Skip to main content

शशक'२०२२ - कलियुगात कॉनमॅन

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
सरतशेवटी आज जॉब पूर्ण होणार होता. इतक्या दिवस फोनवर तोंड चालवले त्याचे बक्षीस मिळणार. म्हाताऱ्यांची लूट करताना टोचणी लागते खरी, पण उत्क्रांतीच्या नियमांनुसार- ओटीपी दुसऱ्याला सांगायचा नसतो हे पण माहीत नसलेला माणूस नामशेषच होणारच. पण म्हाताऱ्याचा फोनवरचा अविर्भाव आज वेगळाच होता. चढ्या आवाजात प्रश्न विचारत होता, पोलिसांत तक्रार करणार म्हणत होता. सगळं मुसळ केरात ! त्याने फणकाऱ्याने फोन ठेवला. संध्याकाळी, म्हाताऱ्यानं फोनवरून जो डायलॉग मारलेला तोच सेम टू सेम डायलॉग टीव्ही वर सुपरिचित आवाजात ऐकल्यावर तो सटपटला- आणि दगाफटका झाल्याचे दुःख झाले. त्याने खोलीत जाऊन 'शोले'चे पोस्टर रागाने फाडले.

शशक'२०२२ - चल रे भोपळ्या टुणूक टुणूक

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
म्हातारी भोपळ्यात बसली मुलीचा निरोप घेतला. “ह्याचा ब्रेक आणि अॅक्सिलेटर कुठेय?” “आई, हे गुगलचे मॉडेल आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालते.” “म्हणजे एआय ना?” “”चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.” अस म्हटले कि गाडी पळायला लागते. ह्या गाडीला नॅचरल लँग्वेज इंटरफेस आहे. आपल्याला जशी पाहिजे तशी पळवावी. बाय आणि टेक केअर.” वाटेत वाघोबा दिसला. स्कूटरवर बसून वाटच बघत होता. “म्हातारे, थांब.

ओल्या खुणा

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 09/05/2022 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
हळव्या झाल्या काळजातल्या ओल्या खुणा हृदयातला रेशमी घाव दाखवू कुणा फुले शोधता लागला जिव्हारी काटा डोळ्यातल्या दर्यात उसळती अश्रूंच्या लाटा नभाच्या वेशीवर उदास रंग उतरे उरी लागलेला बाण घेऊन रावा फिरे हरवून दूर गेली ओळखीची वाट मोरपीशी स्वप्नांचा कोसळू लागे तट मावळतीच्या वणव्यात सूर्यबिंब जळून गेले प्राणाच्या शेजेवर निखारे उधळून गेले
काव्यरस

शशक'२०२२ - रँगो

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
गरुडाच्या भीतीने बाटलीत लपलेल्या सरड्याची अवस्था भयंकर झाली जेव्हा गरुडाने बाटलीच उचलून आकाशात भरारी घेतली आणि उंचावरून खाली सोडून दिली. आपला मृत्यू अटळ आहे याची त्याला खात्री पटली.

शशक'२०२२ - उल्का

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
मंगळावरील वसाहतीत प्रचंड धावपळ सुरु होती. तातडीने ग्रह सोडण्याचे आदेश आले होते. एक मोठी उल्का काही तासात मंगळावर आदळणार होती. काउंटडाऊन शून्य झाल्या क्षणी तिने बटन दाबले, तेव्हाच तिच्या आईचा फोन आला. तिच्या बाळला घेऊन आई स्पेसस्टेशनवरच भेटणार होती. “लवकर नीघ बाई...शेवटचे स्पेसशटल सुटण्याची वेळ झाली, बाहेर बघ उल्का चंद्रापेक्षा मोठी दिसते आहे.” आईचा आठवा फोन आला. “आम्ही एकटे जाणार नाही” आई निग्रहाने म्हणाली . “स्पेस शटल गेले... आता आकाशभर उल्काच आहे” आई रडतच म्हणाली. “आई....

कॉमेंट्सचे वार्षिक कॅलेंडर

लेखक निनाद यांनी सोमवार, 09/05/2022 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
कॉमेंट्सचे वार्षिक कॅलेंडर सादर करत आहे. १५ एप्रिल ते १५ मे - काय हा भयानक उन्हाळा आहे, असा उन्हाळा आधी कधीच नव्हता! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! ३० जून च्या आसपास - पहिला पाऊस झाला आणि नंतर गुल झाला पाऊस! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! ३० जुलै - फार जास्त पाऊस झाला हो, थांबायचे नाव नाही. ३० जुलै - खांदेश-मराठवाडा-विदर्भ - पाऊस न्हयी शे औंदा! येक्दाच पल्डा मंग पाऊस गेला. आता टँकरच बोलवा लागते. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! ३० सप्टेंबर - पाऊस जास्तीच झाला थांबायचे नाव नाही!

योग म्हणजे नक्की काय ?

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 09/05/2022 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
योग म्हणजे नक्की काय ? प्रस्तावना . योग म्हणजे नक्की काय आहे ? हा प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता . (खरा शब्द हा योग किंवा संस्कृत मधे योगः असाच आहे. योगा असा जो वापर होतो तो चुकीचा आहे .) या शब्दाच्या अर्थाचा शोध घेण्याचा प्रयत्न मी सुरु केला तेव्हा या विषयाचा आवाका बघून मनावर खूप दडपण आले. तथापि प्रयत्न सुरूच ठेवले. एका जिज्ञासूच्या भूमिकेतून मी या प्रश्नाचा शोध घेतला आहे ,तो तुमच्यासमोर मांडला आहे. आंतरजालावर असलेली माहिती आणि काही उपलब्ध पुस्तके यांच्या आधारे मी हा शोध घेतला आहे.

शशक'२०२२ - मलम

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
गावातील पट्टीच्या पोहनार्याने मृतदेह ओढून आणला. पोलिस गाडी नी पाठोपाठ ऐंब्युलन्स निघाली. कोवळा मृतदेह पाहून डाॅक्टरना वाईट वाटले. “पोहता येत नाही तर खोल तलावात गेलाच का?” पांढरे शर्ट नी काळी पॅंट घालून जमलेल्यात सरांचं जोरदार आगमन झालं.

शशक'२०२२ - चोरी

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी इन्स्पेक्टर अजय. अनेक चोरांना पकडणारा. माझ्या कपाळावर एक व्रण आहे. लहानपणी काकांनी मला मी त्यांचे पैसे चोरले म्हणून मारलं होतं. तेव्हापासून माझ्या कपाळावर आहे. आईलाही काकू खूप छळायची. त्याच रात्री माझ्या विधवा आईनं माझ्यासकट घर सोडलं. पुढं आम्ही एका महिलाश्रमात राहिलो. मला आईनं शाळेत घातलं. तीही प्राथमिक शाळेत शिक्षिका झाली. मी शिकलो. पोलीसदलात गेलो. आज आम्ही सन्मानानं जगतोय. माझ्या कपाळावरचा व्रण चाचपला की मी न केलेल्या चोरीबद्दलचा मार आठवतो. त्या दिवशीची चोरी कुणी केली ते मला माहीत आहे. माझ्या आईनं! होय आईनं. पण मी समजून घेतलंय तिला.

शशक'२०२२ - तेच तेच पुन्हा पुन्हा

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
किती छान झोप लागली होती. लोक झोपू पण देत नाहीत. डोळे उघडले तर लख्ख प्रकाश! एलइडी लॅंप हं. मागच्या खेपेला कंदिल होता. अरे बापरे! म्हणजे पुन्हा सगळं नशिबी आलं. गमभन, पाढे, व्हफा, मॅट्रिक, नोकरी, लग्न, मुलंबाळं, हगेरीमुतेरी, त्यांचं शिक्षण, त्यांची लग्नं, त्यांची मुलंबाळं, त्यांची लग्नं, त्यांची मुलंबाळं, त्यांची लग्नं, त्यांची मुलंबाळं... ओ, शिट! रडू आवरेना. “काय पण वेडं विद्रूप टकलू माकड.” “अगं, अस का बोलतेस...” “अहो असच बोलायचं असतं. नाहीतर आपलीच दृष्ट ..