Skip to main content

(वैयक्तिक टिप्पणीशिवाय) तूलनात्मक अभ्यास

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 29/08/2011 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझा श्री. अण्णा हजारे यांच्या आंदोलनावरील (संभवामि युगे युगे) इथे व (जवळ-जवळ) शब्दशः तोच लेख ई-सकाळवरही दिला होता. या दोन संस्थळावरील वाचकांच्या प्रतिसादांची तूलना मला मनोरंजक वाटली व म्हणूनच कुठलीही वैयक्तिक टिप्पणी न देता सकाळच्या वाचकांचे प्रतिसाद मी इथे कॉपी-पेस्ट केले आहेत. वाचकांचे प्रतिसाद १३९ तर माझे स्पष्टीकरणास्तव दिलेले प्रतिसाद (Italics मध्ये) आहेत २६.

होड्या सोडणे

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 29/08/2011 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
hodi होड्या सोडणं (पुड्या नव्हे!) अन् खोड्या काढणं हा तर आम्हां मुलांचा पावसाळ्यातील मजेशीर उद्योग असायचा. त्यातल्या त्यात साचलेल्या पावसाच्या उथळ पाण्यात कागदी होड्या करून सोडणं व त्या कशा वाहत जातात, कोणाच्या कशा डुबकी मारतात किंवा कोणाच्या कशा तिरक्या होऊन गटांगळ्या खातात हे पाहणं फार मौजेचं गणित असायचं. होड्या तयार करणे आम्हांला जमत नसल्याने मोठ्या पोरांकडून बनवून घाव्या लागत.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा

लेखक रणजित चितळे यांनी सोमवार, 29/08/2011 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
जन लोकपाल हे विधेयक संसदेत आणण्यासाठी अण्णा हजारे ह्यांच्या आमरण उपोषणा बद्दल लोकांकडून व सरकार कडून बरेच प्रश्न विचारले जात आहेत. प्रामुख्याने त्यातले काही प्रश्न असे आहेत. अ) जन लोकपाल किंवा लोकपाल विधेयक आणल्याने भारतातला भ्रष्टाचार संपणार नाही. ब) अण्णा हजारे ह्यांचे आमरण उपोषण हे असंविधानिक आहे व पुढे हेच उदाहरण घेऊन बाकीची लोकं सरकारला वेठीस धरू लागतील. क) जन लोकपाल विधेयक लागू करण्यालायक नाही. त्यातल्या तरतुदी लोकशाहीच्या तत्त्वांविरुद्ध आहेत. ड) विधेयक संसदेत आणायला व ते पारित होण्यास वेळ लागतो.

नवीन लेखकांना मार्गदर्शन करता येईल का?

लेखक चित्रा यांनी सोमवार, 29/08/2011 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच मिसळपावावर काही नवीन सदस्य येत असतात. अशांपैकी काही सदस्यांना आपले लेख आणि कविता तसेच प्रतिक्रिया मिपावर देण्याची इच्छा असते. मात्र उत्साहाने लिहीलेल्या लेखांना आणि कवितांना अपेक्षित प्रतिक्रिया आल्या नाहीत, किंवा वात्रट किंवा तिखटही प्रतिक्रिया आल्या की नवीन लेखक निरुत्साही होतात किंवा कधीकधी चिडतातही. जुन्या मिपाकरांना अशा प्रतिक्रिया नवीन नाहीत.

पुन्हा एकदा पाऊस ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 29/08/2011 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... वाटले मारावी उडी त्या चिखलात अन बरबटून घ्यावे सगळे पाय अन हात ... मन तर कधीच बरबटले आहे .... कुठेतरी खोल आत ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... भिरकावून द्यावी ती हातातली छत्री भरून घ्यावा हा निसर्ग आपल्या गात्री ... नंतर पुन्हा आहेतच न ओल्या न कोरड्या अश्या कुबट रात्री ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... भिजतानही आतून मी कितीतरी वेळ जळत होतो डोळ्यातले पाणी त्या पावसात मिसळत होतो आज पुन्हा एकदा पाऊस मला अन मी पावसाला छळत होतो ... कोणास ठाऊक कसे पण आज वाटले चिंब भिजावेसे ... - विश्वेश
काव्यरस

उपोशण

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 28/08/2011 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांनी १२ दिवस नुसते पाणी पिवुन उपोशण करुन जनतेस हवे ते मिळवुन दिले...या बद्दल सारा भारत त्यांचा आजन्म रुणी आहे यात शंकाच नाहि.. मराठे लढाया जिंकतात पण तहात हरतात असा आपला ईतिहास आहे.. पण ह्या राळेगणच्या पठ्ठ्याने लढाई तर जिंकलीच पण तह हि मनासाराखा घडवुन आणला. पण १२ दिवस माणुस नुसत्या पाण्यावर राहु शकतो का?

अतिशय गाजलेला भंपक लेख

लेखक सोत्रि यांनी रविवार, 28/08/2011 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतंच (कोणॆ एके काळी) बहुचर्चित झालेला मी मतदान का करावे? हा लेख वाचला. चेतन सुभाष गुगळे (जगभर प्रसिद्ध असलेले चिंतनशील लेखक) यांच्या लेखाचे जगभरात(?) प्रचंड कौतुक झालेलं असून त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली व जगभरांतुन प्रतिसादांचा पाउस पडला (अशी माहिती सदर लेखाच्या शेवटी होती). याचं अजिबात आश्चर्य नाही की असे लेख लिहीले जातात. याचं देखील आश्चर्य नाही की असे लेख प्रसिद्धही केले जातात. अर्थात या गोष्टीचं निश्चित आश्चर्य वाटतं की लोक असे लेख मुल्यवान असा वेळ खर्चून का वाचतात?

मुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 28/08/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मी अमेरीकेला गेले होते. विमानात काय खावे अन काय नको असला विचार करत मी न लाजता डब्यातल्या दशम्याच खाल्या. विमानात मोठ्या शिस्तीचे कौतूक वाटले. एअरहोस्टेस अगदी लगबग करत होत्या. आमच्या ह्यांनी त्यांच्याकडचेच अन्न खाल्ले. नंतर यांनी त्यांच्याकडे जावून त्यांच्याकडून विमानाची माहिती घेतली. आमचा मुक्काम माझ्या लेकीकडे इलिनॉय येथे होता. तेथे लेक जावयाचे मोठे प्रशस्त घर आहे. घरात सर्व सोईसुविधा आहेत. अगदी वॉशींग मशीन पासून ते डिशवॉशरपासून ते अगदी ईलेक्ट्रॉनीक टूथब्रशपर्यंत सार्‍या सुविधा घरात आहेत. लेक व जावई दोघेही आयटी कंपनीत आहेत.
काव्यरस

मी मतदान का करावे?

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी रविवार, 28/08/2011 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : सदर लेख मी दोन वर्षांपूर्वी झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री लिहून माझ्या सर्व परिचितांना इमेल ने पाठविला. तेव्हा मी मिसळपावचा सदस्य असूनही काही कारणास्तव या संकेतस्थळापासून दूरच होतो, त्यामुळे तेव्हा हा लेख इथे प्रकाशित केला नव्हता. आता बराच काळ लोटला असला तरीही हा विषय आउटडेटेड झालाय असे मला वाटत नाही. या विषयावर इथल्या मान्यवर सदस्यांचे अभिप्राय जाणून घ्यायला मला निश्चितच आवडेल म्हणून हा लेख आता इथे प्रकाशित करीत आहे. दुसरे असे की, तेव्हा मी हा लेख किरण फॉन्ट मध्ये टंकलिखीत करून त्याची पीडी फाईल बनविली होती.