Skip to main content

पाणी

लेखक विकास यांनी बुधवार, 23/03/2011 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
१९९२ सालच्या "रिओ वसुंधरा शिखर परीषदेच्या" (Earth Summit) निमित्ताने २१ व्या शतकातील पर्यावरणीय समस्यांबद्दल बराच उहापोह झाला. त्यातील पर्यावरणीय बदलासंदर्भात प्रथमच घेतलेल्या काही निर्णयांमुळे ही परीषद जास्त लक्षात राहीली. याच परीषदेत "जागतीक जल दिन" चालू करण्यासंदर्भात सुचवण्यात आले आणि १९९३ पासून, दरवर्षी २२ मार्च हा "जागतिक जल दिन" म्हणत साजरा केला जाऊ लागला.

हुतात्मा भगतसिंह आणि भयभीत इंग्रज सरकार

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 23/03/2011 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक २३ मार्च १९३१ रोजी हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांनी लाहोर मध्यवर्ती कारागृहाच्या वधस्तंभावर तेजस्वी हौतात्म्य पत्करले. आज त्या हौतात्म्याचा ८० वा स्मरणदिन. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा होम करणारे असंख्य क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी आपल्या ध्येयास्तव स्वत:ला वाहुन घेतले आणि ते हसत हसत फासावर चढले. या सर्व देशभक्त हुतात्म्यांचे शिरोमणी म्हणजे हुतात्मा भगतसिंह.

परिश्रमांती रसग्रहण

लेखक लंबूटांग यांनी मंगळवार, 22/03/2011 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या ठिकाणी टारझनने एका प्रतिसादाचे रसग्रहण करण्याचे आव्हान केल्याने मी माझा कधी नव्हे ते मिळालेला रिकामा वेळ सत्कारणी लावण्याचे ठरवले. सर्वप्रथम अन्वर चित्रपटावरून लेखकाला लंडनची आठवण येते म्हणून त्या चित्रपटाच्या निर्मात्याला धन्यवाद.

पांढरा किडा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 22/03/2011 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
पांढरा किडा तुझी सांग येथे दखल कोण घेतो कशाला घशाला उगा त्रास देतो असामान्य विश्लेषकांच्या भितीने गझल घप्प कपड्यात झाकून नेतो नवे रोप लावत पुढे चालताना कुणी सांड मागून तुडवीत येतो पिके फस्त केली फळे पोखरूनी कुठूनी किडा पांढरा जन्म घेतो अभय लाचखोरीत तो शिष्ट प्राणी कुणाच्याच बापास ना घाबरे तो . गंगाधर मुटे ..........................................

दैव जाणिले कुणी |

लेखक यनावाला यांनी मंगळवार, 22/03/2011 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
दैव जाणिले कुणी? "सुदैव असते,दुर्दैव असते असे तुम्ही मानता का?" .. "मानतो म्हणजे? दैव हा शब्द मराठी भाषेत आहे.त्याचा अर्थ : भाग्य,नशीब असा आहे. ’सु’आणि’दु’ हे अनुक्रमे चांगले आणि वाईट या अर्थाचे उपसर्ग आहेत.सुदैव, दुर्दैव हे मराठी भाषेत रूढ झालेले शब्द आहेत.ते न मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही." .. "मला म्हणायचे होते तुमचा या संकल्पनांवर विश्वास आहे का?" .. "तुम्हाला काय म्हणायचे आहे ते आले माझ्या ध्यानात. दैव संकल्पनेचा काय अर्थ घ्यायचा,काय व्याख्या करायची यावर ते मानणे न मानणे अवलंबून आहे. दैव म्हणजे विधिलिखित,प्राक्तन,संचित,प्रारब्ध.

बातमी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 22/03/2011 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही हिस्स बघितला आहे का? हा तोच तो. मल्लिका शेरावतचा. बघितला आहे असे उघड उघड मान्य करणारे लोक या पृथ्वीतलावर फार कमी सापडतील. तसा हिस्स मीही बघितलेला नाही आहे. खरेच सांगतो. पण मल कथा महिती आहे. तिच ती जुनी कथा. इच्छाधारी नागिण आणि तिचा प्रतिशोध. विषयही तसा जुना आहे. यापुर्वी नागिन (सुनील दत्त, संजय खान, फिरोज खान रेखा, रीना रॉय फेम), जानी दुष्मन (डझनावारी हीरो फेम) असे बरेच चित्रपट नाग / नागिणींच्या प्रतिशोधावर येउन गेले आहेत. या सगळ्या चित्रपटातले एक समान सूत्र असे आहे की हे सगळे चित्रपट नेहेमी मल्टिस्टारर असतात. (मल्लिका शेरावतचा हिस्स सोडुन.

हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

लेखक योगेश२४ यांनी मंगळवार, 22/03/2011 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्तितम-तेजा हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा (रायगडावर काढलेला फोटो) करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा