आज सकाळी ७.४७ ला नेहमीच्या खटारा लोकल ऐवजी , नवी कोरी निळी लोकल , लाजत मुरडत येताना बघून तमाम ठाकुर्ली वासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला, आम्ही मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडेच बघत होतो, काय तो थाट. काय ती अदा अहाहा
सगळं पब्लिक आज एक दम शिस्तीत आत शिरलं, आमचा ग्रुप आधीच आतमध्ये बसून टवाळक्या करत होताच, चायला कसाऱ्याच्या चाळीतून एकदम मलबार हिल च्या बंगल्यात गेल्यासारखं वाटल,
बसायला गुबगुबीत गाद्या, मोठ्या मोठ्या खिडक्या, प्रचंड वेगाचे पंखे :)
जुन्या लोकल मध्ये फ्यान एक इंच हलतील तर शप्पथ, एकाने कंगवा घालून फिरवण्याचा प्रयत्न केला, तर एक पात हल्ल ते वर्षभराची साठलेली धूळ त्याच्या मस्तकावर अर्पण करूनच, तेंव्हापासून सगळ्यांनी फ्यान हा विषय बंद केलेला ,
आज मात्र ह्या जीवघेण्या लोडशेडिंग मधून मुक्त झालो फिदीफिदी
लेडीज आणि जेन्ट्स फर्स्ट क्लास च्या डब्यात जुन्या लोकल मध्ये पार्टिशन असायची, त्यामुळे पलीकडच काही दिसायचं नाही ;) नवीन लोकल मध्ये चक्क स्टील चे रॉड टाकल्याने बर्याच जणांचा प्रवास सुखकर झाला होता :D
आणि काय तो स्पीड .. वा वा आज ट्रेन कांजूर ला १५ च्या ऐवजी फक्त ५ मिन्तच लेट झाली :D
.
.
.
.
.
साला खरय सुख मानलं तर कशातही मानता येत, आणि नाही तर कशातही नाही .. अगदी स्वर्गातही :)
सुख या गोष्टीला विशिष्ट अशी व्याख्या नाही, ती व्यक्तीसापेक्ष बदलते,
प्रत्येक वेळी सुख हे पैशातच विकत घ्यायला हव असं नाही.
तुमच्याही सुखाच्या छोट्या छोट्या (किंवा मोठ्या मोठ्या) कल्पना असतील , स्वप्नं असतील, इथे मांडा :)
म्हणजे सुख कशाकशात असू शकतं, हे कळेल , आयुष्य अजून सुंदर होईल :)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6004
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख
+१ वल्ली!
ऑफिसमधून बरोबर ५ च्या
जगातील
कंबर मोडेपर्यंत काम करून
सुख जवापाडे ही असू
chhan
parikshecha
समुद्राकाठच्या, नदीकाठच्या
वाह रे स्पावड्या झकास लिहिले
वा वा!!
छान
In reply to वा वा!! by सहज
शनवार रैवार भायेर फिरायाला
मुक्तक खूप आवडलं. माझ्या
खूप उन पडलय बाहेर आणि आसपास
खूप झोप येतेय आणि काम
In reply to खूप उन पडलय बाहेर आणि आसपास by पुष्करिणी
छान लिहिलयस.
क्या बात..क्या बात!
'मर्फी'ज' लॉ बोलायला लागला की
In reply to क्या बात..क्या बात! by धमाल मुलगा
बरेचदा सुखामागे धावता धावता
ऑ??
In reply to बरेचदा सुखामागे धावता धावता by मराठे
वनवासी लोकांचं सुख
छान
गप्प रहायचे ठरवले आहे ,पण
In reply to छान by आनंदयात्री
__/\__
In reply to गप्प रहायचे ठरवले आहे ,पण by टारझन
फॉक्कन्....
In reply to गप्प रहायचे ठरवले आहे ,पण by टारझन
पोळी तव्यावर फुगली जाम आनंद
वनवासी लोकांचं सुख
असुराशी दैत्य सहमत.
In reply to वनवासी लोकांचं सुख by दैत्य