Skip to main content

घुबडाच्या मागे लागले कावळे हजार ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 18/02/2011 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
कुठून आली कावळ्याची जीवघेणी कावकाव आंधळेपणाने दिवसाच्या प्रकाशात उडणारे वाट चुकलेले घुबड झिडपिडत टकरा खात होते भिंतीला आंधळेपणाने उडत होते कावळ्याच्या नजरेतून गहाळ होण्यासाठी जीवाच्या आकांताने जीव घेउन घाबरून वळचणीला जाऊन बसत होते माणसासारखे तोंड ,नजर ,ते नाक घाबरून आपल्यातच गुंतत होते खोल काळोख्या गुहेत कावळे पंख झापडत त्याला टोचा मारायच्या प्रयत्नात ते मिट्ट मख्ख , आपल्याच नादात त्याच्या ताकदीचा अंदाज काळोखात लुप्त अदृश्य केविलवाणा ...!! मी पाहत होतो त्याची केविलवाणी धडपड जगण्यासाठी त्याची ठाम धडपड आटोकाट .... सतराशे साठ कावळे नि ते एकटे घुबड आंधळे तरी झुंझत होते
काव्यरस

माननीय थत्ते काकांनी लिहिलेल्या "भाषेवरील लेखाच्या" विडंबनाचा प्रयत्न.

लेखक गांधीवादी यांनी शुक्रवार, 18/02/2011 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय नितीन काकांनी नुकताच भाषेवर एक लेख लिहून बरीच करमणूक केली. हसून हसून पोट दुखले. त्या लेखाच्या विडंबनाचा प्रयत्न करत आहे. तसे आम्ही जात्याच नुर्बुद्ध. तरीसुद्धा हे विडंबन गोड मानून घ्याल अशी अपेक्षा ठेवतो. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. भारतातल्या राजकीय क्षेत्राचा आता (फ़ार चांगला) काल आला आहे.

जागतीक मराठी भाषा दिन -२७ फेब्रु. २०११

लेखक धमाल मुलगा यांनी शुक्रवार, 18/02/2011 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम गावकरीहों! काय? कसं काय चाललंय? बैजवार हाय न्हवं? :) आता तुम्ही म्हणाल, हा धम्या अस एकदम हाळ्या देत का आलाय बा! तर त्याचं असंय मंडळी, पुढचा आईतवार म्हणजे २७ फेब्रुवारी; म्हणजे आपल्या लाडक्या कुसुमाग्रजांचा जन्मदिन. हाच दिवस 'जागतिक मराठी दिन' म्हणून साजरा केला जातो. तुम्ही-आम्ही मराठीच, आपलं मौजे मिपागाव पक्कं मराठमोळं! म्हणजे जगतिक मराठी दिनाचा सण आपल्या मिपावर साजरा होणारच. :) आपण मिसळपाव.कॉमवर २७ फेब्रु.२८ फेब्रु.,आणि १ मार्च असे तीन दिवस मराठी भाषा दिन सोहळा साजरा करणार आहोत. ह्यामध्ये आपण मराठीसंदर्भात निरनिराळे लेख, कविता लिहूया.

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ६

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 18/02/2011 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक रिकामी जागा बघून मी टेकतो न टेकतो तर दाण दाण दाण असा पावलांचा आवाज करीत प्रोफेसरसाहेब वर्गात शिरले. त्यांच्याहि हातात असलेलं ते जाडजूड पुस्तक त्यांनी धाडकन त्यांच्या पुढ्यातल्या टेबलावर आदळलं. सगळ्या वर्गाकडे बॅटसमन जशी फिल्डींग बघून घेतो तशी नजर फिरवली. आणि अतिशय घनगंभीर आवाजात बोलायला सुरवात केली, "धिस इज ऑरगॅनिक केमिस्ट्री ९०१ क्लास!! फॉर दोज ऑफ यू हू डिड नॉट नो दॅट, धिस इज द राईट टाईम टू गेट अप ऍन्ड गेट लॉस्ट!!" कुणीच उठलं नाही. बहुदा सगळ्यांना आपण कुठे आलोय हे माहिती असावं!! "गूड!! माय नेम इज जॉर्ज कॉल्डवेल!! आय हॅव बीन टीचिंग धिस क्लास फोर द लास्ट टेन इयर्स!

व्य॑गचित्र

लेखक प्रदिप आवाड यांनी शुक्रवार, 18/02/2011 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार !! मि.पा.कर...... गेल्या २ महिन्यापासुन मि.पा.वर दाखल होण्याचा प्रयत्न करत होतो. आज प्रयत्नास फळ आले. तसा व्य॑गचित्रे काढण्याचा छ॑द महाविद्यालयीन जिवनापासुनच आहे. यापुढे माझी नव्-नविन विषयावरील व्य॑गचित्रे तुमच्या सेवेत हजर असतील. प्रतिक्रिया देण्यास मात्र विसरु नका. धन्यवाद ! प्रदिप आवाड

पुणे मुम्बई दोन तासात सायकलव..........

लेखक मनराव यांनी शुक्रवार, 18/02/2011 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
विनोद पुनामिया या इसमाने...........अवघ्या दोन तासात सायकलीव पुणे डोंबिवली अंतर कापलं अन लिमका वाल्यांनी लगेच नोंदणी करून घेतली............ द्ख्खनच्या राणी पेक्शा हि कमी वेळात साहेबांनी डोंबिवली गाठलं.......... अता दिल्ली मुम्बई ३० तासात कारायचा मानस हाय यांचा.......... अधिक तपशील या दुव्यावर...... पुणे मुम्बई दोन तासात सायकलव..........

तरीही लिहा..

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शुक्रवार, 18/02/2011 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
कागद म्हणतो लिहा , लेखणी म्हणते लिहा, दौतीतली शाई म्हणे लिहा लिहा अन लिहा काळजातल्या तक्रारी फुंकर मागतात, अंधारातले कोपरे उजेड मागतात, मग, लिहा लिहा अन लिहा अवघडलेले शब्द वाटा मागतात, नेहमीच्या वाटा बदल मागतात, मग, लिहा लिहा अन लिहा. मन म्हणते मला सुचत नाही, गाणे म्हणते तुला जमत नाही, कोणी म्हणे ताल नाही, कोणी म्हणे चाल नाही, तरीही, लिहा लिहा अन लिहा.