सध्या पाकिस्तान व अमेरिकेत राजकीय व कुट नैतिक राडा झाला आहे. रोज अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या निमित्ताने पाकिस्तानात घडत आहेत . अनेक दृष्टीकोनातून ह्या बातम्या अनेक वृत्त पत्रातून आणल्या जात आहे .
अमेरिकेने हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला आहे .अमेरिकन सुरक्षा सल्लागाराने काल पाकिस्तानच्या राजदूताला अमेरिकेतून हाकलून लावले जाईल .ह्या प्रकारचे स्फोटक विधान केले आहे .
बॉलीवूड व हॉलीवूड साठी आदर्श स्क्रिप्ट असलेल्या ह्या घटनेची सुरवात पंजाबात (पाकिस्तानच्या ) झाली.
डेविस रेमंड हा अमेरिकन नागरिक भाड्याची गाडी घेऊन २७ जानेवारी ला लाहोरच्या रस्त्यावरून जात होता. मोटार सायकल वरून दोन बंदुकधारी (देशी कट्टे ) घेऊन त्याचा पाठलाग सुरु केला .व त्यास थांबण्यास सांगितले .तो थांबल्यावर त्याच्या गाडीच्या विंड स्क्रीन जवळ येऊन बंदुका रोखल्या .मग कुठल्याही हॉलीवूड सिनेमात घडते तशी घटना घडली .क्षणाचाही उसंत न घेता डेविस ने आपल्या बंदुकीतून बुलेट त्या दोघांवर रित्या केल्या
.भर रहदारीत दिवसा लोकांसमोर तो गाडीच्या बाहेर आला .शांतपणे त्याने मोबाईल केमेर्यातून त्यांचे फोटो घेतले. .व गाडीतून वायरलेस मधून मदतीसाठी फोन केला. (हा फोन अमेरिकन दुतावसात किंवा अजून कुठे केला हे अजून गोड्बंगल आहे .) लगेच तो गाडीत बसला व गाडी सुरु केली ..त्याच्या मदतीला अजून एक गाडी लगेच आली. अर्थात रस्त्यावर लोकांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला .ह्या प्रयत्नात त्याच्या मदतीला आलेल्या गाडीखाली अजून एक नागरिक आला .पुढे त्याला लोकांनी पकडले .व तो पोलिसांच्या स्वाधीन केले .लाहोरच्या खालच्या न्यायालयात त्याने स्वताच्या रक्षणासाठी त्या दोन हत्या केल्याचे काबुल केले
अमेरिकन सरकारने झरदारी सरकारवर दबाव तंत्र सुरु केले .अमेरिकेच्या म्हणण्यानुसार डेविस कडे राजनैतिक पासपोर्ट आहे व त्यावर विसा २०१२ पर्यत वैध आहे .पाकिस्ताने त्याला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरुध्ध(जिनिव्हा कन्वेक्शन ) पकडले आहे. ( राजनैतिक पासपोर्ट वाल्या लोकांना परदेशात तुरुंगात टाकले जाऊ शकत नाही.( .' सरफरोश मध्ये पाकिस्तानी राजनैतिक अधिकारी अमीर ला म्हणतो ''.तू मला अटक करू शकत नाही तुझ्या देशात'' .तेव्हा आमीर डोके लढवून नसरुद्द्दिन शहा कडून त्याचा खून करवतो ) पाकिस्तानी सरकार च्या मते त्यावर लायसन्स नसतांना बंदूक बाळगणे. व हत्येचा आरोप आहे.
न्यायिक प्रक्रिया झाल्याशिवाय त्याला सोडता येणार नाही .( अधिक शोध घेतला असता असे कळले कि रेमंड ह्यांच्याकडे राजनैतिक पासपोर्ट आहे .पण त्यावर राजनैतिक विसा नाही आहे .) तो व्यापारी विसावर पाकिस्तानात आला होता .
खूप जण आपला राजनैतिक पासपोर्ट हा सरकारी कामगिरी झाली तरी सरकारला परत देत नाहीत .त्यामुळे विसा संपला तरी त्या पासपोर्ट वर त्यांना विमानतळावर व कुठेही भरपूर फायदे असतात ( हा पासपोर्ट निळ्या रंगाचा असतो .) मी एकदा हॉटेलात सी एन एन च्या पत्रकाराला ''माझ्या कडे निळा पासपोर्ट आहे'' ,असे सांगून चकित केले होते .(भारतीय पासपोर्ट सुद्धा गडद निळा असतो )
पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी (ह्यावेळी पहिल्यांदाच सगळ्यांनी एकत्र येऊन डेविस विरोधी मोहीम करून प्रचंड प्रमाणात जनजागृती केली .) अमेरिकन द्वेष पाकिस्तानी जनतेत मुळातच आहे .
''हम इनकी जंग लढ रहे है'' असे माझ्या अनेक पाकिस्तानी कलीग चे म्हणणे असते .
पाकिस्तानी प्रसार माध्यमानुसार डेविस कुप्रसिध्ध अमेरिकन ब्लेक वोटर मोहिमेवर होता .( इराक व अफगाण मधील युद्धात ब्लेक वोटेर कंपनी च्या कारवाया मुळे ती वादग्रस्त ठरली असून पाकिस्तानमध्ये तिचे चांगलेच बस्तान बसले आहे .त्याची सविस्तर माहिती नंतर देईन ) दोन मयत पाकिस्तानी हे डाकू म्हणून पाकिस्तानी सरकार तर्फे पहिले जाहीर करण्यात आले होते .मग अशी गोष्ट बाहेर आली .कि त्यांच्यापैकी
एकाच्या भावाची काही दिवसापूर्वी हत्या झाली होती .म्हणून त्यांनी बंदुके स्वताजवळ ठेवली होती .
तेथे लाहोर मध्ये टिंबर मार्केट राबी रोड वरील मयत फैझान हैदर च्या घर्री त्याच्या जनाज्यावर लोकांनी थैमान मांडले होते .त्याच्या नातलगांचे म्हणणे कि'' ते डाकू असल्याचा एकतरी पुरावा दोन्ही देशाकडे आहे का ?
ह्या घटनेला अजून अनेपेक्षित वळण असे मिळाले . दुसर्या मयत फईम ची विधवा शमायला हिने विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या केली .तिच्या मृत्युपूर्व जबानीत इस्पितळात '' आपल्या पतीला न्याय मिळणार नाही.अमेरिकन दबावतंत्राने आरोपी सुटून जाईन '' असे सांगितले . डॉक्टर बशीर राणा ह्यांनी तिला सोमवारी मयत घोषित केले .जनतेतील वाढत्या असंतोषामुळे पाकिस्तानी सरकार कधी नव्हे ते कडक धोरण स्वीकारत आहे .
पंजाब पोलीस प्रमुख असलम तरान ह्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली . ''न्यायालयात साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीमुळे रेमंड ह्यांनी हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे .'' त्याला १४ दिवसाची न्यायालैन कोठडी दिली आहे .
पुढील सुनावणी २५ फेब्रुवारी रोजी आहे .न्यायालयाने पाकिस्तानी विदेशी मंत्रालयाला देविसच्या विसा स्टेटस बद्दल खुलासा मागितला आहे .(तिथे पत्रकारांनी विदेशी मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल बसित ह्यांना प्रश्नांचा भडीमार करून'' ह्या प्रकरणी त्वरित खुलासा का केला जात नाही? ;; अजून किती डेविस रेमंड पाकिस्तानात आहेत ?( किमान ६० ते ७० असावेत असा अंदाज पाकिस्तानी जेष्ठ पत्रकारांचा आहे ) असे अडचणीत आणणारे प्रश्न विचारून सळो कि पळो केले आहे .
अमेरिकन सरकारच्या मते डेविस आमच्या स्टेट दिपार्त मेंट चा कर्मचारी आहे .( .ह्यात ग्यानबाची मेख अशी आहे कि डेविस ची अमेरिकन कंपनी हि खाजगी असून अमेरिकन सरकारने तिला पाकिस्तानात सेवा पुरविण्यासाठी करार केले आहेत .(इराक /अफगाण मध्ये कुप्रसिद्ध ठरलेल्या जगातील सर्वात मोठी खाजगी सेना असा उल्लेख होणार्या ब्लेक वोटर शी ह्या कंपनीचा संबंध असावा असा संशय व्यक्त केला जात आहे .)
सरत शेवटी डेविस च्या गाडीतून जप्त केलेले साहित्य (जीपीआरस सिस्टीम /नकाशे /लांब पाल्यांच्या दुर्बिणी / एक पिस्तुल )
ह्यातील गोळ्या साध्या म्हणजे ९ एम एम च्या नव्हत्या .तर वेगळ्या कमांडोज कडे असतात त्या होत्या ज्याची मारक शमता जास्त असते .डेविस ने विंड स्क्रीन मधून ७ गोळ्या अश्या रीतीने मारल्या कि विंड स्क्रीन तुटली नाही .( हे एका प्रशिक्षित कमांडोज ला हे तन्त्र शिकवले जाते ) मात्र गोळ्या अनुक्रमे ३ व ४ अचून निशाण्यावर लागल्या
अमेरिकेने झरदारी ह्यांचा अमेरिकी दौरा रद्द केला आहे .त्यांच्यावर दबाव आण्यासाठी ते भारताला पाचारण करतील का ? (अर्थात पडद्यामागून हालचाली )
असा किस्सा भारतात झाला असता तर आपल्या सरकार व विरोधी पक्षाची भूमिका काय असती ?
अमेरिका व पाकिस्तानमधील राजकीय राड्यात भारत कुट नैतिक रित्या कसा फायदा घेऊ शकतो .?
सगळ्यात महत्वाचे अमेरिकेच्या अघोषित मांडलिक राष्ट्र पाकिस्तान त्यांच्या पुढे शरणागती पत्करणार का ?
अरब क्रांती नंतर अमेरिकेने हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला आहे .खुद्द अमेरिकन जनतेचे काय मत आहे ह्यावर ?
ब्लेक वोटर च्या कारवाया ज्यांच्यावर अमेरिकत हि टीका झाली होती .प्रती दहशतवाद म्हणून अत्यंत उपयुक्त अश्या ब्लेक वोटर चे पाकिस्तानात ह्या कंपनीचे भवितव्य काय ?
असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत .
..
.
वाचन संख्या
13706
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
च्यायला
बॉल्स...
In reply to च्यायला by गोगोल
नो वरीज! द ५१र्स्ट स्टेट हॅज
In reply to बॉल्स... by प्रदीप
सदर येथे हि घटना घडली
<<<एवढ्या रहदारीच्या जागी अशी
In reply to सदर येथे हि घटना घडली by निनाद मुक्काम …
ब्लॅकवॉटर
निनाद, सध्या पाकिस्तानी
अभ्यास पुर्ण लिखाण
ओक्के. लेख अर्धाच वाचला. अधे
मिपाला तातडीने एका डेविस
In reply to ओक्के. लेख अर्धाच वाचला. अधे by परिकथेतील राजकुमार
अगदी अगदी विक्षिप्त नीता
In reply to मिपाला तातडीने एका डेविस by पिवळा डांबिस
अगदी अगदी विक्षिप्त नीता
In reply to अगदी अगदी विक्षिप्त नीता by निनाद मुक्काम …
ब्लेक वोटर ( आता x e ) हि
हम्म्म..... तरीच डेवीस एव्हडा बीनधास्त नीघाला
In reply to ब्लेक वोटर ( आता x e ) हि by निनाद मुक्काम …
@गुप्त मोहिमा सार्वजनीक
ब्लॅकवॉटर ही एक outsourcing वाली कंपनी आहे
प्र. का. टा. आ.
In reply to ब्लॅकवॉटर ही एक outsourcing वाली कंपनी आहे by सुधीर काळे
प्र. का. टा. आ.
In reply to ब्लॅकवॉटर ही एक outsourcing वाली कंपनी आहे by सुधीर काळे
प्र. का. टा. आ.
In reply to ब्लॅकवॉटर ही एक outsourcing वाली कंपनी आहे by सुधीर काळे
इराकमध्ये ह्या ब्लॅकवॉटरने
In reply to ब्लॅकवॉटर ही एक outsourcing वाली कंपनी आहे by सुधीर काळे
पण नुकतेच त्यांना अजस्त्र
In reply to इराकमध्ये ह्या ब्लॅकवॉटरने by प्रदीप
भारत आणि अमेरिका काय कृती
खरे तर शुक्रवाराची दिलेली कालमर्यादा कालच संपली आहे!
डुप्लिकेट पोस्टिंगमुळे
Express Tribune या पाकिस्तानी वृत्तपत्रातली ही लिंक वाचा!
वाटलेच होते जो पाकीस्तानने पवीत्रा घेतला होता
In reply to Express Tribune या पाकिस्तानी वृत्तपत्रातली ही लिंक वाचा! by सुधीर काळे
Express Tribune या पाकिस्तानी वृत्तपत्रातली ही लिंक वाचा!
@ब्लॅकवॉटर ही एक outsourcing
इराण व आपण
In reply to @ब्लॅकवॉटर ही एक outsourcing by निनाद मुक्काम …
लेख
चीनला विसरू नका!
In reply to लेख by तिमा
हॅ हॅ
हा, हा...
In reply to हॅ हॅ by सुनील
हाहा
In reply to हा, हा... by प्रदीप
हि बातमी तशी रंजक आहे .व तिचा
In reply to हाहा by सहज
फक्त
In reply to हि बातमी तशी रंजक आहे .व तिचा by निनाद मुक्काम …
अहो सहज मुळात इतके साधे
In reply to फक्त by सहज
सुटला रे!!
In reply to हॅ हॅ by सुनील
करदात्याचे पैसे
In reply to सुटला रे!! by सुनील
असा किस्सा भारतात झाला असता
काही होणार नाही. पाकिस्तान
निनादच्या प्रतिसादाला पूरक प्रतिसाद
छान.
In reply to निनादच्या प्रतिसादाला पूरक प्रतिसाद by सुधीर काळे
काका लाजवाब प्रतिसाद आहे
निनाद. सगळे वाचले. बरेचसे पटले. पण............
In reply to काका लाजवाब प्रतिसाद आहे by निनाद मुक्काम …
ओबामा आणि त्यांचे वरिष्ठ
हे हे हे. काहिही लिहीत तुम्ही भौ.
In reply to ओबामा आणि त्यांचे वरिष्ठ by निनाद मुक्काम …
चांगली चर्चा
कायद्यामधील पळवाट काढून त्याला सोडून दिले जाईल असे वाटते.
In reply to चांगली चर्चा by विकास
इथली "इस्लाम संरक्षक आघाडी" (Front Pembelah Islam)
In reply to कायद्यामधील पळवाट काढून त्याला सोडून दिले जाईल असे वाटते. by सुधीर काळे
अवांतर: निळा पासपोर्ट वगैरे
गागा भट्ट साहेब आपण माझ्या
In reply to अवांतर: निळा पासपोर्ट वगैरे by पंगा
पंगा, येक सांगा
In reply to अवांतर: निळा पासपोर्ट वगैरे by पंगा
माझ्या लेखात उल्लेख
डेविस रेमंड ची
निनाद भौ, येक महीन्यापुर्वी ह्योच लिवले होते.
In reply to डेविस रेमंड ची by निनाद मुक्काम …
विकास जी खुद्द अमेरिकन