मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिकन टिक्का मसाला

सानिकास्वप्निल · · पाककृती
माझ्या एक पंजाबी मैत्रीणीने पाकृ सांगितलेल्या प्रमाणे बनवली आहे.तीच येथे देत आहे, अतिशय चवदार अशी पाकृ आहे :) साहित्यः ५०० ग्राम साफ करून ठवलेले चिकन चिकनला १ टेस्पून आले+लसूण्+पुदिना पेस्ट, २ टेस्पून दही, २ टीस्पून तंदूरी मसाला, १ टीस्पून गरम-मसाला, मीठ लावून फ्रिजमधे ७-८ तास ठेवावे. Image removed. ३ मध्यम कांदे बारीक चिरून ३ मध्यम टोमॅटो बारीक चिरून २ टेस्पून आले+लसूण पेस्ट ३-४ टेस्पून काजु-पेस्ट १ टेस्पून लाल तिखट १ टेस्पून गरम-मसाला १/४ टीस्पून हळद १ टीस्पून धणेपूड १/२ टीस्पून काळीमिरीपूड मीठ चवीनुसार तेल Image removed. २ टेस्पून अख्खे धणे १ टेस्पून जीरे २-३ तमालपत्र ३-४ दालचिनी ९-१० काळीमिरी २ मसाला वेलची ४-५ लवंगा Image removed. वरील सर्व खडा मसाला कोरडाच भाजून त्याची पूड करून घेणे. पाकृ: मॅरीनेट केलेले चिकन बेकिंग ट्रे मध्ये ठेवावे, चिकन पीसेसवर थोडे तेल सोडून २०० डिग्री वर १० मिनिटे शिजवून घेणे. एका जाड बुडाच्या भांडयात तेल तापवून त्यात कांदा, आले+लसूण पेस्ट घालून चांगले परतून घेणे. Image removed. कांदा चांगला परतला गेल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो घालून परतणे. Image removed. टोमॅटो चांगले गळून गेले की त्यात सर्व मसाले, मीठ व वर सांगितलेल्या खडा-मसाल्याची पूड २-३ टीस्पून घालून तेल सुटेपर्यंत परतणे. Image removed. परतलेल्या मसाल्यात काजु-पेस्ट घालून परतणे. Image removed. त्यात शिजवलेले चिकनचे तुकडे, थोडे पाणी घालून, झाकून शिजवणे. Image removed. वरून थोडा गरम-मसाला, कोथिंबीर घालणे व गरमा-गरम सर्व्ह करणे. Image removed. (मी ह्या डिशला थोडा स्मोक्ड फ्लेवर दिला, कोळसा गॅसवर पेटवणे, निखारा वाटीत ठेवून ती वाटी ग्रेव्हीमधे ठेवावी व त्यावर तेल सोडावे व लगेच झाकण बंद करणे.)

वाचन 10286 प्रतिक्रिया 0