Skip to main content

संपादक मंडळ आणि व्यवस्थापकीय संरचना.

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 05/10/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या नवीन संपादक मंडळाची घोषणा करण्यात येत आहे. १) रेवती २) छोटा डॉन ३) निखील देशपांडे ४) प्रा.डॉ. दिलीप बिरूटे ५) इनोबा म्हणे ६) गणपा ७) पैसा सदर संपादक सहा महिण्यांसाठी किंवा पुढील घोषणेपर्यंत कार्यरत राहील.

मूर्ती विरुद्ध भगत

लेखक विकास यांनी मंगळवार, 04/10/2011 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
ऑक्टोबरच्या १-२ तारखेस न्यूयॉर्कमध्ये आय आय टीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन होते. त्या वेळेस नारायण मूर्ती (आय आय टीचे माजी विद्यार्थी) यांनी "आपल्या भाषणात कोचिंग क्लासेसमुळे कुठल्याही मुलांना आय आय टी त प्रवेश मिळू लागला असल्याने तिथल्या मुलांची शिक्षणोत्तर नोकरीतील आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता घसरली आहे" अशी खंत व्यक्त केली.

कोण येथे गुरुवर्य ?

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 04/10/2011 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
कोण येथे गुरुवर्य ? खितपत पडले शौर्य अहिंसेचे पुतळे मानतो मौनात दडले क्रौर्य झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य ---- शब्दमेघ (कविता पुन:प्रकाशित)
काव्यरस

सरकारी कचेरीचे जाहिर आभार.....

लेखक मन यांनी मंगळवार, 04/10/2011 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी २०१० मध्ये मी माझी आधीची कंपनी सोडून सद्य कंपनीत आलो. येताना भविष्य निर्वाह निधीचे (प्रॉव्हिडंट फंडचे) पैसे माझ्या बँक अकाउंट मध्ये जमा करायचा अर्ज(application) आधीच्या कंपनीत निघायच्या दिवशी भरले. सुमारे पाचेक महिन्यांनी संपूर्ण रक्कम व्यवस्थित माझ्या खात्यात जमा झाली.(online e-banking transfer झालेले होते.) त्यासाठी मला कुठलाही follow up घ्यावा लागला नाही.खरे तर घेण्याइतका वेळही काही कारणाने नव्हता म्हणा. जमा झालेली रक्कम माझ्या सारख्या निम्न मध्यमवर्गीय माणसासाठी बर्‍यापैकी मोठी होती.रक्कम मिळाल्यावर हायसे वाटले.

गुरूञ्चे द्वैत

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 04/10/2011 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
आपले लाडके विचारवन्त मिपा'कर श्री. नितिन थत्ते उर्फ थत्ते'चिच्चा यांनी दिलेला हा प्रतिसाद वाचनात आला. थत्ते'चिच्चाञ्चे असे विचार वाचून माझ्या मनास यातना झाल्या. थत्तेचिच्चा हे भारतासारख्या महान देशात जन्माला आले, रहातात आणि तरीही त्याञ्चे असे एकेश्वरवादी, अब्राहमिक (होय अब्राहमिकच, अब्रह्मण्यम नव्हे!) विचार वाचून भारतासारख्या महान देशात अजूनही किती अज्ञान आहे आणि त्यासाठी अवतारी गुरूञ्ची किती गरज आहे हे माझ्या लक्षात आले. अशा वेळेस मिसळ'पावसारख्या सर्व विश्व व्याप्त करणार्‍या माध्यमाची गरजही माझ्या लक्षात आली.

गाथा ..... हा लेख का लिहला ?

लेखक शरद यांनी सोमवार, 03/10/2011 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. नितिन थत्ते यांनी विचारले की हा लेख लिह्ण्याचा उद्देश काय ? तसेच अभंगाच्या खरेखोटेपणाबद्दलही शंका व्यक्त करण्यात आली. खरे म्हणजे या दोन्हींचीही माहिती लेखांत दिली आहे. शरदबोवा थापा मारतात हे (सप्रमाण) पहिल्यांदीच सांगितले आहे. तसेच माझा उद्देश काय हेही शेवटी सांगितले आहे. इथे परत एकदा सांगतो. बहुजनांच्या समजुतीत, त्यांच्या श्रद्द्धाविषयांत, त्यांच्या लोककथांमध्ये,सत्याचा लहानसा अंश असण्याची शक्यता असते.