Skip to main content

मज आठवता मग

लेखक निनाव यांनी गुरुवार, 03/03/2011 04:25 या दिवशी प्रकाशित केले.
दर्या किनारी फिरत होतो काल रात्री किंचित सा चिंतितच होतो मी कुणास ठाउक का? एकटाच होतो मी.. न पुढे कोणी, न मागे सावली होती सोबत न माझी इतुका एकटा मी... ऐकत होतो लाटांचे गीत पायाखाली तारकांच्या वाटा रात्री च्या अंधारात असा काही बघत होतो लांब जणु दिसत होते सगळे - लपलेले नव्हे......हरवलेला मी !!! खरं सांगु? मज आठवता मी तु ही आठविलीस मला न आठविली असतीस तर कुठे आदळल्या असत्या त्या लाटा? आहोटी चा भरती नं धरला होता हाथ जाता जाता... त्या थंड-ओलसर हवे नं नुसता गार पडलो होतो मी... जरुरीचेच होते तसे म्हणा... इतुके भाजले होते मनास त्याचा गुन्हेगारच ठरलो होतो मी.. चालत होतो पुढे... अन मागे पाउले उमट

मराठी चित्रपट

लेखक उगा काहितरीच यांनी गुरुवार, 03/03/2011 03:23 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात चित्रपटांची सुरुवातच मुळी मराठी मानसाने (मान्सांनी) केली. तरी आज मराठी चित्रपट किंवा वाहिन्या पाहतांना हसावे का रडावे तेच कळत नाही. काही काही चित्रपट पाहतांना वाट्ते की मराठी चित्रपट हॉलिवुड पेक्शा सरस आहे (कथेत बर्का तंत्रज्ञानात नाही) उदा श्वास , चेकमेट . परंतु कधी कधी वाट्ते का चित्रपट तयार करतात हे लोक? ना बजेट ना कथा ! उदाहरण द्यायच तर नाथा पुरे आता , जाउ तिथं खाउ . मराठी चित्रपट वाहिन्याही सारखे सारखे तेच चित्रपट टाकुन बोर करतात. यांच्या जवळ सिड्या नसतात का? मराठीत एकही सुपरस्टार का नसावा ? सर्व मराठी कलाकारात तोचतोचपणा का?

एकविसाव्या शतकातली कहाणी

लेखक कोमल यांनी बुधवार, 02/03/2011 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
एक आहे ही गोष्ट, आटपाट नगरीची यामद्धे आहेत अर्थातच, एक राजा- एक राणी ! पूर्वी सारखं नव्हे बरं,एकच राजा आणि एकच राणी, एकविसाव्या शतकांत असते, प्रत्येकाची स्वतंत्र नगरी,स्वतंत्र कहाणी! आपल्या गोष्टितल्या राजाला,राणी आवडली अगदी सहजच आणि राणीनेही संमती दिली,थोड्या हित्गुजांताच ! दोघांची मग सुरु झाली स्वतंत्र कहाणी, दोघांची नगरी, हिच्या मनाचा "तो" राजा, त्याच्या मनाची "ही" राणी, उघड्या डोळ्यानी दोघांनी,संसाराची स्वप्नं रचली, आई-बाबा वगैरे ठीक,पण बाळाची सुद्धा नावे ठरली ! प्रत्येक गोष्ट दोघांच्या मताप्रमाने,मनासारखी घडत होती, राजा-राणी आणि त्यांची दुनिया एकमेकाताच गुरफतात होती ! राजाच्या घरी द
काव्यरस

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-३)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 02/03/2011 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१) दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-२) संगीत दिग्दर्शक- एन. दत्ता.
एन. दत्ता उर्फ दत्ता नाईक हेसुध्दा दत्ताराम वाडकरांप्रमाणे मुळचे गोवेंकर. सचीन देव बर्मन यांचे सहाय्यक म्हणून अनेक वर्षे काम केले. त्याच बरोबर स्वतंत्र संगीतकार म्हणून अनेक अवीट गोडीची गाणी दिली. राज खोसलांचा मिलाप (१९५५) या चित्रपटामधून स्वतंत्र संगीतकार म्हणून पदार्पण केले.

ब्रिगेडी वृत्ती

लेखक अँग्री बर्ड यांनी बुधवार, 02/03/2011 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रिगेडी वृत्ती जेवढी वाढत आहे तितकाच क्लेश महाराजांच्या आत्म्याला होत असेल नाही का ?

प्रसिद्धी

लेखक वपाडाव यांनी बुधवार, 02/03/2011 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्धी मिळालेली पण वंगळी/वक्टी /आचरट/बिभत्स/छिछोर गाणी मुद्दामच लेखाचं नाव अर्धवट ठेवलं. नाहीतर वरूनच कळुन जायचं कि आत काय लिहिले आहे.

सराईत

लेखक अर्धवट यांनी बुधवार, 02/03/2011 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
आताशा सुंदर लागलाय स्वर वगैरे.. सगळं कसं छान चालू आहे हसतमुखानं यशाच्या छटा मोजत मस्त सरकतोय दिवस. माझ्याकडे यांव आहे आणि मी त्याला त्यांव दिलं. हिशोबाच्या कागदाचा मनात लागलाय ढीग. थुंकी झेलणारे झेलतायत.. असुयेच्या आठ्या सुखावून जातायत . मित्रांचाही आहेच की घोळका... सगळं कसं छान चालू आहे . मारायला शिकतोय की नकोसे विचार, हव्याशा प्रलोभनांच्या बदल्यात. खूप ताकद आहे अजून.. लांब धाव घ्यायची.. जवळच्या नात्याची मिठी फक्त सोडवायची सुखाच्या व्याख्या बदलतायत, नजर अजून रुंद होतेय.. घाव अजून खोल. जल्लोष होतोय धुंद.. दरडावून विचारणारा आवाज क्षीण होत जातोय. प्रशस्त होतायत रस्ते...
काव्यरस