Skip to main content

पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 15/06/2023 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
pune पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले.

सख्या रे..

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 14/06/2023 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
न्हाऊ कशी सख्या रे तनु चंद्र जाहलेली काया अजून आहे स्पर्शात माखलेली.. न्हाऊ कशी सख्या रे आताच फूल झाली, कळी काल मोग-याची केसांत माळलेली. न्हाऊ कशी सख्या रे अंगांग पेटलेले, ते तेवतात अजुनी तू दीप लावलेले. न्हाऊ कशी सख्या रे मृद्गंध आसपास, जो कोसळून गेला पाऊस काल खास. न्हाऊ कशी सख्या रे देही चितारलेले, जे शब्द जाफरानी ओठी तुझ्या न आले..
काव्यरस

पुणे पंढरपूर पुणे सायकल राईड ३ आणि ४ जुन २०२३...एक विलक्षण अनुभव (परतीचा प्रवास)

लेखक Abhay Khatavkar यांनी मंगळवार, 13/06/2023 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
Indo Atheletic Society तर्फे यावेळी पंढरपूर राईड ची घोषणा करण्यात आली त्याचवेळेस मी (दोन्ही बाजुचे) आणि बायकोचे (एकेरी) रजिस्ट्रेशन केले आणि निवांत झालो कारण अजुन ३-४ महिने बाकी होते. यंदा उन्हाचा तडाखा जास्त असल्याने एप्रिल आणि मे मध्ये सायकलिंग फार कमी झाले (७०० आणि ६०० किमी) जे इतर महिन्याच्या मानाने निम्मेच होते. तरीही रोज ऑफिसला ये जा सुरूच होते.

३००० वर्षांचा विरह

लेखक साहना यांनी मंगळवार, 13/06/2023 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
ऍमेझॉन वर हा चित्रपट आहे. जिन्न हा विषय आम्हाला बहुतेक करून अल्लाउद्दीन च्या दिव्यामुळे ठाऊक आहे पण जिन्न हि संकल्पना इस्लाम मधील खूप लोकप्रिय संकल्पना आहे. इस्लामच्या अनुसार जिन्न हे दुसर्या जगांतील जीव आहेत आणि मानवा प्रमाणेच ते सुद्धा अल्लाह चे अनुसरण करणारे किंवा काफिर असू शकतात. जिन्न मानवाला दिसत नाहीत पण मानवीय जीवनात कधी कधी त्यांचा हस्तक्षेप होऊ शकतो. इस्लाम मधील बहुतेक संकल्पना ह्या इस्लाम पूर्व गोष्टीचे rehashing आहेत त्याच प्रमाणे जिन्न सुद्धा इस्लाम पूर्व आहे पण इस्लाम जगभर पसरला म्हणून ती सुद्धा पसरली आणि इंग्रजीत त्याला लोक जिनी ह्या नावाने ओळखू लागले.

चक्रीवादळ

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 13/06/2023 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
'बिपोरजाॅय' आशी, ठेवा लक्ष आमे तैयार छे, गुजरात दक्ष पाकीस्तानातून भारतात, बेकायदेशीर! नाही विजा, आहे ना सोबत गडगडाट, तेजाळ लखलखाट विजा!! कडेकडेनेच निघून जा, हा विनंती अर्ज पीकपाणी नुकसान नको फिटलं नाही कर्ज. करु नको विस्थापीत, नको उडवू घराचे पत्रे, हवामान महासंचालक, कशी वाचवावी लक्तरे?

रिमोट..

लेखक आजी यांनी सोमवार, 12/06/2023 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
आधुनिक जगाचा कळीचा शब्द म्हणजे रिमोट. तो अनंत,अगाध, सर्वसमावेशक शब्द आहे. तो सर्व जग व्यापून दशांगुळे उरलेला शब्द आहे. घरीदारी रिमोट हवाच. लहान मुलांच्या खेळण्यात रिमोट हवा. तिथपासून ते प्रत्यक्षातले यान उडविण्यासाठीही रिमोट हवा. मोठमोठे नेते अनेक प्रकल्पांचं उद्घाटन प्रत्यक्ष तिथं न जाता रिमोटनं करतात. अगदी ग्रामपंचायती ते अख्ख्या देशाचा रिमोट कुणाच्या तरी हातात असतो. (महिला सरपंचबाईंचा रिमोट त्यांच्या नवऱ्याच्या हातात असतो.) आघाडी म्हणू नका,दल म्हणू नका, युति, गठबंधन, ब्रिगेड,सेना, काही म्हणू नका. प्रत्येकाला एक रिमोट असतो आणि तो भलत्याच कुणा माणसाच्या हातात असतो.

जिल्हे-ईलाही

लेखक बाजीगर यांनी रविवार, 11/06/2023 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
बोलाचा भात बोलाची कढी पोरीला दिली कल्पनेतली गढी खात्यात पैसे नसता दिला blank cheque भरा पोट खाऊन फोटोतला केक तू घे पंजाब, महाराष्ट्र हरीयाणा आणि युवा साडेतीन जिल्हे-ईलाही !! खेळतोय कसा जूवा ।

रौद्रगर्भा वसुंधरा भाग २ : आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग (सुधारित)

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 11/06/2023 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लिखाण रौद्रगर्भा वसुंधरा भाग १ : https://www.misalpav.com/node/51286 (मी १९८३ साली प्रथम जपानमध्ये ज्वालामुखी पाहिला. त्यानंतर इंडोनेशिया आणि न्यूझीलंड या अनेक ज्वालामुखी असलेल्या दोन्ही देशांतील बरेच तसेच अमेरिकेतील काही ज्वालामुखी -कांही कधीही उद्रेक पावतील असे वाटणारे, कांही नुसतेच धुमसणारे, काही सुप्त, काही मृत, काही तरुण, काही वृद्ध - पाहिले.

एक मुलायम स्पर्शक (२)

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 11/06/2023 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्ध इथे. …………………………………………..

उत्तरार्ध

पहिल्या रंजनप्रधान भागात आपण निरोधची इतिहासकालीन संकल्पना, त्याचा शोध आणि शास्त्रशुद्ध विकास या गोष्टींचा विचार केला. या भागात आपण त्याच्या खालील शास्त्रीय पैलूंचा विचार करणार आहोत: १. गर्भनिरोधनातील यशापयश २. गुप्तरोगांपासून संरक्षण ३. वापराचे दुष्परिणाम/ समस्या ४.