दैव जाणिले कुणी?
"सुदैव असते,दुर्दैव असते असे तुम्ही मानता का?"
..
"मानतो म्हणजे? दैव हा शब्द मराठी भाषेत आहे.त्याचा अर्थ : भाग्य,नशीब असा आहे.
’सु’आणि’दु’ हे अनुक्रमे चांगले आणि वाईट या अर्थाचे उपसर्ग आहेत.सुदैव, दुर्दैव हे
मराठी भाषेत रूढ झालेले शब्द आहेत.ते न मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
..
"मला म्हणायचे होते तुमचा या संकल्पनांवर विश्वास आहे का?"
..
"तुम्हाला काय म्हणायचे आहे ते आले माझ्या ध्यानात. दैव संकल्पनेचा काय अर्थ
घ्यायचा,काय व्याख्या करायची यावर ते मानणे न मानणे अवलंबून आहे.
दैव म्हणजे विधिलिखित,प्राक्तन,संचित,प्रारब्ध.