Skip to main content

आंब्याच गाणं..

लेखक ओंकार देशमुख यांनी बुधवार, 16/03/2011 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
आता आंब्याचा सीज़न सुरु होईल. म्हणुनच हे ख़ास हे आंब्याच गाण आज लिहित आहे. हे मला माझ्या आजीच्या वहीतून मिळाल.
काव्यरस

पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- २)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 16/03/2011 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- १) दुसरे कोकण...पण अशांत! आसामात मोरीगावातल्या मिंटुरंजन डेका या मित्राच्या घरी जाण्याचा योग काही वर्षांपूवीर् आला. मुख्यत: बांबूचा वापर केलेलं दुमजली घर. गंमत म्हणून घराच्या वरच्या मजल्यावर गेलो. तिथे बरीचशी अडगळ व एक छोटेखानी बोट दिसली. ब्रह्मापुत्रा सहा किलोमीटर अंतरावर असताना घरात ही नौका कशाला, असा प्रश्न मला पडला. मित्रानं त्याचं उत्तर दिलं. पावसाळ्यात पूर आला की ब्रह्मापुत्रा नदी सैरभैर होते. तळमजला पाण्याखाली जातो, मग मुक्काम पहिल्या मजल्यावर.

'शोले' चा खास थिएटर शो

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी बुधवार, 16/03/2011 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
पंचम मॅजिक पुणे तर्फे रविवार दि. २० मार्च रोजी फिल्म संग्रहालय थिएटरमध्ये 'शोले' चित्रपटाचा खेळ आयोजित केला आहे. वेळः सकाळी १० वाजता. तिकिट रु. ५०/- फक्त. इच्छूकांनी मला व्य.नि द्वारे अथवा मोबाईलवर लवकरात लवकर संपर्क साधावा.

[ज्योतिष] ४ एप्रिलचा गुढीपाडवा- हिंदूंचा नववर्ष दिन अशुभ

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 16/03/2011 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीयांच्या मुहूर्तांसंबंधी काही चमत्कारिक कल्पना आहेत. त्या ठाम विश्वासाने ते पाळतात. गुढीपाडवा, दसरा कोणत्याही ग्रहयोगात सापडला असला तरी ते त्याला "शुभ"च मानतात. कोणत्याही पंचांगकर्त्या ज्योतिर्विदाने याची दखल घेतलेली मला तरी आठवत नाही. आता हेच बघा! दिनांक ३ एप्रिल २०११ रोजी सायन मेष राशीत १३ अंश ३३ मि वर अमावस्येची चंद्र-सूर्य युती होत असून ही अमावस्या अनेक अशुभ योग करते.

आत्ममग्न

लेखक चित्रा यांनी बुधवार, 16/03/2011 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियकरामागून जातेस नीऑन रंगांच्या दरवाज्यातून बेदरकारपणे - होतेस स्वार - गार वार्‍यावर, मागे उडणारी रंगीत वस्त्रे सावरण्याची शुद्ध नाही तुला कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे? * एकटीच असतेस पांढर्‍या गजांच्या खिडकीसमोर निर्विकारपणे - शहारतेस - गार वार्‍याने, पारदर्शक वस्त्रांतून काटकुळे अंग दिसू नये याची शुद्ध नाही तुला कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे? *
काव्यरस

आठवणी ... !!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 16/03/2011 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी असतात मनात दडलेल्या येतात अचानक नकळत मनाच्या काठावर अलगद पावलांनी नि येतात समोर अनाहुतपणे..... आठवणी कधीकधी भासाच्या कधीकधी त्रासाच्या मनात रुजलेल्या पिंपळाच्या झाडासारख्या खोल पसरलेल्या घट्ट खोल मुळांच्या काही आठवणी नाजूक प्रेमाच्या अलगद मोरपिसी आठवणीच्या अल्लड पाउस नि तिच्या सोबत चिंब चिंब भीजल्याच्या गरमागरम चहाच्या आठवणी नाही होत कधी शिळ्या नाही उडत त्याचा रंग त्या असतात रंगीत आंबट चिंबट मस्त चवीच्या …! आपले जुने मातिचे घर आठवणीतून अलगद येते वर ती श्रावणातील सकाळ परीक्षेचा पेपर....
काव्यरस

कुठे गेली सगळी माणसे

लेखक निनाव यांनी बुधवार, 16/03/2011 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे गेली सगळी माणसे नाहिच कसे कुणी मज दिसेना? तो पान वाला पण दिसत नाहिये आज ज्याच्या दुकाना च्या बाहेर उभे राहुन विविध आकॄत्यांमधे ...धुर उडायचे ओठांचे चंबु मग शुन्यात बसायचे बाजार ही रिकामेच दिसते आहे आज कुणास ठाउक का? न ते आवाज न ते गोंगाट सगळे संपले कि..विकले गेले आज? तिथं त्या कडु-लिंबाच्या बाजुला असायचा एक -बस-थांबा तो ही दिसत नाहिये मला प्रवासी गेले आहेत निघुन कि संपले आहे प्रवास? डोंबारीच दिसत आहेत फक्त आज ओसाड रस्त्यांवर मला तोल सांभाळतांना हसत आहेत का त्या दोरी चीच आहे कास? मारुन पाहिल्या हाका त्यांना पण कुणी काही बाहेर येईना जात नसेल का माझा आवाज कि यायचेच नसेल त्यांना? कुठ

पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- १)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 16/03/2011 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
ईशान्य भारतातील जनजातींचे पुनरुत्थान ही विश्वास कल्याणकर यांचा धागा वाचल्यावर मला मागच्या वर्षी महाराष्ट्र टाइम्स मधे आलेली लेखमाला आणि लोकप्रभामधील एका लेखाची आठवण झाली. हे लेख मी संकलीत करून ऑर्कुटवर एका समुहावर ठेवले होते.