१)मुडदुश्याची आमटी.
साहित्यः-५-६ मुडदुश्या.(याला सुळे असेही म्हणतात)
२-३ वाट्या खवलेलं ओले खोबरे.
अर्धा लहान कांद उभा चिरून व उरलेला अर्धा बारीक चिरून.
एक चमचा धणे,
७-८ मिरी.
अर्धा चमचा हळद
अडीज चमचे लाल तिखट्(हिम्मत असल्यास तब्येतीनुसार)
चिंच.
फोडणीसाठी खोबरेल तेल
अर्धा चमचा तांदळाची पिठी.
कृती :-ह्या सुटी केलेल्या मुडदुश्या(सुळे)
कृती :-सर्व साहित्य(मुडदुश्या सोडून) चांगले बारीक वाटून घेणे.फोडणीसाठी खोबरेल तेल घेऊन त्यात बारीक
चिरलेला कांदा मंद गॅसवर लालसर होईपर्यंत परतावा.त्यात मग मुडदुश्या घालाव्या.व लगेच बारीक
वाटलेले वाटण घालावे.तत्पूर्वी वाटणाला तांदळाची पिठी लावावी.मिठ घालावे.चांगली उकळली व मासे
शिजले कि गॅस बंद करावा.
२)तळलेले वेर्ल्या,पेडवे व मुडदुशी.
ह्या वेर्ल्या
हे पेडवे.
साहित्यः-तांदळाची जाडसर पिठी.,हळद्,लाल तिखट,मिठ,तेल.
कृती :-माश्यांना हळद्,निखट व एक चिमूट मिठ लावावे.तांदळाच्या पिठीत घोळवून तेलात चुरचुरीत तळावे.
सोलकढी.
साहित्यः-२-३ चमचे ओल्या नारळाचा चव.
२ पाकळ्या लसूण
अगदी थोडी हिरवी मिरची.
मिठ व २-३ आमसूले.
कृती :-प्रथम एक पेल्यात आमसूले साधारण अर्धा तास आधी भिजत घालावी.त्यातच चवीप्रमाणे मिठ घालावे.
नारळाच्या चवात लसूण्,हिरवी मिरची व पाणी घालून वाटून घ्यावे.वाटपाचे पाणी आमसुले घातलेल्या
पेल्यात पिळून घ्यावे.वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.लसूण व हिरवी मिरची वाटपात न
घालता चेचून घातली तरी चालते.
मग काय कसा काय वाटला बेत?
वाचने
9633
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुडदुशे म्हणजे काय????
एक प्रकारचा मासा असतो
In reply to मुडदुशे म्हणजे काय???? by निवेदिता-ताई
* ("कारण शेवटी आम्ही भटेंच. त्याला काय करणार?" - पु.ल. "अघळपघळ"मधून.)
मुडदुशे म्हणजे
In reply to एक प्रकारचा मासा असतो by पंगा
पण...
In reply to मुडदुशे म्हणजे by प्रचेतस
पण
In reply to पण... by पंगा
पाण्यात सूर्यप्रकाश...
In reply to पण by प्रचेतस
बरोब्बर
In reply to पाण्यात सूर्यप्रकाश... by पंगा
किंचित दुरुस्ती
In reply to बरोब्बर by प्रचेतस
हाच न्याय
In reply to किंचित दुरुस्ती by पंगा
काणे म्हणून मुडदुशे - एक पर्स्पेक्टीव
In reply to हाच न्याय by प्रचेतस
साखळी प्रतिक्रिया?
In reply to काणे म्हणून मुडदुशे - एक पर्स्पेक्टीव by सुनील
किंचित साशंक
In reply to हाच न्याय by प्रचेतस
माझा
In reply to किंचित साशंक by पंगा
हम्म्म्...
In reply to माझा by प्रचेतस
आपल्या
In reply to हम्म्म्... by पंगा
नसावेत
In reply to आपल्या by प्रचेतस
मग
In reply to नसावेत by पंगा
हम्म्म्...
In reply to मग by प्रचेतस
...कोठून मिळत असावा बरे
In reply to पाण्यात सूर्यप्रकाश... by पंगा
मी शाकाहारी असले तरी हे फोटू
वेर्ल्या,पेडवे हेही मासे का?
वेर्ल्या,पेडवे,मुडदुश्या एक
झकास!
काय बोलू..?! शब्दच नाहीत..!
वेर्ल्या,पेडवे ही नावं जरी
मस्तच