Skip to main content

तंदूरी तंगडी / विंग्स

लेखक प्रभो यांनी सोमवार, 26/09/2011 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी, परवा मित्राकडे गेलो होतो. शनिवारी क्रिकेट खेळून आणी दंगा घालून झाल्यावर रविवारी चिकन बनवायचं ठरवलं. मी तंदूर तर मित्र रस्सा बनवणार. हे आपलं ब्याचलरी (अनिवासी) घरात असणारं साहित्य घेऊन बनवलं आहे बरंका. :) नुसतं तंदूर खाणार असाल तर हे खालचं साहित्य एका माणसासाठी....रस्स्यासोबत तोंडी लावायला घेणार असाल तर दोघांसाठी ;) साहित्य : १. ७-८ चिकन ड्रमस्टीक्स/विंग्स २. २ चमचे मीठ ३. १-२ चमचे तिखट ४. १ चमचा काळीमिरी पूड ५. १-२ चमचे तंदूर मसाला/चिकन मसाला ६. २ चमचे आलं-लसूण पेस्ट ७. ४ चमचे दही ८. १ चमचा बटर/लोणी/तूप कृती: १. चिकन धुऊन , तसेच स्कीन नको असल्यास स्कीन काढून घ्या. २.

ट्रू एअर स्पीड, ग्राऊंड स्पीड, सर्किट वगैरे...

लेखक गवि यांनी सोमवार, 26/09/2011 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
: विमानाच्या वेगाबाबतीत एक फंडा क्लिअर करुन घेऊ. विमानाचा वेग म्हणजे त्याच्या कॉकपिटात दाखवला जाणारा वेग. हा वेग हवेशी रिलेटिव्ह असतो. विमान हवेला मागे ढकलून पुढे जातं.. जमिनीला नव्हे.. त्यामुळे मागे जाणार्‍या हवेचा स्पीड म्हणा किंवा हवेच्या तुलनेत पुढे सरकणार्‍या विमानाचा स्पीड म्हणा, हाच विमानाचा स्पीड असतो. त्याला ट्रू एअरस्पीड म्हणतात. पण आपल्याला प्रवास तर जमिनीवरच्या ठिकाणांमधे करायचा असतो. त्यामुळे आपल्याला विमानाचा ग्राउंड स्पीड, अर्थात जमिनीशी रिलेटेड स्पीड काढणं भाग असतं. समजा मुंबई गोवा एरियल अंतर ६०० किलोमीटर असेल.

मजला महाग पडले.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 26/09/2011 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
रुप बहरता हसणे, मजला महाग पडले. तुझ्या डोळ्यात फसणे, मजला महाग पडले. ओठांची नाजुक महिरप, वर विभ्रमी चाळे. अधरावर नाव कोरणे,मजला महाग पडले. ते कोवळे तारुण्य.बांधले रेशिम काचोळित अनंग ठसा उमटवणे,मजला महाग पडले. नजर, कधि लाजरी, तर कधि नाचरी नजरेस नजर देणे ,मजला महाग पडले. तु श्रुंगार वेडी, असे बेधुंद रागीणी विसावणे मिठीत तुझ्या,मजला महाग पडले. फुलले, बहरले यौवन,देह सारा जाळतो देहात देह मीसळणे.मजला महाग पडले अविनाश...

"मे डे", "पॅन पॅन" वगैरे..

लेखक गवि यांनी सोमवार, 26/09/2011 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हिएशन क्षेत्र हे सर्व इतर व्यवसायांप्रमाणे एक स्वतःतलं जग आहे. त्यातल्या काही टर्मिनॉलॉजीज आपल्या कानावर अधूनमधून पडतात. बहुतेक एखाद्या क्रॅशच्या बातमीच्या निमित्ताने किंवा विमान खरेदी घोटाळा वगैरे झाला तर. मला वाटलं की अशा रँडम संकल्पना किंवा शब्द उचलून त्याविषयी थोडंसं सांगावं. बरं वाटलं म्हणजे, ठीक जम्या तर पुढे आणखी कन्सेप्ट्स घेऊन पुन्हा बोर्डावर उतरीन. आता थोडी सुरुवात करतो. "मे डे आणि पॅन पॅन": "मे डे" हा शब्द (शक्यतो तीन तीनवेळा) फ्लाईट रेडिओवरुन म्हटला की विमान प्राणघातक अ‍ॅक्सिडेंटच्या अत्यंत जवळ आहे असं पायलटला सांगायचं असतं.

आठवणी

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 26/09/2011 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
वितळवूनी दिशा ह्या सार्‍या आभाळ हृदयात साचे दाटून आल्या घनसावळ्या विश्वास मन टिपून वेचे मेघांना सावरलेल्या त्या पापण्या सावलीच्या आठवणी डोळ्यात फुललेल्या विसरून पाकळ्या क्षणांच्या तळ्याच्या पटलावरती दिसे रांग बदकांची आईच्या मागेपुढती वसे झिंग पिल्लांची मग सरून जाते सारे उरे जीव उदास उदास फाटक्या झोळीत तारे सरे रात ह्या दिसास |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२६/०९/२०११)
काव्यरस

आजचा सवाल-'?'

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 26/09/2011 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
मानव जेंव्हा अदीम अवस्थेतून पुढे सरकला,त्या काळात धर्म कल्पना बाल्यावस्थेत होत्या,पुरुष प्रक्रुती यांच्या मिलनातून स्रुष्टी घडली...हा सामान्यतः भारतीय पौरुषी धर्मांचा पाया आहे.ही कल्पना कमी अधिक फरकानी सगळीकडे आलेली आहे. याच कल्पनेला आधारभूत मानून पुढचा पुरुष/प्रक्रुती यांचा आजचा सवाल-जबाब लिहिला आहे... पु-मरणं येऊ दे याचे तेंव्हा,काशास चिंता आज करू?

चला वेळ आता आली आहे ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 26/09/2011 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
चला वेळ आता आली आहे निघायला हवे एवढेच फक्त खरे आहे होणारच होते म्हणजे छातीत दाटून येणे वगैरे वगैरे .. थोडेशे ढग जमा झाले होते डोळ्यामध्ये कधीपण पाउस पडू शकतो फक्त ढगफुटी होऊ नये एवढेच बघत होता तो तिच्या साठी तो घट्ट होता कमी दाबाचां किंवा जास्त दाबाचा पट्टा तयार झाल्यावरती हे असेच होणार कधीपण कोसळणार नि मने चिंब होणार .... निघालीच ती दोघे निरोप घेऊन सकाळचे विमान होते सोडले मुलाने त्याना विमानतळावर आग्रह तसा करणार होता करीत होता पण व्हिसा संपला होता थांबून घेणे हातात नव्हते त्याना सोडणे भाग होते निरोप देताना तो पण दाटून आला होता हे तर होणारच होते ...!! आतमध्ये गेले नि सगळेच
काव्यरस

दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/09/2011 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा
ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक (बॅकग्राउंड हातोडीनं ठोकल्याचा आवाज) ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक माझा दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा लाकूड तासून, रंधा मारून काढतो भुस्सा ||धृ|| कामं त्याचं हाय सुताराचं आणतो लाकूडं सागाचं करवतीनं कापत बसतो रातीबी तसंच करतो काय करावं समजना झालं कामासाठी नुसता झालाय वेडापीसा लाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||१|| एकदा पलंग करायला लागला मोजमाप करीत तो बसला मी घरकामात गुंतलेली मला बोलावलं त्यांनं तरीबी जवळ ओढूनं चावट बोलला असातसा ला