Skip to main content

मायेची सावली

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 05/05/2011 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
ल हानपणी माझं आवडतं पर्यटनस्थळ होतं आमचं आजोळ. शिपोशी. आजोळाची ओढ प्रत्येकालाच असते, पण विशेषतः मे महिन्यात तिथे जाऊन महिनाभर मुक्काम ठोकण्याचं एक विशेष आकर्षण असायचं. आंब्या-फणसाचा यथेच्छ आस्वाद, नदीतली आंघोळ, मनसोक्त भटकंती आणि आजीचं प्रेम! आमच्या लहानपणी सुटीत कुलू-मनाली, नैनिताल-दार्जिलिंग, गीर-कान्हा, गेला बाजार महाबळेश्‍वर, असं कुठे फिरायला जाण्याची पद्धत नव्हती. किंबहुना, तसा विचारही कधी मनात यायचा नाही. पर्यटन म्हणजे लग्ना-मुंजीच्या निमित्तानं मुंबई-पुणे किंवा कोल्हापूरला केलेला दौरा. येता-जाता कुणाची गाडी असेल किंवा अगदीच सोयीचं असेल, तर एखाद्या ठिकाणाचं दर्शन.

ब्राऊ....१

लेखक गवि यांनी गुरुवार, 05/05/2011 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
3

एक दिन का सि .एम / पि.एम.

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 05/05/2011 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार वाचकानो, ओसामा सारखा कट्टर अतिरेकी ज्याने जिहादच्या नावाखाली असंख्य गुन्हे केले तो शेवटी "कुत्ते कि मौत "च मारला गेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निर्णायक कृतीचे जवळजवळ सर्व देशांनी समर्थन केले आहे अमेरिका हे एक अतिप्रगत राष्ट्र आहे हे मान्य ,पण बराक ओबामा यांनी उचललेले पाउल हे धाडसी आहे मला एक असा प्रश्न पडतो कि मुंबईवर २६ /११ ला झालेल्या हल्ल्यातला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाबच्या व त्याच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधाचे ,गुन्ह्यांचे सर्व पुरावे उपलब्ध असूनही त्याला अजून फाशी का

एक अजरामर पाककृती.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 05/05/2011 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
लेखांचा खीमा-पाव साहीत्य : १) मिपावरील कुठलाही लेख ज्यात सावरकर, टिळक, आंबेडकर, यशवंतराव, पु.ल.देशपांडे, इत्यादि....('तात्यासाहेब', 'बळवंतराव' भीमराव, 'भाईकाका, इ.) अशा माणसांची किमान तीन किंवा जास्त वेळा नावे आलेला लेख. हे या पदार्थाचे प्रमूख साहित्य आहे. हे नसेल तर किमान एखाद्याने चांगल्या भावनेने लोकांना चांगले वाचायला मिळावे या भावनेने टाकलेला लेख. यात जर इतिहास डोकावत असल्यास हा पदार्थ अत्यंत रुचकर होतो असा अनुभव आहे. २) ज्या दुकानदाराकडून हा लेख आणलेला आहे त्याचा मेंदू. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की या दुकानदाराला मेंद/अक्कलू नाही या वर आपला ठाम विश्वास असणे हे फार महत्वाचे आहे.

अनुवादासंबंधी मदत हवी आहे.

लेखक मितान यांनी गुरुवार, 05/05/2011 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, चिंचवड येथे भटक्या विमुक्त मुलांसाठीचा एक प्रकल्प चालतो. त्याचे माहिती पत्रक मराठी मध्ये आहे. ते इंग्रजीतूनही असण्याची आता गरज भासत आहे. त्या संदर्भात मदत हवी आहे. मराठीतून असलेले पत्रक इंग्रजीत अनुवादित करायचे आहे. ज्यांना आवड आणि सवड असेल त्यांनी कृपया मदत करा. पत्रकाची स्कॅन कॉपी मी पाठवू शकेन. धन्यवाद.

सुख

लेखक स्पा यांनी गुरुवार, 05/05/2011 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी ७.४७ ला नेहमीच्या खटारा लोकल ऐवजी , नवी कोरी निळी लोकल , लाजत मुरडत येताना बघून तमाम ठाकुर्ली वासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला, आम्ही मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडेच बघत होतो, काय तो थाट.

किल्ली हरविली

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 05/05/2011 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
हरवली आहे एक किल्ली मनाच्या कपाटात बंद केलेली गुपिते ओरखडे न पाडता बाहेर काढणारी हरवली आहे एक किल्ली बंद केलेल्या कानांचे कुलूप उघडून वादविवादात मूकपणे आक्रोशणारे सत्य ऐकणारी हरवली आहे एक किल्ली अपचनानंतर देखील उफ़ाळलेली भूक शमवून दयेची कोठारे उघडणारी हरवली आहे एक किल्ली अन्यायाच्या वणव्यात विझलेली वाणी चेतवून क्रांतीचा वणवा धडधडा बाहेर पाडणारी हरवली आहे एक किल्ली प्रौढत्वाच्या बेडयांमधे जखडलेले शैशवाचे निरागसपण मुक्त करणारी

मावशी-आजीचे घड्याळ (दोन पाठ्यांची जुगलबंदी)

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 05/05/2011 04:02 या दिवशी प्रकाशित केले.
मावशी-आजीचे घड्याळ (दोन पाठ्यांची जुगलबंदी)
(वरील दोन समांतर पाठ्ये जमल्यास एकत्र वाचावीत - आधी एक, नंतर दुसरे, असे नको - अशी वाचकांना विनंती आहे. ज्यांना हे जमवायचे नसेल, त्यांनी असे मानून विचार करावा : या दोन पाठ्यांची श्राव्य जुगलबंदी आहे. ती ऐकण्यासाठी ऐलपैल डॉट कॉमवर दिलेल्या ध्वनिफिती ऐकाव्यात. मात्र दृश्य जुगलबंदी आणि श्राव्य जुगलबंदी यांत काही लक्षणीय फरक आहेत.)

पालक-पनीर

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 05/05/2011 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पालकाची जुडी स्वछ केलेली १०-१२ पनीरचे तुकडे १ मध्यम कांदा बारीक चिरलेला १-२ टोमॅटो गरम पाण्यात उकळून, सालं काढुन, मॅश केलेले दीड टेस्पून आले+लसुण्+हिरवी मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टेस्पून तेल+१ टेस्पून साजुक तुप २ टीस्पून गरम मसाला १ टीस्पून जीरे मीठ चवीप्रमाणे पाकृ: उकळत्या पाण्यात पालक ५ मिनिटे घालून मिक्सर मधून फिरवून घेणे. १ टेस्पून तेल किंवा तुपावर पनीर चे तुकडे सोनेरी रंगावर तळून घेणे.

सुख

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 04/05/2011 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझे असंख्य तुकडे करत खुशाल ह्याच्या त्याच्या झोळीत टाकत होतास ते मिरवत होते माझी लक्तर मूर्खांच्या नंदनवनात आणि तू तुझ देवपण. तुझ्या पायांशी तेव्हा रास पडली होती नमस्कारांची, फेडलेल्या नवसांची, अन थातूर मातुर अर्जांची आणि त्यांच्या हातात होते सुखाचे असंख्य अश्रूबंबाळ दुःखी तुकडे दोन्हीही चक्रवाढ व्याजाने वाढत जाणारे…