skip to main content

आयडियाची कल्पना - फिकी मिसळ

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 03/01/2011 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
काल नीलायमला चक्क ब्लॅकमध्ये तिकिट घेऊन 'आयडियाची कल्पना' पाहिला. बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट ब्लॅकमध्ये बघण्याचा योग आला. गर्दी चिक्कार होती. कधी नव्हे ते नीलायमचे पार्किंग फुल्ल झाले होते. हे चित्र बघून नयन सुखावले. सचिनची जादू अजूनही कायम आहे हे निदर्शनास आले. आत गेल्यावर पाहिले तर बाल्कनी गच्च भरलेली होती. प्रेक्षक आतूरतेने चित्रपट सुरु होण्याची वाट बघत होते. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या एका सांस्कृतिक स्पर्धेने चित्रपट सुरु होतो. नायक जयराम (सचिन) एक हौशी नट असतो. त्याचा नायिकेच्या गाडीमुळे एक छोटासा अपघात होतो.

आघात

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 03/01/2011 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन वर्षातील चित्रपटांची सुरवात सुरवात यंदा (बरेच वर्षांनी) मराठी चित्रपट पहाण्याने झाली. काल विक्रम गोखले दिग्दर्शित "आघात" पाहिला. एका शब्दात सांगायचे तर चित्रपट "आवडला". टिपः यापुढे चित्रपटाची सुरवात दिली आहे. अंशतः रसभंग होऊ शकतो चित्रपट सुरू होतो तो डॉक्टरांच्या प्रतिज्ञा/शपथ ऐकत. कुठल्याही प्रकारच्या नमनात वेळ न घालवता मुळ विषय वेग घेतो. एक २२ वर्षांची मुलगी जिचे लग्न महिन्याभरावर आले आहे तिच्या ओटीपोटात एक गाठ डिटेक्ट झाली आहे.

सॉसी चिली व्हेजिटेबल्स व्रॅप (wrap)

लेखक खादाड अमिता यांनी सोमवार, 03/01/2011 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
'पोळी भाजी खाऊन खून अगदी कंटाळा आलाय! अरे हो, पण एवढ्या पोळ्या केलेल्या आहेत न. त्याचं काय करायचं? फोडणीची पोळी करू? नको. मला काही तरी मस्त, चमचमीत खावंस वाटतंय. ' जर हा संवाद तुम्हाला ओळखीचा वाटत असेल, तर हि पाक्रु तुम्हाला नक्की आवडेल; आणि नसेल तरी आवडेल. सोप्पी कृती आहे. हा पदार्थ स्नॅक म्हणून किंवा स्प्रिंग रोल सारखं स्टार्टर म्हणून पण देता येतो. आणि हो, हि एक लो कॅलोरी हाय फायबर रेसिपी आहे.

नविन जमान्यातले शब्दप्रयोग बनवू या.

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 03/01/2011 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
(हिन्दी चित्रपटाला धन्यवाद,) भाई लोकांची भाषा कशी थोड्या अवधीतच घराघरात पसरली! देवा पुढे ठेवण्याची सुपारी कोणाला यमाकडे पाठवण्याचे साधन झाली. पेटी म्हणजे एक लाख ... अब्बब केवढे पैसे असा वासलेला आ बंद होत नाहीये, तेवढ्यात खोका म्हणजे एक कोटी ही छप्परफाड रकम मागितल्या जाऊ लागली. सफेद कपडेवाले नविन युगातले राजा महाराजा ह्या भाई लोकांच्या कितीतरी पुढे गेले. पहाता पहाता कोटी म्हणजे चिल्लर खुर्दा वाटायला लागला.

अर्धवट

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 03/01/2011 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
स्वताभोवतीच्या ह्या पिंजर्यात पक्ष्याने कुठे उडायचे... त्याच त्याच भिंती चहुकडे नविन त्यात काय पहायचे ... तितक्यात त्याला दिसला समोर आइना पाहावे त्यात वाटले पण धाडस कही होइना दिसेल आपलाच भेसूर चेहरा ह्या जाणिवेने काळजाचा ठोका चुकला आणि जीवन्त पणाचा आभास जपत त्याने आपला एक पंख छाटला आता नको ते उडणे, नको तो स्वच्छंद हट्ट मिटून घेतले अंग अंग मिटून घेतले डोळे घट्ट पसरला जीवघेणा काळोख, दाटला अंधार मिट्ट वाटले आला शेवट ... भेदरून मी घाबरून मी मिटलो अर्धवट ... मी उरलो अर्धवट ...
काव्यरस

मंकी मूडस....

लेखक किल्लेदार यांनी रविवार, 02/01/2011 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
हम्पी आणि बदामी ला फिरतांना बरीच माकडे आणि त्यांच्या मर्कटचेष्टा बघायला मिळतात. हम्पीतील माकडे साळसूद,गमतीदार आणि शांत आहेत तर बदामीतील जरा आगाऊ आणि व्रात्य ...

चश्मीस डोळस, बोलके मोने, शहाणे खुळे, सोनार पितळे....

लेखक मिलिंद यांनी रविवार, 02/01/2011 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षक वाचूनच दचकलात ना ! दचकू नका. मी काही विरुध्दार्थी शब्दांच्या जोड्या लावलेल्या नाहीत. (आणी तुम्हालाही लावायला सांगत नाही) अहो ही आहेत आडनांवे आणी तीही त्या आडनावांच्या व्यक्तींच्या गुणविशेषासकट. तुम्हालाही कधी तरी असा प्रश्न पडला असेल की ही आडनांवे/उपनांमे (Family names) कशी पडली असतील कुटुंबांना? ज्यांचा वंशपरंपरागत/पिढीजात व्यवसाय आहे त्यांना त्यांच्या पेशाची नांवे पडणे हे ठिक आहे. पण म्हणून अशा विरुध्द गुणविशेषाची आडनांव का बरं समाजाने (आडनांवे कोणी ठेवली हे ज्ञात नसल्याने तुर्तास समाजाने) ठेवावीत. हा काही काल्पनिक लेख किंवा कथा नाही.

टूटीफ्रूटी केक

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 02/01/2011 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
शाही अंडा बिर्याणीचा यथेच्छ आस्वाद घेता घेता दिनेश आणि केसुने टूटीफ्रूटी केक हवा आहे असे जाहीर केले, त्या दोघांना कामाला लावून हा केक बनवला. साहित्य- २५० ग्राम बटर/लोणी/मार्गारीन, २०० ग्राम साखर, ५ अंडी, २५० ग्राम मैदा,२ चहाचे चमचे बेकिंग पावडर, २ चहाचे चमचे वॅनिला अर्क, १चमचा लिंबाचा रस, अर्धी वाटी टूटीफ्रूटीचे तुकडे, पाव कप दूध, १ चिमूट मीठ कृती- बटर भरपूर फेटून घेणे, साखर घालून फेटणे, अंडी घालून फेटणे, वॅनिला अर्क, लिंबाचा रस घालून फेटणे. मैदा+ बेकिंग पावडर+ मीठ एकत्र करुन वरील मिश्रणात घालणे व फेटणे.

देवप्रयागला भेट

लेखक संजय अभ्यंकर यांनी रविवार, 02/01/2011 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडे कंपनीच्या कामानिमित्त हरिद्वार ला दिडेक महीने होतो. एका रवीवारी वेळ मिळाल्यावर देवप्रयागला फेरी मारली. येथे बद्रिनाथ जवळून येणारी अलकनंदा व गोमुखहून येणारी भागीरथी चा संगम आहे. येथून पुढे हि नदी गंगा म्हणून ओळखली जाते. ह्रिषीकेश पासुन ८० कि.मी. तर हरिद्वार पासुन ११० कि.मी. वर असलेले शांत व सुंदर ठीकाण. त्याची काही चित्रे. अलकनंदा (डा) व भागीरथी (उ) संगम.