Skip to main content

सत्यसाईबाबांची ती भेट !

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 28/04/2011 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=MainEdition-1-1-2… आजच्या लोकमतमधील बातमी जशीच्या तशी खाली डकवित आहे. सत्यसाईबाबांची ती भेट ! (27-04-2011 : 12:43:11) (दिनकर रायकर)::- पुट्टपर्थीच्या सत्यसाईबाबांचे पार्थिव आज अनंतात विलीन होईल.

फ्रुट कस्टर्ड व चेरी व्हॅनीला शेक

लेखक प्राजक्ता पवार यांनी बुधवार, 27/04/2011 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रुट कस्टर्ड : साहित्य : दुध - अर्धा लिटर , कस्टर्ड पावडर - २ चमचे , साखर - ४ चमचे , फ्रेश क्रीम - ४ चमचे , फळे - सफरचंद , द्राक्षे , पपई , डाळींब , संत्रे इ कृती : प्रथम अर्धी वाटी दुध वेगळे काढुन घ्या व त्यात कस्टर्ड पावडर घालुन एकत्र करा. उरलेले दुध , साखर घालुन गरम करा . एक उकळी आल्यावर त्यात कस्टर्ड पावडरचे मिश्रण ह्ळुहळु घाला व चमच्याने मिसळा. दोन मिनिटे दुध गरम करुन नंतर ते थंड करायला ठेवा.

मर्कट फोटोग्राफीचा एक प्रयत्न

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 27/04/2011 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
शरद व स्पा यांच्या धाग्यामुळे मीहि खूप प्रभावित झालो, आणि नुकतेच माथेरानला काही काढलेले फोटो उकरून बघितले... ;) त्यात मला पण अस वाटल कि होय, मी सुद्धा काही हटके फोटो घेतलेले आहेत.. डकवतोय बघा आवड्तायेत का? माथेरानच्या लुईझा कडेटोकावर बसलेले हे मर्कट, उन्हातान्हाचे वैतागलेले, उदास भाव असलेले. हे एक छोटे कुटुंब. दंगा चालला होता यांचा.

काल रात्री

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 27/04/2011 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी प्रस्तावना: पाऊस येणार असला तर त्याला एक घटनाक्रम असतो. प्रथम दाटून येते, मग हळूहळू गारठा जाणवायला लागतो, त्यानंतर पाऊस सुरू होऊन सगळं जलमय होत जाते, वाहायला लागते आणि वाहता वाहता विरघळायला लागते. या सर्व घटनाक्रमात क्रमाक्रमाने विरहात झुरणार्‍या नायकाच्या मनाची अवस्था आणि त्याचे विचार या रचनेत मांडायचा प्रयत्न आहे. ====================================== परत एकदा स्व:तास केले स्वप्नांच्या आधीन | .......... काल रात्री || परत एकदा जीवास केले सखेच्या स्वाधीन | ..........
काव्यरस

कैरीच्या विविध पाकृ... माहिती हवी..

लेखक मनि२७ यांनी बुधवार, 27/04/2011 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर..... :-) आज बरायचं दिवसांनी मिपावर येण झाल.....ते पण एक पाक्रु जाणून घ्यायला.... माझ्या सासू बाईनी मला ५ ते ६ किलो कैर्या पाठवल्या आहेत.. आता एवढय कैर्यांचा काय करू काही सुचत नैये मला.... प्लीज तुम्हाला जर नवनवीन पाककृती माहित असतील तर सांगा... मला कैरीच पन्ह बनवता येत.. .. पण बाकी काही अजून करून पाहिलं नाही... आणि हो..जर कोणाला तिखट छुंदा ची पाकृ माहित असेल तर सांगावी.... :-)

हर्षा!!!

लेखक किसन शिंदे यांनी बुधवार, 27/04/2011 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
बरी-वाईट कशीही का असेना माझी ही पहिली कथा तात्यांना अर्पण...:) "हर्षा काल का नाही आलीस गं?" लॅपटॉप उघडून मी ऑफिसचे करतच बसले होते, तेव्हढ्यात दरवाज्यातून आत येणाऱ्या हर्षाला मी विचारलं. "सॉरी गं ताई, खूप काम होतं घरी म्हणून येत आलं नाही." चेहऱ्यावर असलेली निराशा क्षणभर बाजूला सारत हर्षा बोलली खरी पण तिचा चेहराच इतका बोलका कि, काहीही न सांगता मला खूप काही बोलून जातो. हर्षा!! एक अल्लड अनं निरागस मुलगी. गोरा वर्ण, बोलके डोळे, हसरा चेहरा आणि सतत बडबड करण्याची सवय यामुळेच कोणाच्याही लक्षात रहावी अशी.

मदत करा

लेखक मीनाक्षी देवरुखकर यांनी बुधवार, 27/04/2011 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
नम्स्कार, मी एथे नवीन अहे. मी सध्या सिद्नी मधे Southern Cross University मधे शीक्तेय मी खूप दिव्संपासून एकत फील करत होते नेत वर browse कर्ता कर्ता, मला हि सीत दिस्ली. एथे खूप वचाय्ला मिल्ट. (sorry i cant write marathi proper here ) मला अज, लिहावस वाटल, करण पर्वाच मझ्या एका मित्रावर इकडचे स्थानिक मित्र चोताश्या कार्णावरून भांड भांड भानडले, तोंडावर ठून्क्ले, मारल सुद्ध मी एथे एकटी राहते, सारखी भीती वाट्त राहते .... खूप कंटाळा येतो, शिकावस वाट्त नही . पैसे भरलेले वया जातील अशीच परत आले तर मी कय करू ? पोलीस सुध मदत करत नाहीत (i am helpless , cant manage this mental stress )

कूलिंग चार्जेस...

लेखक चिगो यांनी मंगळवार, 26/04/2011 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळा आलाय.. नागपुरात तर चांगलंच तापतंय. अशात नागपुरहून मुंबईला जायला रेल्वेस्टेशनवर पोहचलो. रात्रीची वेळ असली तरी गरमी वाटत होती. पाण्याची बाटली घेतली. पैसे विचारले तर म्हणे "पंधरा रुपये". मी किंमत पाहीली, बारा रुपये.. दुकानदाराला विचारलं, "तीन रुपये कशाचे?" तर म्हणे कुलिंग चार्जेस.. मी भांडून शेवटी न-थंड बॉटल बारा रुपयांतच घेतली... मुंबईत दुपारी घसा सुकला म्हणून कोल्ड्रींक घ्यायला दुकानात गेलो. पुन्हा तेच.. २७ रुपयांची बॉटल ३० रुपयांत.. पुन्हा ३ रुपये कुलिंग चार्जेस.. नरडा सुकत होता म्हणून झकत घेतली.