Skip to main content

पत्रमैत्री

लेखक कलंत्री यांनी सोमवार, 11/04/2011 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या बर्‍याच तरुणाना पत्रे (पोस्टकार्ड, पाकिटे, पत्रिका, मनी आर्डरी) काय असतात, ती कशी असतात्, ती पत्रे कोण लिहित आणि त्याच बरोबर त्या पत्रांचा आणि ती पत्रे आणणार्‍या डाकमित्राची वाट कशी पाहिली जात याची कल्पना ही आजकाळच्या बर्‍याच लोकाना नसेल. कोणे एके काळी नातेवाईक, मित्र आणि आतेष्टांसाठी पत्र आणि त्याचे आदानप्रदान कराणारा पोस्ट्मन ( डाकमित्र) याचे स्थान अबाधित असे होते. काळाच्या महिमा असा की पत्राची जागा संगणकीय पत्रांनी, मोबाईलच्या लघुसंदेशा नी पटकावली. तरी कधीतरी एखादे पत्र यावे, आपल्या नातेवाईकांची ख्यालीखुशाली कळवावी, वाट पहावी असे कोणाला कदाचित वाटतही असेल. यासर्व लोकासाठी

(का केली दाढी ही अशी...?)

लेखक पक्का इडियट यांनी सोमवार, 11/04/2011 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - http://misalpav.com/node/17606 खरं सांगायचं तर..... आज-काल दाढी करयची देखील खुप भीती वाटते । कारण.... कुठलीशी गालावरली बट, नकळतच राहूनच जाते । दाढीचे केस मग, सहजा-सहजी तुटत नाहीत । भावनांचे पीळ त्या केसांतले, काहीकेल्या सुटत नाहीत । सुटले पीळ तुटले केस तरी, ते जखमा देउन जातात । जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेउन जातात । ओलावा त्या डोल्यांतला, लपवू पाहता लपत नाही । डोळ्यांची मिटली झापडे तरी, थेंब खाली पडल्या वाचून राहत नाही । आणि मग...! का केली दाढी ही अशी...?
काव्यरस

वळवाचा पहिला पाउस

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 11/04/2011 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच अर्ध्या तासापूर्वी आमचे येथे चिंचवडला वळवाचा जोरदार पाउस झाला. हा या मौसमातला पहिलाच पाउस आणि तोही गारांसह.

कचोरी आणि चिंचेची चटणी

लेखक स्मिता. यांनी सोमवार, 11/04/2011 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
कचोरी म्हणताच माझ्या तोंडाला पाणी सुटतं. (खरं तर मी इतकी खादाड आहे की अनेक पदार्थांच्या नावाने माझ्या तोंडाला पाणी सुटतं) लहानपणी मी आणि माझा भाऊ तर कचोरी आणून खायचं कारणच शोधत असू. २-३ दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रीणीने कचोरीची आठवण करून दिली. मग काय डोक्यात कचोरीच घोळ घालत होती. इकडे पॅरीसमध्ये आयती विकत आणायचीही सोय नाही. म्ह्णून काल रविवारी कचोरी बनवली होती. त्याचंच वर्णन खाली देतेय... साहित्यः १.

ठाणे खादाडी - क्षणचित्रे..

लेखक गवि यांनी सोमवार, 11/04/2011 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कट्ट्याचा जीव छोटा आहे हे माहीत असल्याने पुरेपूर कोल्हापूरमधे असलेलं चोवीस जणांची व्यवस्था असलेलं छोटंसंच ए.सी. कंपार्टमेंट आम्ही अडवून ठेवलं होतं. मी आणि स्पावड्या साडेसातालाच तिथे पोचलो. स्पावड्यासोबत सुधांशू आणि वपाडाव आलेले होते. नंतर बराच काळ डोक्यांचा काउंट चारवरच स्थिर होता. सगळेजण जमेपर्यंत म्हणजे साडेआठपर्यंत आम्ही चौघे तिथेच खड्या पारश्यासारखे पण गप्प न राहता गप्पा हाणत उभे राहिलो. आम्ही सर्वच जण (स्पावड्या धरुन) एकमेकांना पहिल्यांदाच बघत होतो. मग "ओळखा पाहू" चा मस्त राउंड झाला.

उन्हाळ्यातली धमाल .....

लेखक पियुशा यांनी सोमवार, 11/04/2011 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्यातली धमाल शाळेला कधी सुट्ट्या लागतील आणि कधी मनसोक्त हुंडरायला ,खेळायला मिळतंय याची आमचा ग्रुप चातकासारखा वाट पाहत असायचा एरवी इतर बाकीची मुले आईबाबांना "आपण गावी कधी जायचं ?

अक्षय पात्र

लेखक ajay wankhede यांनी सोमवार, 11/04/2011 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
तु मला अजुनहि जानलं नाहिस कारण तुझा स्वभाव च तसा आहे त्याला मि तरि काय करु. मि तर भरभरुन देतो... तुला घेता च येत नाहि , त्याला मि तरि काय करु. मि देता देता थकत नाहि, पण तु घेता घेता च थकतेस, त्याला मि तरि काय करु. मि तुला देतो ते हि तुला आवडत नाहि, मि तिला देतो ते हि तुला आवडत नाहि. कारण तुझा स्वभाव च तसा आहे.. त्याला मि तरि काय करु. मि तुला तिला सर्वानाच देतो ... तरि माझं पात्र रिकामं होत नाहि. मि सदैव त्रुप्त तु सदैव अत्रुप्त . आज मि तुला माझं अक्षयपात्र च देतो.. ते तरि तु निस्वन्शयि मनाने घे. नि मि जसा देतो तसं तु भरभरुन दे.

मुंबईच्या मनकर्णिके

लेखक शरद यांनी सोमवार, 11/04/2011 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबइच्या मनकर्णिके,नेसुनी फिकें वसन हें गहिना तूं जातिस कोठें अशी गडे भर दिशीं, उन्हाचा महिना तलखीची चिकचिक हवा, त्यात मी नवा, जीव घाबरतो भाबडासाबडा सांब, राहूनी लांब तुजकडे बघतों गर्दीचा दर्दी कुणी हिकमती गुणी जवळ घुटमळतो असकारा पाहुन असा, जीवाचा ससा भेदरुन पळतो तूं तल्लख पुरती खरी !

चेरी ब्लॉसम , वॉशिंग्टन डी सी आणी ओबामा

लेखक प्रभो यांनी सोमवार, 11/04/2011 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
चेरी ब्लॉसम म्हटलं की गेल्या २-३ वर्षा आधीपर्यंत एकच गोष्ट आठवायची.....बूट पॉलिश...त्याच्या त्या जाहिरातीतला चार्ली चॅप्लीन आणी त्याच्या करामती.. पण हे सगळं २-३ वर्षा आधीचं. मित्र या त्या कारणाने अमेरिकेला जाउ लागले आणी त्यांच्या फेसबुक - पिकासा अल्बम्स मधे दिसू लागले 'चेरी ब्लॉसम्स'. जपानने अमेरिकेला दिलेल्या चेरीच्या झाडांना मार्च अखेरीस येणारा बहर...