शैक्षणिक वर्षातील अंतर् असलेल्यांनी/एक वर्ष नापास असलेल्यांनी कधीच सरकारी नोकरी करायची नाही?
जवळजवळ सर्वच सरकारी नोकरीच्या भरतीच्यावेळी 'शैक्षणिक वर्षातील अंतर् असलेल्या/एक वर्ष नापास झालेल्या' विद्यार्थ्यांना डावलले जाते.मी कीत्येक उदाहरणे बघितलेत ज्यांमधे विद्यर्थ्यांनी बारावी कींवा डीग्रीच्या एखाद्या वर्षात नापास व्हावे लागले/त्यांनी एकतर काही अटळ कारणास्तव परीक्षाच दीली नाही कींवा परीक्षा देउन नापास झाले.त्याच विद्यार्थांनी नंतरच्या परीक्षेत ८०-८५% टक्के काढले.
पण सरकारी नोकरीत ते परीक्षा पास होतात व ईंटरव्ह्युला नाकारले जातात.
हे कीतपत बरोबर आहे?
पाहूच की
पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची
अन् आरशाला प्रतिमांची
.
आरशाला तरी मुभा असते अंधारात डोळे मिटण्याची
कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते
अंधार असो वा उजेड
नावड असो वा आवड
त्याला लिहावीच लागते,
हृदयातून उमटणारी ओळ
.
जसे पाण्याला घ्यावाच लागतो,
त्यात मिसळणारा रंग
.
पडलाच उजेड तर दिसेलच कि जगाला
पाण्याचा रंग आणि
कवीची ओळ
म्हणूनच मी निवांत आहे
.
माझ्या ओळीच्या प्रारब्धिही
असेलच कि उजेड
उजळेल तेव्हा पाहूच की
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१४/०९/२०११)
काव्यरस
निष्पर्ण
"बाबा, आईला पण घेऊन जा ना आज; तिची खूप इच्छा आहे..."
"असं काय करतोस, गौतम? तुला माहिती आहे ना काय होतं ते?"
"मला माहिती आहे हो...पण...अपूर्वापण मला सांगत होती की आज बाबांना आईला सोबत घेऊन जायला सांग म्हणून...आई रडली तिच्याजवळ काल दुपारी."
"गौतम, मला वाटत नाही का तिला सोबत घेऊन जावं म्हणून? मागच्या वेळेस मी आणि ती गेलो होतो सुधाकरच्या घरी. मग घरी परत आल्यावर ती कितीतरी वेळ रडत बसली होती कुणी तिच्याशी बोलत नाही म्हणून..."
"मग तुम्ही तिला सहभागी करून घेत जा ना तुमच्या गप्पांमध्ये. म्हणजे आपोआप सगळे बोलतील, बरं वाटेल तिला...सुधाकरकाका, विमलकाकू, अजय, स्मिता...सगळ्यांना माहिती आहेच ना.
धर्माच्या नावाचे ब्रॆन्डींग, पण फक्त सोयीचे असेल तिथेच...
जैन धर्म हा जगात आणि भारतात देखील अत्यल्पसंख्य असलेला आणि तरी देखील मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव टिकवून असलेला ब्रॆंड आहे. होय हा ब्रॆंड आहे असे मी म्हणतोय कारण मी हॊटेलात मेनूकार्ड वर जैन पावभाजी पाहतो. जैन पिझ्झा देखील सर्वांना परिचयाचा असेलच. पण मी कधी बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे जैन धर्मीयांमध्ये अनेक व्यक्ती आपले आडनाव जैन असे लावतात. हा प्रकार देखील मी इतर ठिकाणी पाहिलेला नाही म्हणजे मंहमद मुस्लीम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हीड ख्रिश्चन मी अजून पाहिले नाहीत.
सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध
सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध
वाढदिवसाच्या शुभेच्छा
वेळोवेळी 'डेव्हिल्स अॅडव्होकेट' बनून विचार आम्हांस करण्यास प्रवृत्त करणार्या पंगाशेटना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंगाशेट हे आमच्या काही आवडत्या जाल-आयडींपैकी एक. आमचं शिव्या देणं असो१ वा प्रश्न विचारणं२, पंगाशेटने सदैव तार्किक मुद्द्यांवर सहमती वा असहमती दाखवत आम्हांस विचार करण्यास भाग पाडलं. कधी थोडे चिमटे काढत पंगाशेटने कधी आमची निखळ करमणूकही केली. पंगाशेटना मी "जिवेत शरदः शतम्।" असं म्हणून शुभेच्छांची चार वाक्य संपवते.
मौलवींची मौलिक मौक्तिके !
http://timesofindia.indiatimes.com/city/lucknow/Qazis-knotty-terms-to-s…
ज्या निकाहाच्या वेळी बुफे पद्धतीचे जेवण आणि पार्श्वभूमीवर संगीत असेल तिथे काझी लोक निकाह लावणार नाहीत असे फर्मान काही मुस्लिम धर्म मार्तंडानी काढले आहे. संगीत हे इस्लामला मंजूर नाही. आणि बुफेचे खूळही.
ह्या फर्मानामुळे अनेक मुस्लिम कुटुंबांची पंचाईत झाली आहे. चांगले वाजत गाजत, साग्रसंगीत लग्न, आय मीन निकाह लावण्यावर संक्रांत आली आहे.
नाडीग्रंथ महर्षींचे आणि विज्ञानवाद्यांचे वाकडे असायचे कारण नाही...
मित्रांनो,
माझे, नाडीग्रंथ महर्षींचे आणि विज्ञानवादी अंनिसचे काही वाकडे नाही. ते करत असलेले काम समाजहिताचे आहे. याचा मला आनंद व अभिमान आहे. तेंव्हा गैरसमज नसावा की मी पुराणमतवादी वा अविज्ञानवादी, अंनिस विरोधी आहे.
मात्र त्यांनी नाडी महर्षींच्या ग्रंथांना थोतांडाचा शिक्का मारायच्या आधी ते विविध अंगानी तपासावे म्हणजेच शास्त्रीय कसोटी घ्यावी असे माझे त्यांना नम्र निवेदन गेली १७ वर्षे आहे. अशा शोध अभ्यासाला मी माझा हात सदैव पुढे केलेला आहे. हे मी डॉ. जयंत नारळीकरांना १६वर्षापुर्वी पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट होते.
मिसळपाव

