Skip to main content

जलालाबादच्या रणसंग्रामातील हुतात्म्यांचा ८१ वा स्मृतिदिन

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 24/04/2011 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक२२ एप्रिल. चितगांव शस्त्रागार विजयाच्या जलालाबादपर्वातील हुतात्म्यांचा ८१ वा स्मृतिदिन. स्वातंत्र्यसंग्रामाच्या सशस्त्र क्रांतिपर्वात ’चितगांव’ घटना ही एक असामान्यच आहे, इतिहासातील ते एक सोनेरी पान आहे. १९१६ साली आयरिश क्रांतिकारकांनी सशस्त्र लढा उभारला आणि डब्लिन जिंकुन घेत तब्बल सात दिवस ताब्यात ठेवलं या घट्नेपासून स्फूर्ति घेत एका सामान्यातल्या असामान्य माणसाने म्हणजे मास्टरदा उर्फ मास्टर सूर्यसेन यांनी सशस्त्र संघटना स्थापन केली - भारतिय प्रजासत्ताक सेना - म्हणजेच उत्तरेतील ’हिं.स.प्र.से’चा पूर्वेतला अवतार.

मिपावरील छायाचित्रे ... एक निरिक्षण

लेखक शरद यांनी रविवार, 24/04/2011 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
कलादालनातील छायाचित्रकला... एक निरिक्षण मिपावर या विभागात अनेक छायाचित्रकार आपली छायाचित्रे डकवत असतात. त्यांचा दर्जाही चांगला असतो. प्रतिसादावरून हेही जाणवते की वाचकांना ही चित्रे आवडतात. याचे एक कारण असे की या चित्रातील ७०-८०% च्या आसपास निसर्गचित्रे असतात. आता घनदाट झाडी, फेसाळणार्‍या लाटा, बर्फाच्छादित पर्वत नेत्रसुखदायक असल्याने सर्वच खुश. उरलेल्या चित्रात फुले आणि पक्षी. तेही चांगले दिसतात. आनंदी आनंद गडे.... एक लक्षात घ्या. या अशा चित्रांत वेळ, अपर्चर, स्पीड, दृष्टीकोन, थोडेफार बदलले तरी फारसा फरक पडत नाही. चित्राची आकर्षकता कायम रहाते.

शब्दांच्या मालगाड्या

लेखक निनाद यांनी रविवार, 24/04/2011 07:06 या दिवशी प्रकाशित केले.
काल परवा कधी तरी रक्तवर्णी वारुणी सोबत मिसळपाव पाहतांना मिकासोबत खरडाखरडी झाली त्यात मी दिलेला हा प्रतिसाद बहुदा कविता आहे असा 'सौंक्ष्यय' आला. फक्त मिकानेच का माझ्या काव्याचे भोग भोगावेत? या विचाराने मला दया आली. दु:ख वाटल्याने कमी होते असे शाहरूख खान म्हणतो, म्हणून ही एक शब्द करूण आणि भयाण कविता सगळ्यांनाच वाटून टाकत आहे.
काव्यरस

तुम्ही बी घडाना ....!

लेखक सुधीर मुतालीक यांनी शुक्रवार, 22/04/2011 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोल्हापूरशी एक घट्ट छान भावनिक नातं आहे. मामाच्या गावाशी असावं तसंच. त्यामुळे पुढे आयुष्यभर वेळोवेळी चघळाव्या अशा लहानपणीच्या अनेक आठवणींचे भले मोठे गाठोडे आहे. एकटे असताना प्रवासात, तासंतास मित्राची, कस्टमरची वाट बघताना किंवा नुसतेच रिकामे असताना जवळ असणा-या समृद्ध अडगळीतुन कधीतरी असे एखादे गाठोडे अचानक बाहेर येतं. मग गाठोड्यातल्या एकएक आठवणींशी गप्पा मारायला, आता थोड्या वेगळ्या संदर्भातून बघायला धमाल येते. कोल्हापुरच्या महलक्ष्मी मंदिराच्या म्हंजे अंबाबाईच्या देवळातल्या आठवणींचाच एक भला मोठा संच आहे.

गुडबाय बेळगाव

लेखक अँग्री बर्ड यांनी शुक्रवार, 22/04/2011 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
४८ तासानंतर मी कर्नाटक सोडून परत माघारी महाराष्ट्रात जाणार ! बऱ्याच महिन्यांनी परत कोकणात जाणार याची उत्सुकता आहेच पण बेळगाव सुटणार याची पण रुखरुख लागलीये .पूर्वी संयुक्त महाराष्ट्र बद्दल फक्त घरी मॅगी खाताना टि.व्ही.वर पाहिलेलं.

असेलही कुठे कुठे

लेखक bhaktipargaonkar यांनी शुक्रवार, 22/04/2011 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
असेलही कुठे कुठे आयुष्याचे गाणे खडतर वाटेवर सापडेल जिणे कशासाठी कुणासाठी रडावे अपार काय सख्या आणले तू, काय तू नेणार ? रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची लिहावीच कशासाठी कथा ह्या ऱ्हासाची ? हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?
काव्यरस

निरुत्तर

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 22/04/2011 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
हॉल खच्चुन भरला होता. विद्यार्थी -पालक सभा. नविन सिलॅबस. दहावीच्या पालकांना हायपर व्हायला आणखी एक कारण. दोन कार्यक्रमामधे अर्ध्या तासाचा ब्रेक. त्यात तो भेटायला येणार होता. शाळेतल्या गुणवंत मुलामधला. मुख्याध्यापकांची आग्रहाची विनंती. टाळणे शक्य नव्हते. ----------------------------------------------------------------------------------------- सभा सुरु झाली. चौथ्या वाक्यात मांडीवरील लहानगीने भोकाड पसरले. मी थांबलो. सुज्ञ शिक्षीकेने आईला वर पक्षाच्या खोलीकडे नेले. कुणी तरी दबल्या आवजात कॉमेंट केली. मुले फिदीफिदी हसली. -------------------------------------------------------------------------------

'तार्‍यांचे बेट' - प्रसन्न करणारा अनुभव

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 22/04/2011 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
कामाच्या व्यापात बर्‍याच गोष्टी करायचे राहून जाते. सकाळी निवांत बसून वर्तमानपत्र वाचणे असो किंवा सहजच मारलेला एखादा फेरफटका असो; मोठ्या आनंदाच्या मागे दमछाक करणारी दौड करतांना छोट्या-छोट्या गोष्टींमधून विनासायास मिळणार्‍या आनंदाचा आपण नेहमीच बळी देत असतो. नंतर 'माझ्याच वाट्याला का अशी पळापळ' असे गळा काढून ओरडण्यात ही आपण मागे हटत नाही.