Skip to main content

सरुटॉबानेच्या कट्ट्याचे फायनल डिटेल

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 15/04/2011 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
http://misalpav.com/node/17534 इथं दिलेल्या आमंत्रणाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल अतिशय धन्यवाद. आतापर्यंत ज्यांनी कनर्फ्म केलंय ते आहेत वल्ली, मनराव, गणॅशा,, टारझन, साधासुधासौरभ, पुण्याचे पेशवे, धमाल मुलगा, छोटा डॉन , वपाडाव,मी,प्यारे१ ,म्रुत्युंजय, आत्मशुन्य. बुकिंग झालेलं आहे, अजुन पण कुणि येणार असेल तर क्रुपया उद्या ११ वाजेपर्यंत कळवा. इथं धाग्यावर वरची लिस्ट च्योप पास्ते करुन त्यातच नावं वाढवलीत तरी चालेल. मला किंवा वल्लीला व्यनि केला तरी चालेल. वरच्या सगळ्यांना व्यनि केलेलाच आहे.

पोपटाची सदिच्छाभेट

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 15/04/2011 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या परिसरात पोपट बहरले आहेत. माझ्या आणि रामदासशेठच्या घरादरम्यान असलेल्या वृक्षराजीत सकाळी सकाळी पोपटांचे थवेच्या थवे इकडुन तिकडे उडत असतात. आमच्या इमारतीच्या परिसरातील लाल तुर्‍यांच्या फुलांच्या झाडावर या पोपटांची नजर असते, त्यांना ही फुले खायला विशेष आवडत असावीत. फांदीवर बसुन उलटे लटकत चोचीने फुले खुडणारे पोपट रोज पाहावयास मिळतात.

मी एक मिडल क्लास ...............

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 15/04/2011 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक मिडल क्लास ............... सकाळी साडे सहाचा गजर वाजतो तो मी चरफडत बंद करून टाकतो चला ऑफिसला जायचे (च )म्हणून रडत - खडत साडेसातला उठतो मला झालेली असते आंघोळीची घाई त्यात पेपरला न्यूज असते आज तुमच्या एरियाला टिंब टिंब कारणामुळे पाणीपुरवठा नाही कसेबसे ४ मग्गे घेऊन स्नान करावे कुठ राहिला फेस ,अन साबण तर टॉवेलाने पुसावे ..... कॉर्न फ्लेक्स रोजची चैन , आपल्याला परवडत नाही , रोजचचे

रामाचे नवरात्र

लेखक मी ऋचा यांनी शुक्रवार, 15/04/2011 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
लेखन प्रेरणा- हर्षद (५० फक्त) मिसळपाववर सदस्य होऊन १ वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला पण प्रतिसादांच्या पूढे जाऊन आपल्याला काही लिहिता येणारच नाही अशी अकारण खात्री होती. पण हर्षदनी मला प्रोत्साहन देऊन नवरात्रावर लिहीच म्हणून उद्युक्त केलं आणि आज लिहुच म्हणून रामाचं नाव घेऊन सुरुवात करतेय.. -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला रामाच्या नवरात्राला सुरुवात होते. देवीच्या नवरात्रासारखीच सरळ सोपी पूजा असते.

कृष्ण

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 15/04/2011 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण - १ कधी कधी वाटते...... कृष्ण होण्यापेक्षा राधा व्हावे...... पहाटेच्या चांद्रवैभवाचे रुपेरी चांद्रकण गाळणार्‍या कदंब वृक्षाखाली.......... सुंदर मोरपिसांच्या........ मोठ्या मोठ्या डोळ्यांची नक्षी असलेली..... उदात्त युगांतीत प्रेमाची भरजरी शाल पांघरावी.... म्हणजे मग..... द्रौपदीच्या अब्रूचे धिंडवडे निघतांना....... साध्या सुती साडीच्या दोन हात..... तुकड्याची चिंता करण्याची गरज उरत नाही....... कृष्ण - २ पण मग नंतर वाटते...... राधा होण्यापेक्षाही मीरा व्हावे......... कृ

आंबेडकर जयंतीनिमित्त..

लेखक utkarsh shah यांनी शुक्रवार, 15/04/2011 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
काल कर्वे रस्त्यात भरपूर ट्राफिक जाम होते. मोठ्या डेकवर गाणे चालू होते. उनके नशे मे, उनके नशे मे उनके नशे मे $$$ जलते रहे, लडखडाये, लडखडाये कभी कभी संभलते रहे त्या डेकसमोर छान नृत्यप्रकार चालू होते. विविध अवयव किती प्रकारे हलवता येऊ शकतात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत होते.आणि शिट्ट्या मारणे, ओरडणे हे लहान मुलांचे खेळसुध्दा मधून मधून होतेच जोडीला. एकापाठोपाठ सलग ३ वाहनांवर ३ डेक होते. एकीकडे मुन्नी बदनाम होत होती, दुसरीकडे शिलाला तिची जवानीची काळजी पडली होती.

तुम्ही गप्प (शांत) रहायचे कधी ठरवता. ?

लेखक नरेशकुमार यांनी शुक्रवार, 15/04/2011 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सगळ्याना आयुश्यात कधितरी गप्प राहूशी वाटते. लहान पनि आईचा मार खाल्यावर, मोठेपन कमी मार्क मिळाल्यावर, जॉबमध्ये बॉसने रागवल्यावर, बिजनेस लॉस झाल्यावर, लग्न झाल्यावर बायकोशी भांडन झाल्यावर, पोरे मनाविरुद्ध वागायला लागल्यावर. आजुबाजुला मनाविरुद्ध काही होत आहे असे वाटु लागले तर अश्या वेगवेगळ्या विचित्र परिस्थितित मनुक्ष्य गप्प (म्हनजे शांत) रहाने पसंत करतो. माझे उदाहरन देतो, लग्ना अगोदरचे काही विशेश आठवत नाही, लग्न झाल्यावर एकदा बायकोसाठि काही गिफ्ट घेन्यासाठि माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा मला खुप वाईट वाटले होते, म्हनुन मि ३-४ दिवस गप्प होतो. कामवर पन जास्त कोनाशी बोललो पन नव्हतो.

कॅमेर्‍याची निवड

लेखक शरद यांनी शुक्रवार, 15/04/2011 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
निवड कॅमेऱ्याची जालावर सर्व कॅमेर्‍यांची माहिती सहज उपलब्ध असतांना या लेखाची गरज काय ? असे तुम्हाला वाटेल. पण इथे मी कुठल्याही कॅमेर्‍याची माहिती किंवा त्याचे फायदे तोटे सांगणार नसून तुमच्या गरजेप्रमाणे खरेदीच्या वेळी आपल्याला पाहिजे असलेला कॅमेरा कसा निवडावा एवढेच सुचवणार आहे. पूर्वी बरे होते.कॅमेरा निवडावयाचा म्हणजे आपला खिसा तपासावयाचा. हलक्या दर्जाचे [रु. १५०० पर्यंत], मध्यम दर्जाचे [रु १५००ते ३०००] व भारी [३००० च्या वर]. हे देखील सेकंड हॅंड. मी सुरवात कोडॅकच्या डबड्याने [मामाने दिलेला] केली, नोकरी लागल्यावर पैसे जमवून एक जूना फ़ॉगलॅंडर घेतला. फ़ारा वर्षांनी निकॉन एफ़-३.

मलबारी एग रोस्ट.

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 15/04/2011 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
दुबईला लग्ना आधी आम्ही ऑफिस मधले ४ बॅचलर मित्र, पेइंगेस्ट म्हणुन एकत्र रहायचो. ४ खोल्यां पैकी २ खोल्या घरमालकाने भाड्याने दिल्या होत्या. त्या आम्ही चार मित्रांनी पटकावल्या होत्या. किचन वापरायची मुभा होती. पण शक्यतो ते जुम्मे के जुम्मेच वापरल जायचं. (नाही म्हणायला घर मालक जेव्हा सुट्टीत महिनाभर गोव्याला जायचा तेव्हा आमची चंगळ असायची.) त्यामुळे रोजच्या जेवणासाठी आम्ही मलबारी, पंजाबी, नेपाळी,पाकिस्तानी,मद्राशी अश्या वेग वेगळ्या होटेल्समध्ये वार लावले होते. (गोवन हॉटेल फक्त विकांतासाठी फिक्स असायच.