Skip to main content

कँडिडेट्स मॅचेस - २०११

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 04/05/2011 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीच्या सोविएत संघराज्याचा एक भाग असलेल्या परंतु आता स्वतंत्र अशा तातारस्तानची राजधानी कझान इथे दि.५ मे २०११ पासून, म्हणजे उद्यापासून, बुद्धीबळ जगताचे लक्ष लागून राहिलेल्या कँडिडेट्स मॅचेस सुरु होत आहेत. २०१२ सालच्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेसाठी सध्याचा जगज्जेता विश्वनाथन आनंदचा प्रतिस्पर्धी ठरवण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट ह्या मॅचेसमधून साध्य होणार आहे. आठ खेळाडूंमधून एकाची निवड होईल. कोण असेल हा खेळाडू?

चोरून चोरून, हो ना?

लेखक उदय के'सागर यांनी बुधवार, 04/05/2011 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी हलकासाच पेपर उचलून मुद्दाम त्यावरच भाजी चिरून कधी उगाच रद्दी निट रचून नि रचेलेली रद्दी मुद्दाम पाडून        चोरून चोरून तू वाचतेस, हो ना? कधी धूळीवर, झाड़त असतांना कधी भांडयांवर, ते घासतांना काचेवर खिडक्या पुसतांना तर पानांवर पाणी घालतांना        चोरून चोरून तू लिहितेस, हो ना ? कधी ते "तेलकट रंग" भिंतींच्या अडून कधी त्या "पेंसिल" तिरक्या डोळ्यातुन कधी ती "पुस्तकं" अरशाच्या नजरेतून तर कधी "वह्या" फरशिच्या प्रतिबिम्बातुन        चोरून चोरून तू बघतेस, हो ना? बापरे!
काव्यरस

काही अडचणी आहेत का?

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 04/05/2011 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून मिसळपाव वापरताना खूप अडचणी येत होत्या. आता जवळपास सर्वच अडचणी दूर झाल्या असतील. आता सुध्दा कुणाला मिसळपाव वापरताना काही अडचणी असतील तर त्या त्यांनी येथे मांडाव्या किंवा मला व्यक्तिगत निरोप पाठवावा. - नीलकांत

Trace Evidence

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 04/05/2011 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
'ट्रेस एव्हीडन्स' नामक चित्रप्रदर्शन वेव्हज आर्ट गॅलरी, पुणे, इथे शुक्रवारी सुरू होणार आहे. जानिस मिलीगन या कनेडीयन कलाकाराचं हे भारतातलं पहिलंच प्रदर्शन आहे.
प्रदर्शनातल्या एका चित्राचा फोटो. चित्राचं नाव: InterFERometry
शुक्रवार, ६ मे रोजी, संध्याकाळी ६-८ उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. १४ मे २०११ पर्यंत सकाळी १०:३० ते रात्री ८:०० पर्यंत (रविवार सोडून) प्रदर्शन खुले राहिल.

वाडा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 04/05/2011 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
वाडा
जुन्या जाणत्या भल्या थोरल्या गोष्टी सार्‍या सरल्या खोबणीत पांढरे झाले डोळे, जाणीवा जणू मेल्या ||१|| काळोखाच्या गर्दीमध्ये हरवले त्याचे दिसणे कुठे पाहुनी कसे वदावे, वर्णन या मुखाने ||२|| डोळ्यांत घातले अंजन जरी, न दिसे जमीन खाली कुरकुरणार्‍या दरवाजांवर कड्याकुलूपांनी नक्षी केली ||३|| ओट्यावरचे दगड कालचे, चालले पायात खाली खांबांवरची कोरीवकामे अजगरासम सरपटली ||४|| ओलावलेल्या भिंती ल्याल्या रंगांचे उडते पोपडे कंदील नाही उजेडाला म्हणून काळवंडले कोनाडे ||६|| डुगडुगणार्‍या जिर्ण पायर्‍या जिना वर घेवू
काव्यरस

फोटोग्राफीचा प्रयत्न

लेखक स्मिता. यांनी बुधवार, 04/05/2011 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचे कलादालन नेहमीच बहरलेले असते. मिपाकरांनी काढलेले सुरेख फोटो बघून मलाही स्फूर्ती झाली की आपणही फोटो काढून बघावेत. त्याच प्रयत्नात असताना केलेले काही प्रयोग इथे मांडतेय. मला असलेलं फोटोग्राफीचं तंत्रज्ञान जवळपास शून्यच आहे. तीच स्थिती फोटोशॉप बद्दल! त्यामुळे जे कॅमेराने पाहिले तेच येथे दाखवले आहे. अज्ञानाचे आणखी प्रदर्शन करायचे झालेच तर मला यातल्या फुलांची नक्की नावंही माहिती नाहीत.

हेलिकॉप्टर प्रवास आणि राजकारणी.

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 04/05/2011 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8154744.cms अरुणाचल प्रदेश चे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांच्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्याचं काम बहुधा अजूनही सुरुच आहे. काही वेबसाईट्स हेलिकॉप्टर सापडल्याचे सांगत आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते माधवराव शिंदे, राजेश पायलट, तेलुगु अभिनेत्री आणि भाजपा उमेदवार सौंदर्या, आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री असलेले वाय एस्स आर रेड्डी आणि आता दोरजी खांडू(९९% मृत्यूचीच शंका) ही अपघातामध्ये गेलेली प्रमुख नावे. बर्‍याचदा आपण वाचतो की हेलिकॉप्टर भरकटले.

सदाबहार नाना

लेखक निनाद यांनी बुधवार, 04/05/2011 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
इतक्यातच विकीवरच्या माहितीत भर घालून त्याचा लेख केला, तो येथे देत आहे. अधिक माहिती इतर सदस्य देतीलच त्यानुसार विकीवरचा लेखातही भर घालता येईल. ---- जगदीश खेबूडकर (जन्म १० मे इ.स. १९३२ - मृत्यू ७९व्या वर्षी, ३ मे २०११ रोजी) हे मराठी ज्येष्ठ गीतकार होते. जगदीश खेबूडकर यांना नाना असेही संबोधले जात असे. त्यांचा जन्म कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, (की हळदी?) या गावी झाला.