अंदाज पंचे दाहोदरसे
उद्या पहीला सामना भारत विरुध्द बांगलादेश. यावेळी सट्टा बाजारात भारतात तरी फेव्हरीट मध्ये सगळेजण इंडीया -इंडीया म्हणत आहेत. भारतला विश्वविजेपद मिळण्याचा भाव आज सकाळी तीन रुपये वीस पैसे होता. श्रीलंकेचा पाच रुपये तर इंग्लंडचा साडेसात रुपये. जर इंग्लंड चषक घेऊन जाईल असे तुम्हाला वाटत असेल तर लावा हजार रुपये. जर तसे झाले तर तुम्हाला साडेसात हजार मिळतील. भाव कमी म्हण्जे शक्यता जास्त. हे सगळे भाव काल रात्रीचे आहेत. सामना सुरु झाल्यावर प्रत्येक षटकानंतर भाव बदलत राहतील. नो बॉल -लेग बाय- एलबीडब्लु चे भाव तत्काल मध्ये बदलत राहतात. एकूण साठसत्तर हजार कोटी रुपयाचा सट्टा यावेळी होईल असा अंदाज आहे. असो.
आपणही थोडा करू या सट्टा. असा सट्टा की ज्यात प्रत्येकाला भाग घेता येईल .अगदी खेळाडू आणि हंपायर मधला फरकही कळत नसला तरी चालेल असा सट्टा. एका पैशाचेही नुकसान होणार नाही आणि एका पैशाचा फायदा पण होणार नाही.अर्थात या विश्वकपाच्या संपूर्ण सट्ट्यात जिंकून जास्तीत जास्त गुण मिळवणार्यांचा गुणगौरव आपण करूच.
चला तर खेळू या अंदाज पंचे दाहोदरसे .
उद्याच्या सामन्यात बांगलादेशी फलदांजापैकी एकतरी खेळाडू धावांचे शतक पूर्ण करील.
जर तुम्हाला असेच वाटत असेल आणि तसे झाले तर ....दहा गुण.
उद्याच्या सामन्यात भारतीय फलंदाजापैकी एक तरी खेळाडू शून्यावर बाद होईल.
अंदाज करा . हो किंवा नाही .विजेत्याचे गुण ...पाच .
उद्याचा जॅकपॉट प्रश्न
उद्याच्या सामन्यात पाऊस पडल्यामुळे खेळाडू एकदा तरी तंबूत परत जातील. बघा हवामान सांगणारी संस्थळे आणि वर्तवा आपला अंदाज. पावसाच्या बाजूने अंदाज जिंकणार्याला शंभर गुण आणि सामन्याचा उत्कृष्ट अंदाज-वर्तक ही पदवी.
ही मी एक सुरुवात केली आहे .आपले अंदाज प्रतिक्रीयेतून द्यावेत. सामना सुरु होण्यापूर्वी द्यावेत. परवा गुणांकन करू या .
चला खेळू या अंदाज पंचे दाहोदरसे.
Sports Tag
वाचने
20360
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
नेहरा खेळायला आला तर तो शून्य
रामदासकाका, आपले अंदाज
In reply to रामदासकाका, आपले अंदाज by असुर
आपले घोडे सेम लेन मध्ये.
In reply to आपले घोडे सेम लेन मध्ये. by गणपा
मी पण
पहिल्याचं उत्तर - हो. (आपला
In reply to पहिल्याचं उत्तर - हो. (आपला by मेघवेडा
+१
In reply to +१ by छोटा डॉन
>>>उत्तम उपक्रम आहे, मजा
In reply to +१ by छोटा डॉन
मॉड्यूल?
In reply to मॉड्यूल? by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी असंच डोक्यात आलं. जसं
In reply to अगदी असंच डोक्यात आलं. जसं by प्राजु
चालु आहे ...
In reply to +१ by छोटा डॉन
डानराव अजून शाळेतली सवय जात
उत्तर
>>>>उद्याच्या सामन्यात
In reply to >>>>उद्याच्या सामन्यात by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to +१ by टारझन
:)
उद्या एकही बांग्लादेशी खेळाडू
अंदाज माझा
अरे वा चान धागा!
१ - बांगला खेळाडू शतक - हो
छे छे कोणीच रिस्क घ्यायला
मी प्पण....
धोनीच नशीब त्याच्या गत