Skip to main content

चिकन मोमो

लेखक Mrunalini यांनी शनिवार, 12/02/2011 04:11 या दिवशी प्रकाशित केले.
मोमो, एक खास तिबेटीयन पाकृ आहे. तिबेटसह हा खाद्यप्रकार संपुर्ण ईशान्य भारत, नेपाळ व हल्ली मुंबई, पुण्यासारख्या शहरात देखील झपाट्याने प्रसिद्ध होत आहे. मी ह्या पाकृ मधे चिकन वापरले असले तरी तुम्ही त्या जागी पोर्क, बीफ, मटण किंवा हे पुर्णपणे शाकाहारी देखील बनवु शकता. साहित्यः चिकन खिमा - ५०० ग्रॅम मैदा - २ वाटी कांदा - १ वाटी बारीक चिरलेला कोबी - १/२ वाटी कांद्याची पात - १/२ वाटी ढोबळी मिरची - १/४ वाटी आले, लसुण - २ चमचे बारीक चिरुन काळी मिरी पावडर - १ चमचा सोया सॉस - १/२ चमचा व्हिनेगर- १/२ चमचा मिठ चवीनुसार कृति : १.

डेविस रेमंड च्या निमित्ताने पाकिस्तान व अमेरिकेमध्ये राजकीय राडा

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी शनिवार, 12/02/2011 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या पाकिस्तान व अमेरिकेत राजकीय व कुट नैतिक राडा झाला आहे. रोज अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या निमित्ताने पाकिस्तानात घडत आहेत .

इजिप्त आणि असहकार

लेखक नितिन थत्ते यांनी शुक्रवार, 11/02/2011 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या इजिप्तमध्ये घडत असलेल्या घटनांची जी काही माहिती आपल्यापर्यंत पोचत आहे त्यानुसार इजिप्तच्या जनतेने अभूतपूर्व एकजुटीने उठाव करून अध्यक्ष मुबारक यांना पायउतार होण्यास भाग पाडले आहे. मुबारक यांनी उपाध्यक्षांकडे सत्ता सोपविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सदर घटनाक्रमात इजिप्तच्या लष्कराची भूमिका महत्त्वाची ठरली. निदर्शने करणार्‍या लोकांवर शस्त्र चालवण्यास सैन्याने नकार दिला. त्यामुळे मुबारक यांना पर्यायच उरला नाही. या निमित्ताने (अहिंसक) असहकाराच्या तत्त्वाचे प्रात्यक्षिकच तेथे दिसून आले. एखादे जुलमी सरकार अन्यायाने देशाच्या जनतेवर राज्य करते.

वेले

लेखक विकि यांनी शुक्रवार, 11/02/2011 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्प्प्प

इजिप्त - एकाधीकारशाही कडून (कदाचीत) लोकशाही कडे

लेखक विकास यांनी शुक्रवार, 11/02/2011 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
एक दोन दिवसांपूर्वी प्रेसिडंट ओबामा म्हणल्याप्रमाणे, आपण एक इतिहास घडताना पहात आहोत. आज त्याचा एक अध्याय संपला - इजिप्शियन जनतेच्या दबावाखाली मुबारक यांनी राजीनामा दिला! (एनपीआर) साधारणपणे २० वर्षांपूर्वी अशीच सुरवात कम्युनिस्ट राष्ट्रांत झाली आणि अनेक दशके पोलादी वाटणार्‍या सत्ता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कलमडू लागल्या.

आमंत्रण - सोमवार संध्याकाळी खादाडिचं

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 11/02/2011 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो, गेल्या महिन्यात मिपाकरांची सहल यशस्वि झाल्यापासुन सगळ्यांनी एकत्र जेवायला जावं असा विचार मनात होता, मागच्या सोमवारी मला श्री. स्पा यांच्या पंगतीचा लाभ झालाच होता तसंच श्री. वल्लींबरोबर ही खादाडी चर्चा चालुच होती,म्हणुन खालील प्रमाणे कार्यक्रम ठरवलेला आहे त्याचं हे खुलं आमंत्रण. कार्यक्रम फक्त जेवणाचा आहे, - हॉटेल पंचवटी (गुजराथी थाळी) , भांडारकर रोड, पुणे. दिनांक - १४ फेब्रुवारी २०११. वेळ - संध्याकाळी ०७.१५. जे येणार असतील, त्यांनी नुसतं इथे प्रतिसादात हो म्हणुन चालणार नाही, नंतर व्यनिने कळवावे अगदी मोबाईल नंबर सहित.

अंतर्वस्त्रे परिधान करण्याची योग्य रीत

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 11/02/2011 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
आता केवळ 'अंतर्वस्त्रे' (अंडरविअर) हा शब्द या धाग्यात आहे म्हणून नाक मुरडू नका. 'अंतर्वस्त्रे' म्हणजे जे बाहेरील कपड्यांच्या आतच घालतो तशीच वस्त्र हे लक्षात घ्या अन पुढे वाचा. आता ही अंतर्वस्त्रे' किंवा अंडरविअर (उदा. बनियन) आपण शर्ट किंवा पँटच्या आत आपण घालतो. त्या अंतर्वस्त्रांवर (बनियनवर) एक लेबल त्या त्या कंपनीने लावलेले असते. ती त्यांची जाहीरात असते अन त्यावर त्या बनियन च्या मापाचा एक नंबर लिहीलेला असतो. तो साधारणता: इंचात असतो. म्हणजे ज्याची छाती २८ इंचाची असते त्याला २८ नंबरचा बनियन फिट होतो. (फिट्ट नाही तर फिट म्हणजे योग्य मापात बसतो). तर आपले लेबल.

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ३

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 11/02/2011 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग - http://misalpav.com/node/16707 *** अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय यात साम्य काय आहे आणि यावर काहीतरी लिहा असे जर सांगितले तर आपल्यापैकी किती जणांचे डोके चालेल हे मला माहित नाही. किमान मी तरी असे काही लिहू शकणार नाही हे नक्की. लिहिल्यानंतर लोकांना ते आवडेलच याची खात्री नाही. पण काही जण मात्र आरामात अशा वरवर एकमेकांशी संबंध नसलेल्या शब्दांच्या शीर्षकाचा लेख लिहितात आणि तो वाचला की आपल्याला वाटते "अरे हो यार ! आपण पण असे लिहू शकलो असतो !!