Skip to main content

मुडदुश्याची आमटी,तळलेल्या वेर्ल्या,पेडवे,मुडदुश्या व सोलकढी.

लेखक ज्योति प्रकाश यांनी गुरुवार, 21/07/2011 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
१)मुडदुश्याची आमटी. साहित्यः-५-६ मुडदुश्या.(याला सुळे असेही म्हणतात) २-३ वाट्या खवलेलं ओले खोबरे. अर्धा लहान कांद उभा चिरून व उरलेला अर्धा बारीक चिरून. एक चमचा धणे, ७-८ मिरी. अर्धा चमचा हळद अडीज चमचे लाल तिखट्(हिम्मत असल्यास तब्येतीनुसार) चिंच.

मटन चॉप्स.

लेखक ज्योति प्रकाश यांनी गुरुवार, 21/07/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)मटन चॉप्स, २)आले ३)लसूण ४)तमालपत्र ५)जायपत्री ६)मसाला वेलची ७)लाल तिखट ८)कांदा ९)डालडा १०)मिठ ११)दही १२)थोडे सुके खोबरे १३)हळद १४)कोथिंबीर कृती :-प्रथम कांदा उभा चिरून घ्यावा.कढईत डालडा घेऊन त्यात चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतावा. त्यातच तमालपत्र घालावे.आलं,लसूण्,जायपत्री,मसाला वेलची एकत्र वातून त्यात घालून चांगले परतावे. नंतर चॉप्स घालून थोडे परतावे.त्यात लाल तिखट,हळद घालून पुन्हा निट परतून घ्यावे.पाणी घालून

सामराजगड आणि रेवदंडा.

लेखक हेम यांनी बुधवार, 20/07/2011 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १- कांसा बेटावरील पद्मदुर्ग..= http://www.misalpav.com/node/18354 पद्मदुर्ग आटोपून ११ च्या सुमारास राजपुरीतून निघालो. आता लक्ष्य सामराजगड होते. सामराजगड हा छोटासा दुर्ग मुरुड आणि राजपुरी यांच्यामध्ये असलेल्या एकदरा गांवाजवळ आहे. एकदरा गांवातले लोक किल्ला म्हटल्यावर नीट माहिती देईनात. एकदरा गांवातल्या शिव मंदिराजवळ गेल्यावर मुरुड समुद्रकिनार्‍याचा सुंदर देखावा दिसतो.

ब्राऊ...३

लेखक गवि यांनी बुधवार, 20/07/2011 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
3

चेतनची शोकांतिका

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 20/07/2011 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या व्यक्तिचे विचार, त्याचे महात्म्य जगाला कळतच नाही. सॊक्रेटीसला त्याच्याच समाजातील विद्वान ओळखू शकले नाहीत, ज्ञानेश्वर आदी भावंडांचे मोठेपण तर त्यांच्या जन्मगावातील लोकांनाच कळले नाही.

माझ्या बागेतील फुले.

लेखक ज्योति प्रकाश यांनी बुधवार, 20/07/2011 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी एकादशी झाली.वारकर्यांप्रमाणे फुलांनीही पंढरीची वारी संपवून आता फुलायला सुरुवात केली. आमच्या बागेत सध्या कवठी चाफा,ब्रह्मकमळ्,कमळ्,जास्वंद ही फुले फुलायला लागली.त्याचे काही फोटो देत आहे. १)हा कवठीचाफा. 2)ही देवपुजेसाठी काढलेली कवठीचाफ्याची फुले. 3)हे ब्रह्मकमळ्.दोन दिवसामध्ये एकूण ८८ फुले फुलली होती.झाड फुलांनी भरून गेलं होतं.म

भार गेला, शीण गेला, अवघा झाला आनंद.....

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 20/07/2011 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
अप्पा गेले. नाही विश्वास बसत अजून. अप्पा जाणं कसं शक्य आहे? अहो आत्ता उठतील आणि फिरायला जातील, भगवदगीतेतील श्लोक म्हणतील, नातू- नातींशी गप्पा मारतील, तब्बेतीची चौकशी करायला आलेल्याचीच काय चाललंय म्हणून चौकशी करतील, हसत हसत फिरकी घेतील, एखाद्या गोष्टीबद्दल सल्ला न मागता, न विचारता देतील, असे कसे जातील? नाही. खरंच अप्पा गेले. जीवन जगावं कसं आणि मरणाला स्वीकारावं कसं याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अप्पा. पु ल देशपांडे म्हणाले होते, ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय उरले नाहीत. माझं सुदैव की असे पाय मला,आम्हाला लाभले.

पुणे पारपत्र कार्यालय: एक सुखद(?) अनुभव

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 20/07/2011 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच पुण्यात कामानिमित्त जाण्याचा योग आला. हा योग आला नसता तर मी एका दुर्मीळ अनुभवला मुकलो असतो. या एका अनुभवामुळे मला अध्यात्मीक उन्नत्तीचा साक्षात्कार झाला. सहजयोग , विपश्यना , सिद्ध समाधी योग ( एस एस वाय) आर्ट ऑफ लिव्हिंग, ज्ञानेश्वर , तुकाराम , आणि रजनीश ( ऑब्झर्व्ह द ऑब्झर्व्हर) या सर्वांच्या सांगण्याचा एकाचवेळेस प्रत्यय आला. आणि म्या पामराची अवस्था भक्ताला देव भेटल्याचा साक्षत्कार व्हावा काहिशी तैसीच झाली.त्याचे असे झाले मला पारपत्रा संबन्धात मला पुण्यात पारपत्र ( पासपोर्ट ) कार्यालयात जावे लागले. पाऊस अक्षरशः धो धो पडत होता. त्यात अजिबात कंजुशी नव्हती.

वरचा "सा"

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 20/07/2011 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमच्या लग्नाचा आठवा वाढदिवस ..... आज आमच्या संसाराच्या सुरावटीने वरचा "सा" गाठला ... पहाटे पहाटे उगाच मला पल्लवी जोशी चा भास झाला ... आणि ती कर्ण कर्कश्श आवाजात ओरडली "एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, वरचा "सा", वाः क्या बात है !". मी आपले सगळे स्पर्धक करतात तसे खोटे खोटे "हि हि हि, धन्यवाद" वगैरे केले ... आणि उठलो. पहिले तर गेल्या आठ वर्षातले सगळे चढ उतार समोर परीक्षक म्हणून उभे होते ... अनेक वेळा डेनजर झोन मधून बायकोच्या साथीने मी शिताफीने बाहेर आलो ... कित्येक वेळा फ़क़्त तिच्याच मतांचा आधार होता. दिवसाची अशी अपेक्षित सुरुवात झाल्यावर कसे अगदी routine मध्ये असल्यासारखे वाटते ...

मरणाची अवस्था

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 20/07/2011 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
विषय तसा बोजड, सर्वसामान्यांना न आवडणारा आहे. या पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक सजीव कधीना कधी मरतोच. त्याच्या मरण्याच्या तर्‍हा, कारणे वेगवेगळी असू शकतात. पण होणारा मृत्यू एक शाश्वत घटना असते. एकांतात मनात मृत्यूविषयी विचार कधीकधी येतात. रातीच्या वेळी अर्धवट झोपेत कधीकधी मरतांनाची स्थितीची कल्पना येवू शकते. माझा झोपेत श्वास अडकतो. झोपेत चुकून छातीवर झोपल्या गेले तर हमखास असे होते. मोठ्याने ओरडून जागे व्हावे लागते. नेटवर पाहिले असता जीभ मागे जावून श्वासमार्गात अडथळा आणते असे काहीतरी आजाराचे स्वरूप आहे.