Skip to main content

अवास्तव अवास्तव

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 27/07/2011 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं नाव वास्तव आणि आडनाव श्रीवास्तव असेल तर ती व्यक्ती स्वत:चं नाव कसं लिहील? श्री. वास्तव श्रीवास्तव. असंच काहीसं गंमतीशीर वाटतंय ना या पोस्टचं शीर्षक? पण काय करणार परिस्थितीच तशी आहे. म्हणजे त्याचं असं आहे पाहा, समजा एखादी गोष्ट प्रत्यक्षात घडणे अशक्य असेल तर आपण काय म्हणतो? अवास्तव. त्याचप्रमाणे आपल्या स्वप्नांना आपण काय म्हणतो? अवास्तव. आणि आता जर का एखादी गोष्ट स्वप्नात देखील अशक्य असेल तर तिला काय म्हणणार? अवास्तव अवास्तव असंच ना? आता तुम्ही म्हणणार स्वप्नात देखील अशक्य असं काय असू शकतं?

चिकन टिक्का मसाला

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 27/07/2011 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एक पंजाबी मैत्रीणीने पाकृ सांगितलेल्या प्रमाणे बनवली आहे.तीच येथे देत आहे, अतिशय चवदार अशी पाकृ आहे :) साहित्यः ५०० ग्राम साफ करून ठवलेले चिकन चिकनला १ टेस्पून आले+लसूण्+पुदिना पेस्ट, २ टेस्पून दही, २ टीस्पून तंदूरी मसाला, १ टीस्पून गरम-मसाला, मीठ लावून फ्रिजमधे ७-८ तास ठेवावे. . ३ मध्यम कांदे बारीक चिरून ३ मध्यम टोमॅटो बारीक चिरून २ टेस्पून आले+लसूण पेस्ट ३-४ टेस्पून काजु-पेस्ट १ टेस्पून लाल तिखट १ टेस

भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 27/07/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन
                भुलाबाईची गाणी ही तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवितात. काही गाणी सामाजिक आणि आर्थिक शोषणाला नकळतपणे प्रतिबिंबित करून जातात.

भूमिका बदल

लेखक साधा_सरळ यांनी बुधवार, 27/07/2011 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
छे! बाबांना कितीतरी मुद्दे सांगायचे होते, पण का कोण जाणे, जमतच नव्हतं काही बोलायला... काल त्यांच्या ऑफीसमधले काका अभिनंदन करत होते, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. मी ठरवलंच होतं सरळ त्यांना सांगायचं - तुमची बढती झालीय ना, मग जा तुम्हीच एकटे. मी नाही येणार! पाहिजे तर आईला पण घेऊन जा, मी राहीन इथे आजीबरोबर. हो, जमेल आम्हाला! काय गं आजी? इथे माझे मित्र आहेत, माझी शाळा आहे, मस्त मोकळं मैदान आहे, ह्या वर्षी खो-खो चा कॅप्टन पण होईन मी... हे सगळं व्यवस्थित असताना का येऊ तिथे अनोळखी जागी? तिथं कसे मित्र होणार माझे? शाळा तरी असेल का ह्या शाळेसारखी?

अ‍ॅन्डर्स ब्रेइविक (ओस्लो, नोर्वे) आणि कट्टर हिन्दूत्व ???

लेखक कापूसकोन्ड्या यांनी बुधवार, 27/07/2011 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी वास्तव हे कल्पने पे़क्षा रम्य (?) असते. नॉर्वे देशातील ओस्लो बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अ‍ॅन्डर्स ब्रेइविक याचे भारततील लोकांशी संबंध असून त्याचे स्वप्न हे हिटलरी स्वरूपाचे आहे.