गीर - सिंहांच्या देशात
गुजरात पर्यटन विभागाची रेडीयो मिर्ची वरील अमिताभ बच्चन च्या धीर गंभीर आवाजातील गीर ची जाहीरात ऐकून माझ्या पुण्याच्या मेव्हण्याने कल्पना पुढे मांडली - गीरला जाण्याची. ताबडतोब फोनाफोनी झाली आणि संक्रांतीला जोडून आलेल्या रविवार आणि सोमवारी जाण्याचे नक्की झाले. नेटवर हॉटेल बुकिंग झालं, लायन सफारी बुकिंग झालं.
गीर पासून जवळ ४० कि,मी. वर आहे सोमनाथ - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि ६० कि. मी वर आहे दीऊ. आम्ही दीऊला आधी जाऊन आलो होतो म्हणून या वेळी फक्त गीरला जायचं ठरलं.
मिसळपाव
मुंब्रा देवी मंदिर
पायर्या चढताना डोंगरावर मर्कट लिला चाललेल्या दिसल्या, या नमुन्याला पटकन टिपला.