Skip to main content

डेनिस रिचीला श्रध्द्दांजली

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 14/10/2011 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
'C' programming चा जनक डेनिस रिची आज आपल्यातुन निघुन गेला. Unix operating system च्या निर्मीत्तीमध्येही याचा खुप मोठा वाटा होता. Assembly च्या जमान्यात 'C' खरच एक रिव्होल्युशन होते. त्याला श्रध्द्दांजली चेतन

नक्षिदार पराठे

लेखक जागु यांनी शुक्रवार, 14/10/2011 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पालक पेस्ट १ वाटी (थोड्याश्या पाण्यात वाफवून पेस्ट करावी) अर्धा चमचा आले-लसुण पेस्ट १ किसलेला गाजर थोडी कोथिंबीर चिरुन हिंग, हळद गोडा मसाला १ चमचा मिठ साजूक तुप गव्हाचे पिठ अंदाजे ३ वाट्या पाककृती: तूप सोडून वरील सगळ जिन्नस हळू हळू पाणी टाकत चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्या.

वेळ आहे कुणाला?

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 14/10/2011 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेंढरं ? मेंढरं आणि आम्ही छे! छे! काहीतरी गैरसमज होतोय. आमच्यामागे इतकी कामं पडलेली असतात की आम्हांला कुठे म्हणजे कुठेही लक्ष द्यायला वेळच नसतो. आणि आपला नगरसेवक कोण आहे? हे सर्वांना माहीत झाले म्हणजे काय तो वार्डातली पेंडिंग कामे तातडीने मार्गी लावणार आहे का? देशाचं नेतृत्व काय करतंय? त्याने कसं काम करावं? हे सांगणारे आपण महाभाग कोण? आणि जरी ओरडून सांगितलं तरी ते ऐकलं जाईलच हे कशावरून? नळी फुंकिली सोनारे... असं नेहमी होतंच आलंय की नाही? आता ह्या जनलोकपालाचंच घ्या. ते विधेयक पारित झाल्यावर फार फार तर दोन चार वर्षे भ्रष्टाचार होणार नाही.

रक्तगंध

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 13/10/2011 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा हा विडंबनाचा चुकार टुकार प्रयत्न प्रेरणा -स्पा यांची ग्रहण ही कथा आणि गणेशा यांची स्पर्शगंध ही कविता. हे विडंबन रचण्यात ५०फक्त यांचे मोठे योगदान आहे, त्यांचे खास आभार. रक्तगंधाने बुजलेल्या वाटेवरती तो स्पर्श बोचरा होता सुरकुतल्या कोरड्या कातडीत मात्र रक्तनिर्झर खळाळत होता हलक्याच कुटील चाव्याने तो कुशीवर वळताच त्या हिरव्या डोळ्यांच्या मागे देह वेदनेत बुडाला होता तशातच आकाशात रात्रीने सोडला काळिमा अभद्र कौलारु खोल्यांमधुनी अजुनी तो रात्री भटकत होता जळमटलेल्या काळोख्या रात्री एक चांदणी ध

ई॑ग्रजी आणि मराठी मधला साकव

लेखक छत्रपति यांनी गुरुवार, 13/10/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
www.saakava.com हे संकेतस्थळ १ मे २०१० - महाराष्ट्राच्या स्थापनेच्या पन्नासाव्या वर्धापनदिनी सुरू करण्यात आले. या संकेतस्थळावर इंग्रजी वाक्याचे मराठीत भाषांतर दिले जाते. हे भाषांतर साकव या संगणक प्रणालीद्बारा करण्यात येते. नियमितपणे या प्रणालीत आम्ही सुधारणा करत आलो आहोत आणि हे प्रयत्न आम्ही करतच राहू. या सुधारणा करताना, लोकांकडून आलेल्या वेगवेगळ्या सूचना आणि त्यांनी साकववर दिलेली वाक्ये यांचाही विचार करण्यात आला. खरं तर संगणकीय भाषांतर प्रणाली विशेषतः वेगळ्या कुटुंबातल्या भाषांसाठी हा प्रचंड वेळखाऊ तसेच खर्चिक प्रकल्प आहे.

ती... धूंद

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 13/10/2011 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
काल पासुन ज.कुं.च्या धाग्यावर ती'ची हवा फार पसरली आहे... तिकडं एक कविता टाकलीये,,,हिला पण तिकडेच टाकावी अश्या विचारात होतो,पण हिचं आमच्या मनाशी जुळलेलं चित्र पहाता,हे त्या चित्राशी जरा विसंगत होइल हे भय वाटल्यानी हिला अता इकडे सोडतोय,,,आणी असाही हिचा छंद तिच्या छंदाशी जुळणारा नाहीच... मग म्हटलं मिटर गेजची गाडी ब्रॉड गेजवर कशाला सोडा...म्हनुनच हीला या ठेसनात आनलीये...बगा जमलीये का ते जरा... हो..येक ह्रायलच ...
काव्यरस

माझी पण काही कोडी...

लेखक पिलीयन रायडर यांनी गुरुवार, 13/10/2011 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
१. एका शाळेत, १००० मुलं आणि १००० लॉकर्स आहेत.. जर पहिला मुलगा जाउन सगळी बंद लॉकर्स उघडुन आला.. दुसर्या मुलाने प्रत्येक दुसरा लॉकर बंद केला... तिसर्याने प्रत्येक तिसरा लॉकर उघडलेला असेल तर बंद केला.. आणि बंद असेल तर उघडला.. असं १०००व्या मुला पर्यंत केल.. तर... किती आणि कोणती लॉकर्स सगळ्यात शेवटी उघडलेली असतील?? ह्यात २ उत्तरे येउ शकतात... अ. प्रत्येक मुलाने पहिल्या लॉकर पासुन सुरवात केली तर.. ब. पहिल्या मुलाने पहिल्या लॉकर पासुन सुरवात केली , दुसर्याने २र्‍या लॉकर पासुन सुरवात केली.... २.

कोडं - २

लेखक दिपोटी यांनी गुरुवार, 13/10/2011 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
दादा कोंडके यांच्या या धाग्यातील कोड्यामध्ये येथील काही जणांना असलेले स्वारस्य पाहून हे एक तसेच तर्कशास्त्रावर आधारलेले कोडे देण्याचा मोह आवरता येत नाही, तेव्हा हे घ्या : माझ्याकडे १२ नाणी आहेत, जी सर्व एकाच रंगाची-मापाची-आकाराची आहेत. यातील १ नाणे बनावट असून ते इतर ११ अस्सल नाण्यांपेक्षा वजनाने वेगळे आहे.