Skip to main content

धर्माच्या अड्ड्यात निधर्मी देश

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 18/10/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
या कवितेची प्रेरणा---प्रकाश१११ यांची निधर्मी देशात..!! ही कविता,हे उघड आहे.पण तरीही दोन्ही मध्ये एक मूलभूत फरकही आहे.
काव्यरस

(हा कोणत्या दिशेला आहे प्रयास अजुनी)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 17/10/2011 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रासस्टांझाज ने केलेली गजल आम्हाला आवडली त्यावर आमची ही दाद ;) हलकेच मलम लावू, किति या बुडास अजुनी? हा कोणत्या दिशेला आहे प्रयास अजुनी? ही प्यांट फाटली अन्, तुटल्या जरी वहाणा 'क्षितिजा' दिसे बरी हा, भलताच ध्यास अजुनी? 'ज्योती' लगेच पटवू, ही वल्गना कशाला? वणवा उठेल कानी, 'नियती'स आस अजुनी! उद्दाम कन्यका या काका म्हणोत मजला उत्स्फूर्त खोकल्याची लपवीत ढास अजुनी! ही स्यांडले खुणेची नेती मला घराशी! होतो मुशाफिरीचा 'रंग्या'स भास अजुनी! (इतरत्र पूर्वचाचणीसिद्ध)
काव्यरस

ग्रहण-४

लेखक स्पा यांनी सोमवार, 17/10/2011 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रहण-१ ग्रहण-२ ग्रहण-३ मला आता घरच्यांपासून काहीही लपवायचं नव्हत. नाश्त्याला बसलेले असताना.. मी सर्व हकीकत सांगून टाकली उर्मिलाचा चेहरा. भयाने पांढरा फाटक पडलेला .. आई पण हादरलेली.. बाबांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या.. मग कोणीच काही बोललं नाही. मग बाबाच म्हणाले, काल भाटे सांगत होते..

तेल गेले, तुपही गेले

लेखक चिंतामणी यांनी सोमवार, 17/10/2011 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी ३६२५ मतांनी विजय झाला आहे. तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हर्षदा वांजळे यांचा पराभव केला. तापकीर यांना ५७,१७५ आणि वांजळे य़ांनी ५३,२२० मते मिळाली. अनेक दिवस म.न.से.ला झुलवत अखेर वाजत गाजत राष्ट्रवादीवासी झालेल्या श्री. हर्षदा वांनळे याना लोकाची सहानभुती मिळेल असे वाटत असणा-यांचा मुखभंग झाला. या पराभवची कारणे काय काय असावीत?????????

दिपोटी यांच्या कोड्याशी संलग्न नवं कोडं.

लेखक विनीत संखे यांनी सोमवार, 17/10/2011 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिपोटी यांच्या ह्या कोड्याशी संलग्न एक नवं कोडं... एकदा वसिष्ठ ऋषींना निबीड आवर्तारण्यात जाऊन महान आत्मविशुद्धी यज्ञ करायचा असल्याने आपल्या शिष्यांपैकी काही शिष्यवर्य निवडायचे होते. पण हा यज्ञ बराच कठीण असल्याने हुशार, प्रामाणिक, निष्ठावान, साहसी आणि सर्व शास्त्रांचा यथोचित अभ्यास केलेले काहीच शिष्यच त्यांना निवडायचे होते. आपल्या सर्व शिष्यांमध्ये ती क्षमता असल्याचे वसिष्ठांना ठाऊक होते म्हणूनच त्यांनी आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यावयाचे ठरवले.

निधर्मी देशात ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 17/10/2011 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या निधर्मी देशात धर्माचे अड्डे खूप आहेत शंभर कोटीच्या देशात देवळे भरपूर नि देवपण महामूर आहेत महाराज अगणित प्रत्येकाचे तंबू मस्त आहेत भक्त खेचण्यास जो तो आपला आपला तरबेज आहे महाराज होण्यास शिक्षण नको फक्त तरबेज अशी जीभ हवी नजरेत लगामाची ताकद नागासारखी तेज हवी जाती भरपूर नि जातीत सुद्धा पोटजाती सगळेच गणित अवघड आहे सुटता सुटत नाही असे हे सगळे अवघड आहे ह्या निधर्मी देशात धर्माचे अड्डे खूप आहेत देव धर्म कर्मकांड येथे खूप आहे जो तो दलालाला दक्षिणा देऊन देवाला पटवतो आहे देव बिचारा गप्प आपलाच आपल्यात मग्न आहे ह्या निधर्मी देशात धर्माचे अड्डे खूप आहेत एवढे धार्मिक असून सुद

छंदपिसाट

लेखक रम्या यांनी रविवार, 16/10/2011 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
पाचवी सहावीला असताना भुगोलाच्या पुस्तकातील शेवटचा पाठ खगोलशास्त्राचा असे. त्यामध्ये आकाशातील ग्रह तारे यातला फरक कसा ओळखावा, गुरू, शनी यांच्या रंगामध्ये कशा वेग वेगळ्या रंगांची झाक असते, ध्रुव तारा, सप्तर्षी कसा ओळखावा, अशी बरीच माहीती होती. मुंबईच्या सदानकदा फटफटल्या सारख्या दिसणार्या आकाशात मी हे सगळे पाहण्याच्या प्रयत्न करत असे. पण काहीच ओळखता येत नसे. कधी कधी कुठल्याही तार्याला हा गुरू, तो शनी असा गैरसमज करुन घेत असे. एका रात्री तर उंच विजेच्या तारांवर अडकेल्या पंतंगाच्या तुकड्यावर प्रकाश पडला होता त्यालाच गुरू ग्रह समजलो होतो! एकदा वडिलांनी मला सप्तर्षीची ओळख करून दिली.

माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११

लेखक कौन्तेय यांनी रविवार, 16/10/2011 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
माळशेज - शिवनेरी सहल. सप्टेंबर २०११ रामराम! सप्टेंबरात मिपा.करांकडून माझ्या माळशेज सहलीबाबत कौल मागितला होता ( http://www.misalpav.com/node/19017 ). त्यावेळी शैलेन्द्र, अजितजी, वल्ली, विक्षिप्त अदिती, योगप्रभू, परीकथेतील राजकुमार नि सुनील यांच्या उद्बोधक तर बाकी बऱ्याच जणांचा रंजक प्रतिक्रीया आल्या. त्यां सगळ्यांवर विसंबूनच आमची सहल सुरू केली आणि सुफ़ळ संपूर्णही झाली. सर्वांना धन्यवाद! मुंबई - नाणेघाट रस्त्यावरचा जलविहार - माळशेज - मुक्काम - शिवनेरी - माळशेज - विश्रांती - मुंबईप्रस्थान असा कार्यक्रम केला.

हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 16/10/2011 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
जखमेस तेल मागू, कितिदा जगास अजुनी? हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी? हे शीड फाटले अन्, तुटले जरी सुकाणू क्षितिजा तरी तुला का, माझाच ध्यास अजुनी? ज्योती फुकून टाकू, ही वल्गना कशाला? वणवा उठेल गगनी, नियतीस आस अजुनी! उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती मला का? उत्स्फूर्त वादळांचे जपलेत श्वास अजुनी! ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी? कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी (इतरत्र पूर्वप्रकाशित)

आला पाऊस

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 16/10/2011 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
आला पाऊस
गर्जत वर्षत आला पाऊस हर्षत नाचत आला पाऊस कुंद नभ मोकळे करूनी धरेवरती कोसळला पाऊस विद्यूल्लता तेजाने चमके कडकड करूनी झळके सवेत येवूनी थेंब जलाच्या आक्रंदून पडला पाऊस अतीवेगाने तुफान वाहते तरूवेलींचे पर्ण हालते भांग शाखीय शिस्तीचा विस्कटून गेला पाऊस झरे नद्या तलाव सागर जलाशयांची रुपे अगाध एकात दुसरे दुसरे एकात मिसळूनी गेला पाऊस कोठे पडला छतावरी कोठे आला माळरानी कोठे पडूनी शेतामध्ये धान्य पिकवूनी गेला पाऊस उष्णउसासे देवूनी अंगी शहार्‍यांची टोचूनी नांगी अमृतमय जीवन देवूनी गेला पाऊस - पाषाणभेद १