लेखकविश्वास कल्याणकरयांनी गुरुवार, 07/04/2011 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदूंना ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरित करण्याच्या भरतातील अनेक घटनांबाबत आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. मात्र गेल्यावेळी मी भारतात जेव्हा गेलो तेव्हा भारतातल्या परिस्थीतीबाबत चे अधिक स्पष्ट चित्र समजले. भारतातील बहुसंख्य हिंदूंना हे माहितच नाही, की हिंदुत्वाच्या विरोधात एक युध्द पुकारले गेले आहे आणि त्याचे गांभीर्य किती भयानक आहे. हिंदुत्वाला अनेक ठिकाणी अनेक मार्गांनी विरोध केला जात आहे.
लेखकयुयुत्सुयांनी गुरुवार, 07/04/2011 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळ मध्ये विवाह कायद्यातील ब दलांविषयी एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचा दूवा असा आहे -
http://www.esakal.com/esakal/20110407/5049728020328664240.htm
या नवीन बदलांनूसार स्त्रीला नवर्याच्या संपत्तीत थेट वाटा द्यावा असे सूचविण्यात आले आहे. लग्नाच्या वेळेला नवर्याच्या नावावर असलेल्या संपत्तीत वाटा घटस्फोटित पत्नीला मिळावा अशी ही शिफारस आहे.
हा बदल अजून शिफारस या पातळीवर असल्याने शयातील त्रुटींवर चर्चा निश्चितच होईल. आपल्या कडे कायदे करताना त्यांचा दूरूपयोग होणार नाही याची काळजी घेतली जाते का?
लेखकलांबदेवयांनी गुरुवार, 07/04/2011 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
मर्ढेकरांची कविता - झोपली ग खुळी बाळे - वैश्विक व दुसऱया महायुध्दकालीन संदर्भ
मर्ढेकरांची ही कविता दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर आहे. ह्या कवितेत अणुबाँब आहेत. रॉकेट आहेत. भारतीय , अमेरीकन शास्त्रज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय शस्त्रस्पर्धा आहे. भगवतगीता आहे. जागतीक शांततेचा प्रश्न आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत.
खालील दुव्यावर टिचकी मारा
झोपली ग खुळी बाळे
लांबदेव
लेखकनाटक्यायांनी गुरुवार, 07/04/2011 04:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी,
बरेच दिवसांपासून गणपाच्या हातच्या अफलातून पाककृती खाताना हा विचार करत होतो की याच्या बरोबर कोणते कॉकटेल चांगले लागेल. घरी थोडेफार प्रयोग केल्यानंतर असे वाटू लागले की आपण गणपाशेटलाच विचारावे का अश्या जॉईंट-व्हेंचर बद्दल? आणि गणपाशेठनी झटकन परवानगी दिली. थोडक्यात म्हणजे मी गणपाशेटच्या जोरावर माझी पब्लीसीटी करतो आहे म्हणाना. असो नमनाला घडाभर तेल पुरे.
तर एकंदर योजना अशी की गणपा एक पाकृ आणि मी त्या बरोबर जमेल असे एक कॉकटेल असा विकांताचा मेन्यू म्हणन द्यायचा. तर मंडळी जर ही कल्पना आवडली असेल तर प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही.