Skip to main content

३८१ वी स्मरण यात्रा.....

लेखक उदय सप्रे यांनी रविवार, 13/02/2011 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार मंडळी ! येत्या १९ फेब्रुवारीला आपल्या सार्‍या लोकांच्या २ आराध्यदैवतांपैकी (छ.शिवाजी अणि छ.संभाजी) छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८१ वी जयंती ! त्या निमित्ताने माझ्या आगामी ४ पिढ्यांचा इतिहास सांगणार्‍या आणि छत्रपती संभाजी महाराजांवरील "झंझावात" या कादंबरीतील एक लेख इथे देत आहे.आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात (मि.पा.

मैत्रीचे गणित -

लेखक विदेश यांनी रविवार, 13/02/2011 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीमधे वजाबाकी दोषांची करावी मैत्रीमधे बेरीज ती गुणांची करावी मैत्रीत हवा गुणाकार मैत्रीत नको भागाकार मैत्रीच्या गणितांमधे शून्याला नकोच आधार ! खेळता खेळता आकड्यांनी मैत्रीचे धागे विणावे विणता विणता धाग्यांनी जाळे सुंदरसे बनवावे मैत्रीच्या जाळ्यात खूप खूप गुरफटावे मैत्रीचे नंतर गणित आयुष्यात ना सुटावे !!
काव्यरस

निरोप - तंबुला जसा दिसला!

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 13/02/2011 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
तो दिमाखात उभा होता- हजारो राहुट्यांच्या मध्यभागी आपला धवल रेशमी अंगरखा फ़डफ़डवित. तुफ़ानांपासून खाविंदांना महफ़ूस ठेवित. खणखणीत आवाजात जणू निसर्गाला बजावित- खबरदार! खाविंद आराम फ़र्मा रहे है. त्यांना परेशान करण्याची गुस्ताखी करू नका. मुद्दाम ठेंगण्या बनवलेल्या दारात, रेशमी कनातींवरची फ़ारसी नक्षीदार अक्षरे आत शिरणाऱ्या कनिजांना आगाह करीत होती- मान तुकवून कुर्निसात करीत खानबहाद्दूरांना सामोरे जा. माथ्यावर लहरणारे हिरवेगार निशाण उंच मानेने बयां करीत होते- अल्लाह परवरदिगारची मर्जी ह्या तंबूच्या मालकावर आहे.

शुभ्लग्न

लेखक साबुदाणा खिचडी यांनी रविवार, 13/02/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
शुभलग्न व्यक्तिगत जीवन व सामाजिक जीवन ह्यांना जोडणारा दुवा म्हणजे कुटुंबव्यवस्था असे म्हणता येईल .दोन व्यक्ती कुटुम्ब व्यव स्थे मुळेएकत्र होतात .अशी अनेक कुटुंबे एकत्र होऊन समाज बनतो .

पाव

लेखक Mrunalini यांनी रविवार, 13/02/2011 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
भारताबाहेर आपल्या सारखे पावभाजीचे पाव मिळत नाहीत, म्हणुन हे पाव बनवण्याचा प्रयत्न केला होता. हा केलेला प्रयत्न बर्‍यापेकी यशस्वी झाला. साहित्यः मैदा - ५०० ग्रॅम यीस्ट - ८ ग्रॅम किंवा १ छोटे पाकीट गरम पाणी - १/२ कप साखर - १ चमचा unsalted बटर - ५० ग्रॅम अंडे - १ मिठ चवीनुसार कृती: १. मैदा चाळुन घ्यावा. २. एका मोठ्या बाउल मधे १/२ कप गरम पाणी, यीस्ट, १ चमचा मैदा, १ चमचा साखर व १/२ चमचा मीठ टाकुन मिक्स करावे. हे बाउल १० मिनिटे उबदार जागी ठेवावे. तुम्ही थंड प्रदेशात रहात असल्यास हे बाउल oven मधे किंवा heater जवळ ठेवावे. ३.

अभिजात साहित्य म्हणजे काय? - इति इटालो कॅल्विनो

लेखक चिंतातुर जंतू यांनी रविवार, 13/02/2011 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आसपास असणाऱ्या पुष्कळ जणांना वाचनाची किंवा चित्रपट पाहण्याची आवड असते. काहीतरी सकस पहावं/वाचावं अशी इच्छाही असते. स्वत:ची अशी काहीएक आवडनिवडसुद्धा असते. पण विशिष्ट प्रकारच्या पुस्तक/चित्रपटांविषयी त्यांच्या मनात अढी म्हणा, संशय म्हणा असं काहीतरी असतं. ते का वाचावं/पहावं याविषयी त्यांच्या मनात संभ्रम किंवा कधी कधी सरळ नकारच असतो, पण त्याविषयी जाणून घेण्याची इच्छाही असते. किंवा ते कळायला कठीण जाईल असं वाटत असतं, पण कळून घ्यायचे कष्टदेखील घेण्याच्या लायकीचं ते आहे का याची खात्री नसते. मग ते उदा.

न लगे कोठे, शोधे तुज माझे मन

लेखक एकमाणुस यांनी शनिवार, 12/02/2011 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
न लगे कोठे, शोधे तुज माझे मन न दिसे काही, दिसे तुझे ते नयन तु नाही तर कुठे आहे सागर तु नाही तर कुठे आहे तरंग एक एक थेंब वाहतो जसा वाट पहाते तुझी माझे जीवन न लगे कोठे, शोधे तुज माझे मन... तु नाही तर कुठे आहे सुख तु नाही तर कुठे आहे चैन एक होण्यास धावते बरोबर नदी काठ होते जसे बेचैन न लगे कोठे, शोधे तुज माझे मन.. तु नाही तर कुठे आहेत तारका तु नाही तर कुठे आहे आसमंत क्षितिजा वर मिळेल धरा जणू मज मिळेल का तुझे आलिंगन न लगे कोठे, शोधे तुज माझे मन न दिसे काही, दिसे तुझे ते नयन....!!

फायनान्सची तोंडओळख (भाग ०): जादूगार राम कुमार आणि जादुच्या छड्या

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 12/02/2011 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
रामपूर हे एक छानसे छोटेखानी गाव होते. त्या नगरात राम कुमार नावाचा जादूगार राहत होता.राम कुमारला भाऊ तीन-- लक्ष्मण कुमार,भरत कुमार आणि शत्रुघ्न कुमार. तर सीता कुमारी ही त्याची पत्नी. राम कुमारकडे एक विलक्षण कौशल्य होते.त्याला जादुच्या छड्या तयार करता येत असत.आणि या छड्या साध्यासुध्या नव्हत्या.तर ती छडी ज्या मालकाकडे असेल त्या मालकाच्या बॅंक खात्यात ती छडी जगाच्या अंतापर्यंत दर वर्षाच्या १ जानेवारीला १०० रूपये आपोआप जमा करत असे. राम कुमारकडे अशा अनेक छड्या होत्या आणि त्यातून त्याला भरपूर पैसे मिळत असत.

संस्थळांची प्रगल्भता - एक तुलनात्मक अभ्यास

लेखक स्नेहल राव यांनी शनिवार, 12/02/2011 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. गेले बरेच महिने मी मराठी संस्थळांवर वाचन करतो आहे. लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. लेख काही आठवड्यांपूर्वीच लिहिलेला होता, पण प्रसिद्ध करण्याचा धीर होत नव्हता. काही चुका राहून गेल्या असतील तर मोठ्या मनाने क्षमा करावी ही विनंती. सुमारे दोन महिन्याभरापूर्वी धम्मकलाडू यांनी सद्यपरिस्थित मराठी संस्थळे किती प्रगल्भ आहेत, त्यांची प्रगल्भता मोजावी कशी व वाढवावी कशी यावर चिंतन करणारा एक लेख लिहिला होता. दुर्दैवाने त्यांनी स्पष्टपणे लिहून इन्कार केला असला तरी त्यांचा खोडी काढण्याचा हेतू असल्याप्रमाणे वाचकांनी त्यावर मते मांडली.