Skip to main content

शशक'२०२२ - बुडबुडा

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्या चिंतांनो, त्राग्यांनो, तणावांनो, भित्यांनो.. रोज थोडंथोडं नका छळू. तुमची युनिटी करा आडरानात गाठून मुंडी मुरगाळा विषय संपवा सुटकेची एकही आशा ठेवू नका इकडे पहा मी इथे ह्या बुडबुड्यात आहे या आणि पहा जिवंतपणाची कसलीही सळसळ तुम्हाला दिसणार नाही. हा बुडबुडा आपोआप फुटायची वाट बघत मी पडून आहे.. मी स्वतःहून तो फोडणार नाही तेवढी ऊर्जाही माझ्यात नाही आणि ज्या रस्त्याचा शेवट माहित नाही, त्या रस्त्याने कधी गेलो नाही.. म्हणून तुम्ही सगळे मिळून या मला उचलून उघड्या जगात फेका दोन दिवसांच्यावर मी टिकणार नाही शब्द देतो..! बाकी कसाही असलो तरी, मी शब्दाला जागणारा माणूसाय..! कारण शब्दांशिवाय दुसरं काही आ

शशक'२०२२- सूचित

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
वडाच्या झाडाखाली एका टपरीवर, तू छान सिगरेट ओढत असतेस खोकत खोकत का होईना, धुराचे लोळ हवेत सोडत असतेस तुझा तो बॉयफ्रेंड, तुझी पर्स पकडून उभा असतो तुझ्यासाठी आता तो, दुसरी शिलगावून देणार असतो त्या काळोखातून बाहेर, कोणीतरी येताना तुला दिसतो त्या आकृतीकडे बघून, तुला मोठा धक्का बसतो!! “मग पुढे काय होतं?” “मला काय माहित?” “म्हणजे? तू ही कविता केली नाहीस?” “नाही ना, तुमच्या ऑफिसच्या बॅगमध्ये हा कवितेचा कागद सापडलाय” असं म्हणत आमच्या हिने गॅस पेटवला. “पण मग अशी कविता कोणी केली? आणि कशाला? स्ट्रेंज…” तेवढ्यात मला मोबाईलवर कॉल येतो, मी कॉल घेतो. “हॅलो पप्पा, आपली चिनू ताई परत सिगरेट ओढतेय”

शशक'२०२२ - योगायोग

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
"फूट्बोर्डवर पाय ठेवा तुम्ही", अभिरुपने चालत्या ट्रेन पकडणार्या मुलीच्या बखोटीला धरुन आत घेतले. "काय वेंधळेपणा, कशाला धावती ट्रेन पकडता?" "सॉरी चुकले. घरुन फोन आलेला की त्वरित घरी ये…" "इथं लगोपाठ ट्रेन असतात. दुसरी मिळाली नसती का?" ती ओशाळली, आतमध्ये सरकली. तो सांताक्रुझला उतरला आणि खिसे चाचपडु लागला. मागोमाग ती. "काय झालं?" "शट! मगाचच्या गडबडीत आईने मुलीकडच्यांचा एक पत्ता दिलेला तो कागदच उडुन गेला. मी सांताक्रुझचीच, पत्ता सांगाल?. "साफल्यनगर" "समोरचीच कॉलनी, मी तिथेच राहते.

हंपी, हंपी आणि पुन्हा हंपी! भाग ४ (अंतिम)

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 08/05/2022 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
१० ऑगस्ट
केएसटीडीसी मयुरा भुवनेश्वरीमधल्या एकूण व्यवस्थेवर आम्ही समाधानी असलो तरी काल दिलेला नाश्ता मात्र अजिबातच चांगला नव्हता. रविवारी इडली-सांबार आणि उडीदवडे होते. मात्र हे पदार्थ फक्त शनिवार-रविवारच बनवले जातात असं सांगून हॉटेलवाल्यांनी काल फक्त पोहे आणि उपीट यावर आमची बोळवण केली होती. साहजिकच आम्ही तक्रार केली; तेव्हा आज जरा चांगला नाश्ता मिळाला.

शशक'२०२२ - फरियाद

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 08/05/2022 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेन स्टेशनमधुन निघाली . त्या दोघांनी धावतपळत आपला डबा गाठला . " हे दागिने ." तिने आपल्या बॅगमधला डबा काढुन त्याला दिला . "आईबाबांना न सांगता मी त्यांचे दागिने घेतले . आपण सेटल झाल्यावर त्यांना नक्की परत करु ." ती रडु आवरत म्हणाली . "जरुर . गावाकडे चाचुचा बडा कारोभार आहे . आपण त्यांच्याकडेच राहुया ." "आई बाबांनाही आपल्याकडेच बोलवुन घेउ ." ती म्हणाली . त्याने तिला हलकेच थोपटले . तिला गाढ झोप लागली . त्याने उठुन टॉयलेटमधे जाउन फोन लावला . "आज और एक शिकार फस गयी ." " शाबास .

शशक'२०२२ - ठीकाय

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 08/05/2022 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
हे भामटे दोस्त..! ग्लासच्या आवाजानं कबरीतसुद्धा सळसळतील...! इकडे रिकाम्या बडवायजर्सचा खच..! तरीही ''येऊद्या अजून'' चाल्लेलंचाय..! मघाशी टुन्न होऊन एकमेकांच्या आणि वेटरच्याही पप्प्या घ्यायलेले..! पण मी म्हटलं की बाबा ठीकाय..! मग आपापल्या बायकांशी फोनवर दबकत्या आवाजात "दहाच मिन्टात येतो" वगैरे भपाऱ्या..! पण म्हटलं की बाबा ठीकाय..! मग जुन्या गर्लफ्रेंडींना फोन लावून तिच्याशिवाय ह्यांना जीवन अपुरं वाटतंय, हे पटवून द्यायलेले..! पण म्हटलं की बाबा ठीकाय..! पण आता ह्या दळींदरांनी मलाच बारच्या टॉयलेटमध्ये कोंडून ठेवलंय.‌.! मी बिल भरायचं कबूल केल्याशिवाय मला बाहेर येऊ देणार नाय म्हणतेत..! दमलो ओरडू

शशक'२०२२ - मोबदला

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 08/05/2022 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
“रमाकांत त्यादिवशीसारखं आज याल का संध्याकाळी माझ्याबरोबर घरी.तुम्हाला पाहिजे तो मोबदला देईन.”रेवतीनी मधाळ आवाजात विचारलं. “रेवती,काही काळजी करू नका ,रमाकांतला वेळ नसला तर मी येईन तुमच्याबरोबर.तुमची सगळी कामं करून देईन.बाईक आहेच माझी.” रमाकांतनी ऊत्तर द्यायच्या आत मी मध्येच बोललो. रेवतीनी मला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं. इकडे रमाकांत जोरजोरात मान हलवत मला खूणा करत होता.मी दुर्लक्ष केलं. “रमाकांत,मी तुम्हाला दिलेला नॅपकिन यांना द्या.” संध्याकाळी मी शीळ घालत रेवतीच्या टेबलपाशी गेलो. रेवतीने आंब्याच्या पेटीकडे बोट केलं,” ही पेटी घरी न्यायची आहे.नॅपकीन घेतलात ना.खांद्यावर पेटी ठेवताना लागेल तुम्हाल

शशक'२०२२ - तुटलेले दोर

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 08/05/2022 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटेच्या वेळी शहरातुन गावाकडे आलेल्या गाड्या गावच्या वेशीपाशी करकचुन ब्रेक लावुन थांबल्या. गाडीतली पेंगत असलेली लहानथोर मंडळी दचकुन जागी झाली . समोर नजरेतली ओळख हरवलेले शेकडो गावकरी उग्र मुद्रेने काठ्या घेउन उभे होते . त्यांनी गावात जाणारी वाट अडवली होती . "पावणं , तुम्ही शहरातली रोगराई घेउन गावात येतायसा . तुम्हाला इथं प्रवेश नाही ." " व्हय .आलात तसं गपगुमान माघारी जावा , न्हाईतर हि काठी पघितलीत. " आलेले पाव्हणे निरुपायाने शहराकडे परतले . यथावकाश रोगराई ओसरली .

शशक'२०२२ - व्यसन

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 08/05/2022 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
बॉम्ब फेकून त्याने एकास जायबंदी नी एकास ठार केले. दुसर्या महायुध्दात शोध लागलेला “मोलोटोव” शत्रूने फेकल्याने त्याचा सहकारी होरपळून निघाला. दोन सहकारी संपल्याने युध्द जिंकवण्याची जबाबदारी आपली आहे ह्याची त्याला जाणीव होती. जातीचा सैनिक होता तो. स्नायपर वर स्कोप चढवून त्याने आवाजाच्या दिशेने रोखली. एका क्षणासाठी शत्रू खिडकीत आला की “हेडशाॅट” द्यायचा नी खल्लास, तेव्हाच तर आपण “शार्पशूटर” म्हणवले जाऊ. त्याने अर्जूनासारखी एकाग्रता साधली. “आले, आले” येनारे आवाज त्याच्या कानापर्यंत येत होते पण त्याला ऐकू येत नव्हते. त्याला फक्त खिडकी दिसत होती.

शशक'२०२२ - विमनस्क

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 08/05/2022 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
अंधाराचा काहूर होता मेघा मनूचा हात घट्ट धरून झपझप चालत होती. आपला कोणीतरी पाठलाग करतय अशी शंका तिला आली.नजरेचा कटाक्ष तिने मागे टाकला वीजेच्या कडकडाटात तिला एक चेहरा दिसला..... 'रव्या' इंदूबाईंचा वेडसर मुलगा गचाळ हसत येत होता. वेडा रव्या गावात दगड मारत फिरायचा,शिव्या द्यायचा.मेघाला आता दरदरून घाम फुटला."मनू चल लवकर"मेघा कळवळली . छोटीसी मनू दमली होती.एका खड्ड्यात मनू पडली.ती मोठमोठ्याने रडू लागली.समोरून येणारी दोन तीन टारगट पोरं तिला हसायला लागली, तेव्हा मनूचा सूर आणखिनच वाढला. भांबावल्या मेघाने रव्याकडे पाहिलं... त्याच्या हातातला दगड त्याने जोरात त्यांच्या दिशेला भिरकावला...