तडपत रैना दिन..
तडपत रैना दिन.. (येथे ऐका)
पं अजय चक्रवर्ती. पतियाळा गायकीचे एक दिग्गज कलाकार. 'दादाजी' बडे गुलामअलींचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे..!
सदरचा दुवा त्यांच्या एका जमलेल्या मैफलीचा आहे. राग सुरू आहे मारुबिहाग..
राग मारुबिहाग. आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातला एक वेगळीच गोडी, एक वेगळीच खुमारी असलेला शृंगाररसप्रधान राग. परंतु हा शृंगार आमच्या नंद, हमीर सारखा कॉलेज गोईंग नाही बरं का मंडळी. त्या मानाने हा जरा मॅच्युअर शृंगार आहे.
मिसळपाव
