Skip to main content

रव्याचे लाडू.

लेखक ज्योति प्रकाश यांनी गुरुवार, 16/06/2011 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-दोन पेले लाडू रवा(नेहमीच्या रव्यापेक्शा बारिक असतो). एक पेला कणिक्.(गव्हाचे पीठ) साजूक तूप. पिठिसाखर वेलची पूड. कृती:- प्रथम कणिक कोरडीच भाजून घ्यावी.व बाजूला काढून ठेवावी.एका कढईत तूप घेऊन त्यात रवा चांगला भाजून घ्यावा.त्यातच नंतर भाजलेली कणिक मिसळावी.व आच बंद करावी व मिश्रण थंड करण्यास ठेवावे. नंतर त्यात वेलची पूड व पिठिसाखर मिसळावी.व लाडू वळावे.मिश्रण कोरडे वाटल्यास जरूर तेव्हढे तूप मिसळावे.

ज्येष्ठ नागरिक अत्याचार : जागृती, कायदा, मदत व उपाय

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 16/06/2011 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
सत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ.

तुमच्यात्-आमच्यात

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 16/06/2011 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
"हजारो वर्षापुर्वी आपण झुंडीत राहात होतो. काही झुंडीत सशक्तांनी अशक्तांना आधार देणे काटेकोरपणे सांभाळले जायचे.
काव्यरस

आडनावाचे फायदे किती व तोटे किती

लेखक रणजित चितळे यांनी गुरुवार, 16/06/2011 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
जगभर सगळीकडे आपण पहातो की नावा बरोबर आडनावे असतात. युरोपात सुमारे ५००० हजार वर्षापुर्वी आडनावे उपयोगात हळू हळू यायला लागली. भारतात कधी व का उपयोगात आली ते कळायला मार्ग नाही. वेदकाळानंतर गोत्र उत्पन्न झाली. पुढे वंशज व कुळ हे आडनावा सारखे उपयोगात आले. रामाला बहूतेक आडनाव नव्हते. कृष्णाला यादव कुळातला म्हणून संबोधले जाते. वर्णाश्रम व जातीवार रचने मुळे आपल्या कडे आडनावांना महत्व आले. 'अरे पण आडनाव काय त्याचे' मुलाने वर्गातल्या मुलाचे नाव आपल्याला सांगितले की सहजच हा प्रश्न विचारला जातो. ह्या संबंधात काथ्याकूट करण्यासाठी खालील मुद्दे देत आहे. त्या बरोबर माझी मते ही देत आहे. १.

***काळाराम मंदिर / श्री स्वामी समर्थ *** गिरगाव भटकंती.१

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 16/06/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
१) आत्माराम बुवांची समाधी (काळाराम मंदीर -गिरगाव) २) श्री दत्तात्रय (काळाराम मंदीर -गिरगाव) ३) श्री दत्तात्रय (काळाराम म

बदल्ला आहे काळ..

लेखक प्रिया ब यांनी गुरुवार, 16/06/2011 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
"हेल्लो मन्या.. कसा आहेस? बर्याच दिवसात झाला नाही रे आपला call...." "विसरलीस बघ ....long weekend आई.. पाहिला D.C, NY, Niagara fall.." "आम्हाला तुझी आठवण येते... जमेल का रे यायला इकडे?" "लगेचच जमणं अवघड दिसतंय, महिन्या अखेर पर्यंत चा तर तू विचारच सोड.. तुला नाही गं कळणार आई इथे खूप असतो कामाचा load" "बाकी तुमची तब्बेत ठीक ना? कळव मला जर पैसे वगैरे लागणार असतील" "पैसे नकोत रे बाळा.. हवा आहे तुझा फक्त थोडासा वेळ... तो जर तू देऊ शकशील.." "मला देखील यावंसं वाटतं गं.. पण गेलोय पार कामात बुडून... "आई तू मला हव ते माग.. तेवढा माझा वेळ सोडून..." "काय सांगू तुला!!

यू टू, क्रान्तिताई?

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 16/06/2011 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
शत्रूंच्या तलवारींना मी कधीच नाही भ्यालो मित्रांच्या टपल्यांनी पण मी अनन्वीत टेंगुळलो असं एका थोर कवीने म्हणून ठेवलेलंच आहे. तशीच काहीशी टेंगुळलेली अवस्था तुमची 'वड बोलला यमाला' ही कविता वाचून झाली. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली, स्वतःला कलाकार म्हणवून घेणाऱ्यांची जी मनमानी चाललेली आहे ती पाहून वीट यायला लागला आहे. सर्वसामान्य ज्यांना वंदनीय समजतात त्या व्यक्ती, संकल्पना, विभूती, परंपरा यांच्यावर हल्ला केल्याशिवाय आपलं श्रेष्ठत्व सिद्धच होत नाही असं यांना वाटत असावं. अशा विचारजंतांची यादी मोठी आहे.

धमाल मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 16/06/2011 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव खरडसम्राट, आमचे निकटचे स्नेही व आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर धमाल मुलगा, श्री. कैवल्य देशमुख यांचा आज, १६ जुन हा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या खरडवहीला असेच उधाण येत राहो, व त्यांनी आपल्या जालीय व जालाबाहेरील आयुष्यात यशाची नवनवीन शिखरे सर करावीत, हिच श्री गणेशाचरणी प्रार्थना. :) हॅपी बर्थडे धमाल, कीप रॉकिंग! :)