Skip to main content

जैतापुर प्रकल्पाचा गुंता

लेखक शंकर पु. देव यांनी रविवार, 15/05/2011 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
कोणताही प्रकल्प एखाद्या ठिकाणचे लोक सहजासहजी स्वीकारत नाहीत. स्थानिक लोकांचे त्यांच्या राहत्या ठिकाणशी एवढे जवळचे संबंध व नाती निर्माण झाली की, सहजासहजी स्थनिक रहीवाशी आपली जमिन व घरेदारे आणि शेतीवाडी देण्यास तयार होत नाहीत. यामुळेच महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी एखाद्या प्रकल्पाबाबत लोकांनी विरोध केला नाही, असे घडलेले नाही. सेझ विरोधात रायगडमध्ये शेतक-यांनी लढा दिला आणि जमिन संपादन करणे अशक्य केले. यामुळेच सरकारला सेझची योजना गुंडाळून ठेवावी लागली. प्रकल्पामुळे जनता विस्थापीत होते आणि एकदा विस्थापीत झाली की, मग या प्रकल्पग्रस्तांना किंवा धरणग्रस्तांचा वाली कुणीच रहात नाही.

बालगंधर्व, आम्ही तुम्हाला पाहिलं!

लेखक समीरसूर यांनी रविवार, 15/05/2011 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातल्या दिवसेंदिवस असह्य होत जाणार्‍या वाहनवरातीतून कसेबसे रस्ता काढत आम्ही आठ वाजता सिटी प्राईडला पोहोचलो. 'बालगंधर्व'चे खूप कौतुक ऐकून होतो; त्यामुळे हा चित्रपट पाहणं क्रमप्राप्त होतं. शिवाय 'नटरंग'मुळे रवी जाधव काय ताकदीचे दिग्दर्शक आहेत हे लक्षात आलं होतंच. आगाऊ तिकिट काढून देखील अगदी कोपर्‍यातली तिकिटे मिळाली होती. स्थानापन्न झालो. पुढील सव्वादोन तास अक्षरश: मंतरलेल्या अवस्थेत चित्रपट पाहिला. कशाकशाचं तोंड भरून कौतुक करावं? शब्दात कसं पकडायचं ते गारुड?

' चहा '

लेखक विदेश यांनी रविवार, 15/05/2011 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
एक वर्ग ' चहा प्या ' म्हणणारा आहे. चहाने सकाळी लवकर पोट साफ व रिकामे होते, असे तो वर्ग सांगतो. शिवाय चहा पिल्याने ताजेतवाने वाटून तरतरीहि येते , असे त्या वर्गाकडून म्हटले जाते ! दुसरा वर्ग ' चहा कधीही पिऊ नये ' म्हणणारा आहे. काही माणसे अमक्या बुवा, महाराजाने सांगितले, म्हणून ' आम्ही चहा पिण्याचे कायमचे सोडून दिले (-काही नुकसान झाले नसल्याचा , अनुभव पाठीशी असला तरीही ! ) ' , असे सांगतात ! .सामान्य माणूस जास्त खोलात न जाता , ' कुणी काहीही म्हणो, मी चहा पिणार '- म्हणत ; जमेल तितक्या वेळा चहा पितो .

ब्राह्मणांनी आत्मपरीक्षण करावे भाग -१

लेखक अजातशत्रु यांनी शनिवार, 14/05/2011 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवात करण्याआधी त्या वादग्रस्त लिखाणा बद्दल- श्री.खेडेकर यांनी जे काही लिखाण केले आहे, ते अश्लाघ्य,आक्षेपार्ह, द्वेषमूलक आणी विशेषत:स्त्रियां बद्दल विकृत स्वरुपात असल्यामुळे कोणत्याहि विवेकशील माणसाला आवडणार नाही, त्याचं कुणी समर्थनहि करणार नाहि.असे लिखाण फक्त समाजात दुरावाच निर्माण करेल, त्यामुळे त्यावर शासनाने बंदि घालावी असे माझेहि मत आहे, ब्राह्मणस्त्रियांनी इतर समाजा वर अन्याय/अत्याचार केल्याचे वाचनात/ऐकिवात नाहि कारण त्यांनाहि इतर समाज/शुद्र या बरोबर गुलामित जगावे लागत असे, त्यामुळे विरोध,राग ब्राह्मण्याला असू शकतो संपुर्ण जात समुहाला असता कामा नये, थोर समाजसुधारक महात्मा फुले,डॉ.बा

कसा जपावा मराठी बाणा?

लेखक शंकर पु. देव यांनी शनिवार, 14/05/2011 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र सरकारची मराठीबद्दलची असणारी आस्था किती बेगडी आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. विरोधकांनी मराठीचा मुद्दा उचलून धरुन राजकारण सुरु केले की सत्तेतील राज्यकर्त्यांना मराठीचे प्रेम वाटू लागते. आम्हालाही मराठीबद्दल किती तळमळ आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्यकर्ते करतात. पण कुठे ना कुठे नव्हे, तर प्रत्येक ठिकाणी सरकाअचे हे पुतना मावशीचे प्रेम उघडे पडते व सरकार तोंडघशी पडते. सांस्कृतिक संचनालय हे किती सुसंस्कारीत आहे हे लपून राहिलेले नाही. म्हणूनच पारितोषिकांचे नामांकने जाहिर करताना नेहमीप्रमाणे सरकारी गोंधळ घातला गेला.

नंदीकाळा-मुळ काव्य>(जग हे बंन्दीशाळा)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 14/05/2011 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन काव्य मायमाऊली मराठीच्या अतीस्वाभिमानी किंवा अंधाभिमानी अपत्यास हे काव्य अर्पण करताना मनाला "दिव्य आनंद" होत आहे.हे सांगणे अगत्याचे वाटते.आयुष्यभर केळ्यांचा आस्वाद न घेता,व्याकरणाचे 'शिक्रण' करुन खाण्यातच यांचा जन्म जायचा...आणी तिथेही 'यांचा' पंक्तीप्रपंच मधे मधे आड यायचा.तेंव्हा या माहाभागांच्यामधुन आपण बाहेर पडावे,आणि जाता जाता एक आहेर,बाहेर पडण्यापुर्वी यांना करावा हे उचित नाही काय? असो...विडंबनाला जुळी भावंडे म्हणता म्हणता,मुळ काव्य-जग हे बंन्दी शाळा-प्रथम अपत्य,बघ हा रंगित चाळा-द्वितीय(किंवा एकमेवाद्वितीय)
काव्यरस

बंगाल

लेखक chipatakhdumdum यांनी शनिवार, 14/05/2011 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
बंगाल निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. ममतादीदींचा इतिहास पाहीला, तर प्रशासनावर पकड ठेवण्याबद्द्ल त्या कधीच प्रसिध्द नाहीत. रेल्वे खात्याचा काय कारभार कसा चालला आहे, हे जगाला चांगलच माहीत आहे. विषेशतः ज्यांची कारकीर्द विरोधी बाकांवर बसण्यात जाते, ते दीर्घ काल, नव्हे, पूर्ण टर्म सुद्धा नीट शासन करू शकत नाहीत, अस भारतातल्या अनेक उदाहरणांवरून आजपर्यंत दिसून आलेल आहेत. आठवा, युतीचे महाराष्ट्रातील शासन. चांगला गोलंदाज कप्तान झाला, म्हणून तो लगेच चांगला फलंदाज होइल अस नव्हे. म्हस पाण्याबाहेर आली की नंतरच कळत की दुधाला कशी आहे. बंगाली लोकांना शुभेच्छा.

अनोळखी...(गझल)

लेखक स्वानंद मारुलकर यांनी शनिवार, 14/05/2011 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
देऊ नको मला तू नावे अनोळखी का रोज मी स्वतःला व्हावे अनोळखी? मी त्यागिले सुखाने सन्मित्र सोयरे मागून सावली का धावे अनोळखी? गर्दीत ओळखीचे कित्येक चेहरे त्यातून नेमका का भावे 'अनोळखी'? या रोजच्याच वाटा मी चालतो तरी वाटेत लागणारी गावे अनोळखी वैशाख तापलेला वणवा उरी जळे ओठात गीत ओले यावे अनोळखी - स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com