खचलेले शेजारी
सुप्रीम कोर्टात नोटबंदीवर घटनापीठाने काल परवा शिक्कामोर्तब केले असले तरी नोटबंदी किती परिणामकारक होती याचा एक स्पष्ट पुरावा पाकिस्तानच्या आख्ख्या अर्थव्यवस्थेने दिला होता. लोकसभेच्या वेबसाईटवरच दिलेली आकडेवारी थरकाप उडवणारी होती. सन २०११ ते २०१५ मध्ये सव्वीस लाख पाचशे आणि हजारच्या खोट्या नोटांचे तुकडे भारतीय चलनात घुसवले गेले होते. NIA ने प्रयोगशाळेमध्ये या खोट्या नोटांचे तुकडे तपासून हे सिद्ध केले होते की चक्क पाकिस्तानच्या सरकारी पाठिंब्यावरच या खोट्या नोटा तिकडे छापल्या जायच्या. आता एखादे सरकार असले धंदे का करेल ? याचे उत्तर केवळ अतिरेक्यांना मदत देणे इतकेच नव्हते.
रानडुकराचं मटण
काही वर्षापूर्वी डुकराच्या किंवा सशाच्या मटणाची पाककृती हवी असल्याचे वाचलं होतं.
खजिना
होतात निरुत्तर प्रश्न
त्या तिथे अचानक जावे
शब्दांचा मांडुनी खेळ
तर्कास जरा डिवचावे
तर्काचे पडतील मोडून
मग सुघड, नेटके इमले
पडझडीत येईल हाती
शब्दांच्याही पलिकडले
तो अनवट खजिना येता
हातात क्षणार्धापुरता
मागणे अधिक ना उरते
चांदण्यात सचैल भिजता
परदेशस्थ भारतीय
इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.काय होते अंतरी...
पाहुनी हसताच तू काय होते अंतरी
बावरा हा जीव माझा भिरभिरे कोठेतरी.
चांदण्यांचे तेज गाली
या फुलांची ओठी लाली
तू बटांना कुरवाळता
बघ हवेची झुळूक आली
वादळे तू कुंतलाना सोडता वाऱ्यावरी.
चाहुलीनं या तुझ्या
बघ पान पान बहरतं
दव भिजले गवत
तव पावलानं बिलगतं
गंध लेवूनी तनूचा बघ फुले ही बावरी.
काव्यरस
चोरी
छोटा कृष्णा मित्रांसोबत वाड्याच्या अंगणात खेळण्यात गुंग होता. "कृष्णा गौरव्वा आहे का रे घरात ?" ह्या प्रश्नाने त्याचे मन खेळातून बाहेर आले, त्याची मान आवाजाच्या दिशेने वळली - सत्तरी ओलांडून गेलेल्या आज्जी काठी जमिनीला टेकवून उभ्या होत्या. त्याने होकारार्थी मान हलवली . पळत आत जाऊन वर्दी दिली - "आई स्वामी आज्जी आल्या आहेत.
२०२२ मधील उत्तर ते दक्षिण - लेह लडाख ते कन्याकुमारी - प्रवास अनुभव
२०२२ हे एक रोडट्रीप special dream वर्षे होत , कारण एकाच वर्षात भारतातील २ अशी ठिकाणे , जे प्रत्येक पर्यटन प्रेमी च्या लिस्ट मदे टॉप ला असतात . पहिलं म्हणजे लडाख - भारताचं उत्तरेकडील टोक आणि दुसरा कन्याकुमारी - भारताचं दक्षिण टोक .
लेह लडाख -
भरपूर लोक बोलले फर्स्ट time मध्ये पुणे लडाख पुणे सोप्प नाय , अर्ध्यातूनच याल, गाड्या ट्रेन ला लोड करून दिल्ली पासून जा , पण नाही या वेळी पक्कं ठरवलेलं पुणे ते पुणे करायचंच.
जवळपास १५ दिवसांचा प्रवास , जातानाचा प्रवास : मुंबई - सुरत highway - वडोदरा - मोडासा - जयपूर - हरियाणा - अंबाला - पठाणकोट - श्रीनगर मार्गे लेह.
मिसळपाव