Skip to main content

मीठावरच्या कराची कहाणी...

लेखक अवलिया यांनी बुधवार, 26/01/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेटवर भटकंती करत असतांना एक लेख वाचण्यात आला. सदर लेख आमचेच मित्र विशाल कुलकर्णी यांनी लिहीला आहे. त्यातील काही अंश..
बागडीचे खरेखुरे फ़ोटो काही आज उपलब्ध नाहीत. पण या फ़ोटोवरून ’बागड’ या शब्दाचे स्वरुप आणि ती ब्रिटीशांनी उभी केलेली २३०० किमी लांबीची बागड किती विलक्षण असेल याची कल्पना येवु शकेल. आता ही प्रचंड बागड उभे करण्याची ब्रिटीशांना का गरज भासली असेल? हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला थोडा त्या काळाचा आढावा घ्यावा लागेल.

प्रजासत्ताक (?) दिन

लेखक देवदत्त यांनी बुधवार, 26/01/2011 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रजासत्ताक दिन. आज त्याचा आनंद आपण साजरा करणार. पण काल एका दिवसभरातील ह्या बातम्या वाचल्या ऐकल्या तर वाटते काय चालले आहे देशात. खरंच प्रजेची सत्ता आहे का आपल्या देशात? तसे म्हणायला प्रजेचीच सत्ता आहे पण ती सामान्य प्रजा नाही तर फक्त ’त्यां’च्या मर्जीतील प्रजा. ते कोण सांगायची गरज वाटत नाही. सर्वांनाच माहित आहे.

वनराणी ४..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 26/01/2011 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
वनराणी ३ या घटनेला एक मास लोटला असेल आता. पण अजूनही ती घटना आठवली की पाय डळमळू लागतात. पण मी हळूहळू रुळलेय इथे. इथल्या तरूवेलीत, गाई-वासरांत, हरणांमध्ये माझे सवंगडी भेटलेत मला. जे आहे .. त्यात खूप समाधान आहे मला. इथे अशीच राहिले मुनीवरांच्या छायेत, तरी माझं अयुष्य स्वर्ग होईल. ज्या दिव्यशक्तीने हे सगळं घडवून आणलय, तीच मला या सगळ्यातून तारून नेईल. ********* पुढे वाचा ... आता या सगळ्याचीच सवय झालीये मला. आयुष्यात म्हंटलं तर काहीच बाकी नाही राहिलेलं आणि म्हंटलं तर खूप काही आहे.

पनीर कढाई

लेखक अंतु बर्वा यांनी बुधवार, 26/01/2011 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स... बर्‍याच दिवसांपासुन फ्रिजमधला पनीर खुणावत होता. पनीर चिली च्या पुढे कधीही पनीर नामक पदार्थाचं काहीच बनवलं नसल्याने नेमकं काय करावं सुचत नव्हत... मिपाच्या पाकृ विभागात एक चक्कर टाकली, पण पनीर माखनवाला वगैरे पदार्थ जरा गोडसर लागत असल्याने काहीतरी तिखट बनवावंस वाटत होतं. मग काय गुगलदादा कडे याचना केली आणी पाच पन्नास रेसिपीज शोधुन काढल्या. पण यात नेमका घोळ असा झाला की इतक्या रेसिपीज पाहुन हम तो एकदम कन्फुजा गए... शेवटी दोन-तीन रेसिपीज मिक्स केल्या आणी जे काही झालं ते अस...

(सख्या चला बागामधी)

लेखक अडगळ यांनी बुधवार, 26/01/2011 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तव बदललं तरी आठवणी पुसल्या जात नाहीत. कांदा उतरला म्हणतात.
काव्यरस

गुजरात दारूबंदी '' निव्वळ खुळचट पणा

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी बुधवार, 26/01/2011 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण देशात दारू विकली जाते अगदी देशी म्हणून परवाना मिळतो. .मग फार पूर्वी गुजरातच्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांना का म्हणून तेथील राज्यात दारूबंदी जाहीर करावीशी वाटली (म्हणजे ती राजकीय संतांची जन्म भूमी व क्रम भूमी )अरे पण ते राष्ट्र पिता म्हणजे सर्व देशच त्यांची कर्म भूमी मग काश्मीर प्रश्नासारखा ह्या राज्यात त्यावेळी वेगळा कायदा का म्हणून केला गेला . गुजरात मध्ये तेथील जनता दारू पीत नाही का ?

श्रीमद दासबोध अभ्यास : इ-मेल अथवा पत्राद्वारे

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 25/01/2011 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
II श्रीराम समर्थ II श्रीमद दासबोध अभ्यासक्रम आजच्या ताण- तणावाच्या आणि धकाधकीची जीवनात आपल्याला थोडेसे मनः स्वास्थ्य ,समाधान मिळाले तर हवेच आहे. पूजा - अर्चा, व्रत-वैकल्ये करण्यास विज्ञानवादी मन धजावत नाही आणि ते शक्य ही होत नाही. अशावेळी काही व्यावहारीक विचार सांगणाऱ्या 'ग्रंथराज दासबोधाचा' खूप उपयोग होतो, असा स्वानुभव आहे. दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनात, नैराश्य प्रसंगी, मानसिक धीर देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. संभ्रम दूर करतात. योग्य व्यवहार लक्षात घेऊन तो आचरणात आणण्याचे बल देतात.आत्मविश्वास वाढवतात.

रावणाला कोणी मारला ?

लेखक नाहिद नालबंद यांनी मंगळवार, 25/01/2011 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक शिक्षण अधिकारी एकदा एका शाळेत गेला सहजच एका वर्गात शिरला, एक साथ नमस्ते - सारा वर्ग बोलला. बसा, मुलांनो बसा - अधिकारी म्हणाला. "रावणाला कोणी मारला ?" - ऐसा प्रश्न् विचारला सारा वर्ग शांत शांत जाहला प्रश्न् पुन्हा एकदा विचारला "मी नाही मारला, मी नाही मारला - प्रत्येकजण बोलला अधिकारी खूप वैतागला, मास्तरांना म्हणाला - "रावणाला कोणी मारला, का येत नाही मुलांना ?" मास्तरांनी खुलासा केला - आमचा विद्यार्थी साधा भोळा गांधी अहिंसा ठाऊक त्याला कशाला कोण मारेल रावणाला ? अधिकारी आणखी वैतागला, मुख्याध्यापकांकडे गेला, झाला प्रकार सांगितला, "रावणाला कोणी मारला ? विद्यार्थी सांगत नाहीत" - म
काव्यरस

'द किंग'

लेखक प्रास यांनी मंगळवार, 25/01/2011 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
१९५० चा काळ, अमेरिकेत ज्याकाळात वर्णद्वेष ब~यापैकी वास्तव होते तेव्हा मिश्रवस्ती असलेल्या 'मेम्फिस' शहरामध्ये एक गौरवर्णीय मुलगा खूपदा कृष्णवर्णीयांच्या मौजेच्या ठिकाणी दिसायचा. त्यांच्या म्युझिक क्लब्स मध्ये जायचा, गाण्यांच्या कार्यक्रमात जायचा, इतकंच नाही तर गौरवर्णीयांच्या क्लब्समध्येही 'ज्यूकबॉक्स'मध्ये '~हिदम एन ब्लूज', 'गोस्पेल' आणि 'स्पिरिच्युअल' प्रकारची गाणी ऐकायचा. एरवीही रेडिओला चिकटण त्याला नवीन नव्हत.

शबद गुरबानी

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 25/01/2011 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी एका पंजाबी स्नेह्यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात मी 'मेहरावालेया साइयां रक्खी चरनां दे कोल' हे मला तेव्हा येत असलेले एकमेव पंजाबी भक्तिगीत गायले अन् त्या स्नेह्यांनी खूश होऊन लगेच त्यांच्याकडील उत्तमोत्तम पंजाबी गीतांची कॅसेटच मला भेट म्हणून दिली! शिवाय त्यांच्याकडे असलेले एक पुस्तकही चाळायला दिले. पंजाबी भाषेतील गाण्यांशी माझा तो पहिलाच परिचय! त्या अगोदर हिंदी चित्रपटांच्या काही गाण्यांमधून या भाषेची गोडी जाणवली होती. पण आता ती गाणी नियमित ऐकू लागल्यावर त्यांच्यातील रसमाधुर्य अजूनच आल्हाद देऊ लागले.