Skip to main content

अंतर ठेवा...

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 29/03/2011 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचे सदस्यगण हो, कृपया मला एक सांगावे. मला काही सदस्यांकडून सांगण्यात आले आहे की मी लिखाणात अंतर ठेवावे. मी मिपावर टाकलेल्या माझ्या लिखाणांमध्ये एका दिवसाचे अंतर ठेवतोच. माझे हे लेखन आधीपासूनच तयार आहे. म्हणूनच मी ते इतक्या लवकर मिपावर टाकतोय. जर खरोखरच तुम्हाला जर माझ्या लिखाणात अंतर हवे असेल तर किती ते सांगावे ही विनंती. धन्यवाद विन्या. (मला माहित आहे की वरच्या शीर्षकावरून हा कुटुंबनियोजनाचा विषय वाटतो. त्यामुळे तसा विचार करून वाचणार्‍या सदस्यांना क्षमस्व. ;) मुद्दामून फसवण्याचा हेतू नव्हता.)

मेथीचे धिरडे

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 29/03/2011 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ कप बारीक चिरलेली मेथी १ कप तांदुळाचे पीठ १ टीस्पून लसूण पेस्ट १ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून जीरे पावडर किंवा जीरे मीठ चवीप्रमाणे तेल पाकृ: एका पॅनमध्ये थोड्या तेलावर मेथी परतून घ्यावी. बाकीचे साहित्य आणी परतलेली मेथी सगळे नीट एकत्र करणे. धिरडे/डोश्याच्या पीठाप्रमाणे पीठ पातळ तयार करणे. नोन्-स्टीक तवा तापवून थोडे तेल घालणे. डावाने धिरडे घालून गॅस मंद करून झाकण ठेवावे. झाकण काढून , धिरडे उलटून दुसर्‍या बाजूने शिजवावे. चटणी, सॉस सोबत खायला देणे.

पाकसिद्ध बल्लवाचार्य गणपा..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 29/03/2011 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
फाईन आर्टस्. कोणत्या? संगीत, क्रीडा, साहित्य, शिल्प, चित्र, नाट्य आणि सर्वात महत्वाची फाईन आर्ट म्हणजे पाककला..! या कला परमेश्वर सर्वांच्याच हाती देत नाही, देत नसतो. लाखोकऱोडोत एक लता होते, एक भीमण्णा होतात, एक सचिन होतो. त्याचप्रमाणे असंख्य मराठी ब्लॉग्जवर एक ब्लॉग जन्म घेतो - खा रे खा..! आणि या ब्लॉगचा कर्ता असतो माझा मित्र गणपा..! पाककला, पाककृती, किंवा पाकक्रिया या शब्दांच्याही वरचढ एक शब्द आहे आणि तो म्हणजे पाकसिद्धी..! गणपाचं पाककौशल्य पाहिलं की त्याला या कलेतील सिद्धी प्राप्त झाली आहे असंच म्हणावं लागेल.

मोहाली उपान्त्य सामना आणि मनमोहन सरकारची लाचारी..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 29/03/2011 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
चेंडुफळीच्या विश्वचषक स्पर्धेत भारत-पाक हा सामना उद्या मोहालीत होणार आहे त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. दोन्हीही संघ आयसीसीचे सभासद असल्यामुळे व हा सामना विश्वचषकातीलच एक असल्यामुळे त्याला आमचा विरोध नाही व तो करण्याचे काही कारणही नाही. आमचा मुद्दा वेगळाच आहे. भारतासारख्या सार्वभौम देशाच्या पंतप्रधानांनी पाकच्या राष्ट्रप्रमुखांना हा सामना पाहण्याकरता मोहालीत येण्याचे जे प्रेमाने आणि उमाळ्याने आमंत्रण दिले आहे त्याबद्दल आम्ही अतीतीव्र शब्दात आमचा निषेध नोंदवतो.

साखळीतल्या कुत्र्यावर -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 29/03/2011 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
साखळीतल्या कुत्र्यावर - ते खूपच माया करती ; ' माया ' नसल्या नात्यावरती ते का डाफरती ? त्यांच्या भ्रष्ट संपत्तीची उधळण होते सगळीकडे ! माझी नजर मात्र वळते - माझ्या गळक्या खिशाकडे ? रस्त्यावरून जाताना , एक भिकारी दिसतो ; उपहासाने माझ्याकडेच पाहून का हसतो ? धडपड माझी चालू आहे - पतंग उडवण्यासाठी ! दोर राहू द्या - रीळहि साधे नाही , सध्या हाती ! एकेकटा 'मी ' रस्त्यामध्ये गर्दी करीत असतो ! गर्दीच्या खिजगणतीमध्ये कुठेच 'मी ' का नसतो ?
काव्यरस

पाचवी खोली

लेखक आदिजोशी यांनी मंगळवार, 29/03/2011 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
गिरगावातल्या चाळीत वाढलेल्या आमच्यासारख्या लोकांचं घराबद्दलचं एक स्वप्न असतं. स्वप्न सुरू - घरात एक प्रशस्त, हवेशीर संडास असावा - स्वप्न समाप्त. जास्त अपेक्षा नाहीत. मजल्यावरच्या ४ बिर्‍हाडात मिळून एक असलेल्या सार्वजनीक संडासाला आम्ही प्रेमाने पाचवी खोली म्हणत असू. काही लोक त्याला 'मालकाची खोली' असंही म्हणत. संडासाला 'मालकाची खोली' म्हणण्यामागे चाळ मालकाला नावं ठेवणं इतकाच हेतू नसून त्या बोलण्याला 'फक्त खोलीचं भाडं देऊन संडास फुकट वापरता' असं मालकाने ऐकवल्याची पार्श्वभूमी असे. चाळीतला संडास हा क्लिओपात्राच्या बाथ-टब सारखा लेख लिहायच्या लायकीचा जिन्नस नाही.