समिधाच सख्या या...
राम राम मंडळी
आज २७ फेब्रुवारी.
वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष म्हणूनही साजरे होत आहे. त्यांचा जन्मदिवस आपण मराठी दिन म्हणुन साजरा करतो. या निमित्ताने अनेक दिग्गज कवी, लेखक आपल्या साहित्यकृती रसिकांसमोर सादर करतील. अनेक मान्यवर आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेने त्या सर्व कलाकृतींचा आस्वाद घेतील.
ह्या सर्व सरस्वती पूजनामधे माझे हे एक साधेसे फुल. सादर करत आहे कुसुमाग्रजांच्या काही कवितांबद्दल माझे विचार आणि मुळातल्या त्या कविता. त्यात बुद्धीनिष्ट निरुपण नसेल की रसास्वादाच्या सर्व पदरांना स्पर्श नसेल.
विशेष
मिसळपाव