Skip to main content

वृद्ध मातापित्यांची समस्या

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 17/08/2011 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकत्र कुटुंबपद्धतीच्या घरांमधे वृद्धांचा प्रश्न फारसा त्रासदायक नव्हता. पणज्या, आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, मुलं, नातवंडं सगळीच मंडळी एका घरात रहायची. घरात अनेक माणसं असल्यामुळे वृद्धांना एकटेपणा काय ते माहित नव्हतं, घरातले कर्ते पुरूष पैसा कमावण्यासाठी घराबाहेर असायचे, स्त्रिया घर चालवण्याच्या (ज्याला आपण आता बॅकएंड किंवा पडद्याआडची कामं म्हणू शकतो) कामात गर्क असल्या तरी पोरांकडे लक्ष द्यायला आजी-आजोबा होतेच, अतिवृद्धांची काळजीही घरात घेतली जायची. औद्योगिकीकरणानंतर ही परिस्थिती झपाट्याने बदलत गेली.

वारी - सज्जनगड

लेखक स्पा यांनी बुधवार, 17/08/2011 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांपासून सज्जनगड ला जायचे मनात होते, पण योग जुळून येत नव्हता,योगिराणाकागदावर उतरल्यापासून तर हि इच्छा प्रबळ झाली, आता काही झाले तरी जायचेच, एकट जाव लागल तरी बेहत्तर. अशाच एका संध्याकाळी सूड शी याबद्दल बोललो, त्यानेही चक्क एका फटक्यात येण्याची तयारी दाखवली, धाग्यावर किसानाही येतो असे म्हणाला होता, त्याला फोन केला, तो हि यायला तयार झाला, मग फटाफट बाकी मिपाकर ट्रेकरमित्रांना बोलावण धाडल, पण नेमके सगळे कुठल्या न कुठल्या कामात अडकलेले होते, शेवटी आम्ही तिघच निघालो. ठाण्याहून सातारा पर्यंत बस च आरक्षण केल्या गेल होतंच :) रात्री १२ ची बस होती,

अतिशय गाजलेलं भंपक पुस्तक

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 17/08/2011 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच बहुचर्चित अल्केमिस्ट हे पुस्तक वाचलं. पाऊलो कोएलो यांच्या पुस्तकाचं जगभरात प्रचंड कौतुक झालेलं असून त्याच्या अनेक भाषांत कोट्यावधी प्रती विकल्या गेल्या आहेत (अशी माहिती सदर पुस्तकाच्या शेवटच्या पृष्ठावर होती). याचं अजिबात आश्चर्य नाही की अशी पुस्तकं लिहीली जातात. याचं देखील आश्चर्य नाही की अशी पुस्तकं छापली जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक अशी पुस्तकं पैसे (आणि त्याहून ही मुल्यवान असा वेळ) खर्चून का वाचतात? माझ्यापुरतं म्हणाल, तर अनेक ठिकाणी छापून आलेल्या या कादंबरीच्या अवास्तव कौतुकाला बळी पडूनच मी या कादंबरीच्या वाचनात माझा वेळ वाया घालविला.

टून

लेखक कोदरकर यांनी बुधवार, 17/08/2011 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
cartoon

पंख मोकळे नभात..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 16/08/2011 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाच जन्म मिळतो, घेउ दे मला जरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा गर्भ राहिला म्हणून, माय-बाप हर्षिले वाटले जसे अकाश बोट एक राहिले मास हे नऊ असे बहरु दे मला जरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा जन्मण्याअधीच मी, 'गुन्हा'च जाहले कशी माय! सावली तुझीच, वाढते तुझ्या कुशी अंतरी तुझ्या निवांत, पाहते चराचरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा "मी न भार!' सांगतेय, मांडते अकांत मी 'स्त्रीच जाहले म्हणून, का तुम्हा नकोय मी?? मी तुझाच श्वास माय, दे तुझाच आसरा पंख मोकळे नभात पसरुदे मला जरा मी नसेन तर जगात पाळणा हलेल का? माय अन बहीण..
काव्यरस

अण्णा हजारे

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 16/08/2011 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही एकटे नाही आता, साथीला आम्ही सारे आहोत. एकच अण्णा नाही आता, सारे अण्णा हजारे आहोत. वावटळ आहे वादळ आहे अन अण्णांचे पायदळ आहे तुम्हा वाटले आम्ही सारे संध्याकाळचे वारे आहोत दिशाभुल करण्या अमुची, तु ध्रुवाला लपवले आहे ठावुक नाही तुम्हाला आम्ही सारे ध्रुव तारे आहोत (मिसळपाव च्या अण्णा हजारेंना पाठिंबा देणार्‍या सर्व सभासदांना नम्र विनंती आहे, कि या कवितेत आणखी कडव्यांची भर घालावी अन हि कविता जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. मी या कवितेला हक्कमुक्त करत आहे.)

सणांचे नैवेद्य व फराळाचे प्रकार २) नारळी पौर्णिमा - ओल्या नारळाची करंजी

लेखक जागु यांनी मंगळवार, 16/08/2011 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे नारळी पौर्णिमेच्या दिवशी ओल्या नारळाच्या करंज्या करण्याची प्रथा आहे. साहित्य : पुरणः १ ओला नारळ खरवडून पाव किलो गुळ खसखस चारोळी/काजु/आक्रोड/मनुका वेलची/केसर तुप पारी: गव्हाचे पिठ अर्धा किलो १ चमचा रवा चिमुटभर साखर मिठ तेल पहिला गव्हाच्या पिठात मिठ, रवा, साखर टाकुन घ्या मग मिसळून २ चमचे तेलाचे मोहन (एका भांड्यात तेल तापवुन ते पिठावर ओता) टाका. आता थोडे थोडे पाणी टाकत पिठ घट्ट मळा.

हिरव्यागार सृष्टीच सहवास--शिवथरघळ

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 16/08/2011 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्या डोंगरावर पांघरलेली पांढ-याशुभ्र ढगांची चादर , डोंगरातून झेपावणारे शुभ्र धबधबे ,हिरव्यागार सृष्टीचा सहवास आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनाला नवी चेतना देणारा अध्यान्माचा स्पर्श ....हे सारं अनुभवायचे असेल तर शिवथरघळीसारखे सुंदर ठिकाण नाही.समर्थांनीही ज्याचे वर्णन विश्रांती वाटते येथे ,जावया पुण्य पाहिजे , अशा शब्दात केलेले आहे त्याची अनुभुती येथे आल्याशिवाय मिळत नाही.दासबोधाची जननी असणारी शिवथरघळ पहावी ती पावसाळ्यातच !.दाट वनराई मध्ये नजीक असणा-या धबधब्याशेजारीच शिवथरघळ आहे .सुंदरमठ असे यथोचित या ठिकाणाला नाव आहे. घळीकडे घेऊन जाणारा प्रवासही अत्यंत सुखकर.हिरवीगार फुलले