मित्रांनो, आम्ही तुमच्या करता एक आधुनिकोत्तर असे पॅकेज घेउन आलेलो आहोत, पॅकेजचे नाव आहे "ट्यार्पीचे शिलेदार". आम्हाला खात्री आहे हे पॅकेज तुमच्यापैकी सर्वांना उपयोगी पडेल, ते कसे याची झलक आम्ही खाली दिलेलीच आहे. ही फक्त झलकच आहे. संपुर्ण पॅकेज ज्यांना हवं आहे त्यांनी व्यनीने संपर्क करणे. पहिल्या पाच गिर्हाईकांना १०% डिस्काउंट दिला जाईल.
हे पॅकेज डेव्हलप करण्यामागे काही स्फुर्तीस्थानं आहेत त्यांच्या विसर पडायला नको. पहिले स्फुर्तीस्थान म्हणजे अर्थातच ३% वाले कुंदनसेट. त्यांनी (हवे तितके) ३%ने देण्याचे कबुल केले नसते तर हे पॅकेज डेव्हलप करणे शक्यच नव्हते.