Skip to main content

सुकलेल्या मातीवर...

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 25/02/2011 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या गल्ली च्या मागेच होते त्या कुंभाराचे घर तसे फारसे मोट्ठे नव्ह्ते, तरी घडवले होते त्याच हातानं..गोल फिरणार्या.. वेळे च्या चाकावर..निरंतर मुले होती त्याला दोन.. त्या दोघानाही नव्हते रस माती पिळण्यात.. त्यांची तोंडं बाहेर दिशेस बघणारी कालांतरानं माती ही झाली होती कडक नव्हती वळत... त्याची बायडी मात्र धीर द्यायची त्याला म्हणायची, घडले ते घडले हातानं आपल्या आता जीव नका वळवू चाकावर अन मग धरायची हाथ त्याच्या घामाळलेल्या माथ्या वर चाक थांबायचेच जणू क्षण भर आपल्या पदरानं त्याचा घाम पुसून उठायची ती अन हसायची अलगद.. चेहर्यावरच्या तिच्या रेगा पसरायच्या अन चाकावरच्या भेगा अजुनच उठून दिसायच्या.. आ

मावळला तो तारा...

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 25/02/2011 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
तारकांच्या गर्दित हरविले किती तारे अल्प, अगणित, असावेत किती सारे एक तुटला आजही... कळाले? मावळला तो..त्याच्याच कक्षेत... न सांगता...बोलता न त्यास यावे! न भय, न मोह, न सुख, न दुक्ख पलीकडे तो..प्रवास सपंवून गेला सुटला...? कि आडकला पुन्हा? चमकेल का तो पुन्हा..चमकेलही आम्हा आता त्याची उणीव छळे!!

जाग!!

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 25/02/2011 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
काळी जाड रग घेउन पसरलेली ती म्हणते कशी, येशील का निजायला निजलोच कुठे मी, मग एका कुशीवर सावरत, मोजत बसलो त्या चुरघड्या आंथरुण सरकले, पांघरुण निसट्ले उघडाच मी मग उजेडास सापडलो उठता धडकलो मग, चालता धडकलो चोळता डोळे, कोण पुढे बघायला... वाटा गेल्या कामावर, पाणी नळाला प्रश्नच पड्त गेले अंतरी चे जगायला... शोधत बसलो मग बंडी, शर्ट, झब्बा अन विसरलोच आरसा बघायला... ती दिसली पुन्हा मज मोहक, तरुण सरसावली मज ती मिठीत घ्यायला उशी खाली होती लज्जा, निडर मी गुंतलो मग तिला उलगडायला...!!

...अस्तित्व माझे

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 24/02/2011 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे बसू कसा पंक्तीत तुमच्या, बदनाम अस्तित्व माझे निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे माणसांच्या कल्लोळात हरविले मनाचे स्वैर बंध भासांच्या ताटव्यात, सुनसान अस्तित्व माझे सुगंधाच्या मायाजाळात अडकली फ़ुलपाखरे झुगारले नभाला असे, बेगुमान अस्तित्व माझे रात्रीस, सांजवेळी साद घालतो जख्मी सूर्य झाकोळले अंधारात, दीपमान अस्तित्व माझे छप्परविरहीत घरट्यात उभ्या असंख्य भिंती नभांकणात विखुरले, बेभान अस्तित्व माझे स्वरविरहीत शब्दांचे उठते निशब्द क

समजत नाही..

लेखक गवि यांनी गुरुवार, 24/02/2011 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
जांभुळ संध्या गडद निळाई.. कुपात बूर्ज्वा मंडूक राही.. वरील काही समजत नाही.. चक्षु मुमुक्षु आर्त प्रवाही.. सुके धुके परि वखवख काही.. वरील काही समजत नाही.. प्रसव वसव किती वेणा साही.. पार्थिव देही गांडीव वाही.. वरील काही समजत नाही.. जूनून बोसा इश्क तबाही.. शब्द घोळ अन काही बाही.. वरील काही समजत नाही..

मला काय त्याचे, मला काय त्याचे

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 24/02/2011 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
मला काय त्याचे, मला काय त्याचे
लोकलमध्ये मला मिळाली सिट खिडकीमधून हवा येते निट एक अपंग उभा आहे मला काय त्याचे, मला काय त्याचे ||१|| वरणभात, शिकरण केले आज जेवन मस्त झाले दुसरा गरीब उपाशी का असेना! मला काय त्याचे, मला काय त्याचे ||२|| भाज्याधान्य महाग झाले मी मात्र खरेदी केले शेतकरी आत्महत्या करीनात का! मला काय त्याचे, मला काय त्याचे ||३|| "कार ट्रक च्या अपघातात सहा ठार" "देवीच्या यात्रेत बोकडबळी फार" बातम्या नेहमीच्याच झाल्यात मला काय त्याचे, मला काय त्याचे ||४|| आज सिनेमॅक्सचा चित्रपटाला जायचे आहे

आयुष्यावर बोलू काही ....

लेखक प्राजक्ता पवार यांनी गुरुवार, 24/02/2011 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी कलाकृती मग ती कविता असो , चित्रकाराने रेखाटलेले चित्र , गायकाने गायलेले गाणे वा एखादा लेख रसिक मनाला आवडला की त्या रचनाकाराला दाद ही मिळतेच.कधी ती टाळ्यांच्या स्वरुपात तर कधी बोलुन . आज या लेखनप्रपंचाचा उद्देशदेखील हाच. आयुष्यावर बोलु काही ( प्रयोग ५०० ) या सलील कुलकर्णी व संदीप खरे यांच्या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी . तुमच्यापैकी बर्‍याचजणांना ही गाणी माहित असतील , आवडत असतील. मला मात्र जरा उशिराच का होइना पण या महफिलीचा आनंद लुटायला मिळाला. त्याला कारणही तसेच घडले. बर्‍याच दिवसांनी जरा दोन दिवस सवड काढून मी हॉस्टेलच्या मैत्रिणीला भेटायला आले होते.

पाखंडी लोकांच्या प्रश्नांचे उत्तरे

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 24/02/2011 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आज अनेक दिवसांनी मिपावर चक्कर टाकता पुर्वीचे लेखन वाचले. हैयोंहैयैयोनी प्रकाशकाका घाटपांड्यांना उद्देशून केलेले खालील आवाहन पुन्हा जागृत करून त्यावर त्यांची सकारात्मक प्रतिक्रिया अपेक्षित आहे. या धाग्याला उपसून काढायला कूटन लिपीच्या बेसनलाडूंचा धागा हे कारण. आणखी एक कारण असे की उपक्रमवर दिवाळी२०१० अंकात नाडीग्रंथ अभ्यासकार्यावर जन्मदिनांक व नवग्रहांची नाडीताडपट्यातील मांडणीवरील हैयोंचा प्रकाशित लेख.

खारूताई, खारूताई !

लेखक विदेश यांनी गुरुवार, 24/02/2011 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
खारूताई, खारूताई! पळापळीची कित्ती घाई ! झुपकेदार शेपटीची- ऐट भारी हो तुमची ! बघुन टकमक इकडेतिकडे तुरु तुरु पळता कुणीकडे ? आज्जीची गोष्ट ऐकली आम्ही- रामाला मदत केली तुम्ही ! इवलीशी ताई, काम खूप मोठ्ठे- पाठीवर पाहू द्या ना रामाची बोटे !!