Skip to main content

एक संध्याकाळ

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 18/03/2011 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
४ वाजतात. मी पीसी बंद करून उठतो, ऑफिस मधल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. अरे हा आज इतक्या लवकर कलटी? मी त्या नजरा जाणीवपूर्वक टाळतो.आज मनस्थितीच विचित्र असते, त्यात अजून बसून काम करणं मला तरी निदान शक्य नसतं . कामाचं टेन्शन झेपत नाहीये कि बाकीच्या टेन्शन मुळे काम झेपत नाहीये , काहीच कळत नाहीये. खाली येतो आणि बाहेर चालू लागतो, बाहेर भन्नाट हवा सुटलेली असते, पण सगळे उष्ण वारे , हम्म उन्हाळा सुरु झाला तर मी स्वतःशीच पुटपुटतो. आज चालत जाऊया नाहीतरी लवकर निघालो आहे.

पुरणपोळी होळी स्पेश्यल :)

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 18/03/2011 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
मीली ने पुरणपोळी ची पा़कृ दिली आहे तरी सण म्हणून मीसुद्धा पुरणपोळी ची पा़कृ देत आहे. घरोघरी सगळ्यांची आवडती पुरणपोळी :) सावधान!!

जर्मनीतील एक अहिंसक आंदोलन ( सोशल नेटवर्क चे अपत्य )

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी शुक्रवार, 18/03/2011 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनीत २०२२ मध्ये सर्व अणू भट्या बंद करून त्याजागी अपारंपरिक उर्जा स्त्रोत वापरायचे .असे जर्मन सरकारचे धोरण होते . त्याला मोडता घालत ह्या अणू उर्जेला जीवदान मिळावे असा निर्णय सरकारने घेतला . मुळात अपारंपरिक उर्जा स्त्रोत जर्मनीत समर्थ पर्याय म्हणून पुढे येत आहेत .ओबामा ह्यांनी स्वतःच्या देशात व जगात ह्या उर्जा स्त्रोतांचा वापर वाढण्यास उत्तेजन देत आहेत . परिणामी जर्मनीत सरकारच्या निर्णयाविरुद्ध एक संताप निर्माण झाला .आभसी जगतात तो व्यक्तही करून झाला . आणी .... जर्मन सरकारच्या निर्णयाविरुद्ध १४ मार्चला १ लाख हून जास्त लोक जर्मनीत विविध शहरात रस्त्यावर आली .व अहिंसक मार्गाने निदर्शने केली .व

होळी रे होळी पुरणाची पोळी!

लेखक मीली यांनी गुरुवार, 17/03/2011 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच श्रीखंडाची रेसिपी वाचली,भारी आहे पण म्हटले चला होळी आहे तर पुरण पोळी हवीच नाही का.(रेसिपी रिपीट असली तर रिपीट चालवून घ्यालच अशी अपेक्षा!) साहित्य :हरबरा डाळ १ कप , अडीच कप पाणी , १ कप किसलेला गुळ, २ कप गव्हाचे पीठ , १ चमचा एव्हरेस्ट दुध मसाला/वेलची पूड कृती : हरबरा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी. त्यातले पाणी काढून त्यात किसलेला गुळ घालावा व मंद आचेवर गरम करायला ठेवावे.त्यात एक चमचा दुध मसाला घालावा याची चव मस्त येते. नाहीतर व

आँ?! हे काय हो तुकोबा?

लेखक मन यांनी गुरुवार, 17/03/2011 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
अहो हे काय हो तुकोबा? मी तर तुम्हाला संत तुकाराम म्हणुन ओळखतो. तुमचे विठ्ठल भक्तीचे ( क्वचित राम- कृष्ण ह्यांचा उल्लेख असलेले) आणि बर्‍याच वेळेस सामाजिक अंधश्रद्धेवर कोरडे ओढणारे , रोखठोक अभंग मी ऐकत आलोय. तुमच्या लिखाणात एकदम "अल्ला " हा शब्द दिसला आणि आश्चर्य वाटलं.

वय

लेखक शुचि यांनी गुरुवार, 17/03/2011 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
वरील मंडल श्रेयअव्हेर - सौजन्य जाल नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई आपल्याला उमजते? नक्की कोणतं वय असतं जेव्
काव्यरस

श्रीखंड

लेखक स्मिता. यांनी गुरुवार, 17/03/2011 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
'श्रीखंड' शब्द वाचूनच कसं शांत, शीतल वाटतं ना! बहुतेक मराठी जनतेचा आवडीचा पदार्थ आहे हा. मलासुद्धा श्रीखंड फार आवडते. योगायोगाने मिपावर अजूनपर्यंत कोणी त्याची पाकृ टाकलेली नाही (मला तरी सापडली नाही). त्यामुळे मीच हा विडा उचलला (सोपी पाकृ आहे ना ;)). असंही भारतात आता उन्हाळ्याला सुरुवात होतच आहे... तेव्हा आज बनवूया श्रीखंड! साहित्यः दही - ५०० ग्रॅम बारीक साखर - २ मोठे चमचे जाडसर वेलची पूड - १/४ लहान चमचा दूध - १/४ कप सजावटीसाठी सुका मेवा - बदाम, काजू, पिस्ता यांचे काप, बेदाणे, चारोळी, इ. (आवडीप्रमाणे) मलमलचे किंवा मऊ सूती स्वच्छ कापड कृती: श्रीखंडाची पूर्वतयारी ६ ते ८ तास आधीच करावी लागते.

सांधण दरीला

लेखक VINODBANKHELE यांनी गुरुवार, 17/03/2011 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
सांधण दरीला गुप्चुप जाउन येउन आम्हाला जळवनार्यांचा झाईर णीशेध...................................... मंचर मधुन , नारायण गाव मधुन जाउन सदर ईसमांनी जी फोटोतील मिस़ळ सद्रुश्य वस्तु खाल्ली त्या बद्द्ल पन झाईर णीशेध, त्या वस्तु पेक्शा वरिजनल मिसळ मंचरला विसावा हाटीलात आन नारायण गाव ला मारुतिसुझुकीच्या शोरुम जवळील माउलि हाटीलात पयल्या धार ची भेटतीया. तवा परत जातानी आमास्नी न्हेल नाई तरि तर्री वाली मिसळ आमच्या बरुबर खायाला जरुर खरड लिवा.

गड्या गाव बरा

लेखक मॅक यांनी गुरुवार, 17/03/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मी गावी गेलो होतो.......(नोव्हेंबर मध्ये ) त्यावेळी गावी भरपूर शेते,फळझाडे ,फुलझाडे बहरलेली होती.... त्याचे मी माझ्या नजरेतून काढलेले हे काही फोटो ......... बघा आवडले तर......... १) पेरू २) भुईमुग शेंग

मारुती ची नावे

लेखक जय - गणेश यांनी गुरुवार, 17/03/2011 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थ रामदास स्वामी नी गावो गावी मारुती ची स्थापना केलेली आहे. आज जवळ जवळ सगल्या गावा मधे मारुती मंदीर आहे. आणी प्रत्येक गावातल्या मारुती चे नाव पण वेगळेच आहे. आपण पाहिलेल्या, दर्शन घेतलेल्या, वाचलेल्या मारुती ची नावे सांगावीत. ...जय - हनुमान.