आत्ताच श्रीखंडाची रेसिपी वाचली,भारी आहे पण म्हटले चला होळी आहे तर पुरण पोळी हवीच नाही का.(रेसिपी रिपीट असली तर रिपीट चालवून घ्यालच अशी अपेक्षा!)
साहित्य :हरबरा डाळ १ कप ,
अडीच कप पाणी ,
१ कप किसलेला गुळ,
२ कप गव्हाचे पीठ ,
१ चमचा एव्हरेस्ट दुध मसाला/वेलची पूड
कृती :
हरबरा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी.
त्यातले पाणी काढून त्यात किसलेला गुळ घालावा व मंद आचेवर गरम करायला ठेवावे.त्यात एक चमचा दुध मसाला घालावा याची चव मस्त येते.
नाहीतर वेलची पूड घातली तरी चालेल.
वरील मिश्रण घट्ट झाले की थंड होवू द्यावे.वर मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
एक चमचा तेल लावून कणिक सैलसर मळून घ्यावी.
कणकेची पारी करून पुरणाचा गोळा भरून सर्व बाजूनी पारी बंद करावी.मी मोदकाचा आकार देवून पारी बंद करते.
मग पोळी लाटावी आणि तव्यावर खरपूस तूप लावून भाजावी.
दुध किंवा दह्याबरोबर मस्त लागते पुरण पोळी.
उन्हाळ्यात हापूस आंब्याच्या रसासोबत तर विचारायलाच नको!
वाचने
11874
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
जगदंब .... जगदंब
तुला पहिलाच प्रतिसाद असा
In reply to जगदंब .... जगदंब by टारझन
पुरणपोळी दह्यासोबत खातात??
प्राजुताइ शि सहमत बाकि
In reply to पुरणपोळी दह्यासोबत खातात?? by प्राजु
आमची पुरणपोळी!
आहो मिली ताई , तसं नाही !
In reply to आमची पुरणपोळी! by मीली
पुरणाची डाळ मिक्सरमध्ये
प्राजूशी सहमत आहे
पुरणपोळी दह्याबरोबर? नवीनच
बटाटा मॅशर
In reply to पुरणपोळी दह्याबरोबर? नवीनच by रेवती
हो 'फूड मिल' म्हणून चौकशी करू
In reply to बटाटा मॅशर by आनंदयात्री
भूक चाळवल्या गेली! झकास!
कणिक वापरुन केलेली पुपो
पुरणपोळी दह्या बरोबर? काहीतरी
पुण्यामधे खाल्लेल्या
In reply to पुरणपोळी दह्या बरोबर? काहीतरी by अनामिक
नाही गं तै... एका कोब्रा
In reply to पुण्यामधे खाल्लेल्या by रेवती
माझ्या माहेरी जाडसर पुपो
In reply to नाही गं तै... एका कोब्रा by अनामिक
काही ठिकाणी तूरडाळीची पुपो करतात
In reply to पुरणपोळी दह्या बरोबर? काहीतरी by अनामिक
विदर्भ - मराठवाड्यातली
In reply to पुरणपोळी दह्या बरोबर? काहीतरी by अनामिक
वेगळी पण
धन्यवाद !
तो वरच्या चित्रातला कुकर भारी
In reply to धन्यवाद ! by मीली
ए, तो मिक्सर आहे. झाला का
In reply to तो वरच्या चित्रातला कुकर भारी by टारझन
पुरणपोळी आणि दही हे एक डेडली
मी तरी पुरणपोळी दह्यासोबत कधी
पुरणपोळी आणि दही हे
आई & आजीच्या हात्च्या खापरा
मला पण
दही आणि पुरणपोळी ? छान छान
खांदेशाच्या मांडाच्या पोळीची
हे तर काय्च नाय
In reply to खांदेशाच्या मांडाच्या पोळीची by कलंत्री
मस्तम मस्त
मी आपली आणी सानीकाची रेसेपी