Skip to main content

अमेरिका ४ - डस्टबिन

लेखक निमी यांनी गुरुवार, 10/08/2023 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी प्रत्येक घरी एक सायकल असणं हे सामान्य, दुचाकी असणं हे भारी आणि चारचाकी असणं हे श्रीमंतीच लक्षण होतं. आता घरटी एक चारचाकी, माणशी एक दुचाकी आणि घरातल्या लोकांच्या निम्म्यान सायकली असतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे भारतात एक-दोन कचऱ्याचे डबे असतात, अर्थात डस्टबिन असतात ! इथे अमेरिकेत मात्र माणशी अंदाजे चार डस्टबीन असतात. किचनजवळ विघटक आणि अविघटक अर्थात डिग्रेडेबल आणि नॉन डिग्रेडेबल गोष्टींसाठी मोठी मोठी डस्टबिन असतात. आपला गुडघा ते कंबर या उंचीची डस्टबिन घरात पाहून वस्तू खातात की फेकतात अशी शंका येते.

चांद्रयान ३

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 09/08/2023 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
चांद माझा हांसरा, उधाण येई सागरा चंद्र उगवला नभी, लाजली वसुंधरा स्मरणातील रुप तुझे जे कवीने रेखले चांदभरल्या रातीतले स्वप्न आज भंगले चंद्रमुखी तू मेघसावळी कसे म्हणू मी.... क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा कसे म्हणू मी..... आता कसे म्हणू मी चंद्र उगवले दोन एक चंद्र अंबरी,एक मंचकावरी कसे म्हणू मी..... ...... ...... होईल वर्षाव लाटण्यांचा. जेव्हां तुझ्या नजीक चांद्रयान तीन पोहचले अन् नव रुप तुझे यान चक्षुंनी पाहिले यान चक्षुंनी जे दाविले,ते मी ही पाहिले.... ओळखीचे रुप तुझे न उरले बघुन पाहता नव रुप तुझे, आले डोळे भरून झेपावतील का लाटा,करतील का कवने? पाहीले खरे जे रूप तुझे चंद्र

हिंग पुराण-अल्प पुरवणी

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 08/08/2023 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ' (Council ofScientific and Industrial Research - CSIR) ह्या केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेशी संलग्न असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' (Institute of Himalayan Bioresource Technology, Palampur - IHBT) ह्या संस्थेने २०१८ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या काळात इराण मधून दोन टप्प्यांत 'फेरुला असाफोटीडा' ह्या वनस्पतीच्या सहा वाणांचे बियाणे आयात करून 'नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्ली' (National Bureau of Plant Genetic Resources, New Delhi -NBPGR) ह्या संस्थेच्या देखरेखीखाली भारतात प्रथमच ह

कॉस्मिक सेन्सॉरशिप शेवटचा भाग -५

लेखक भागो यांनी मंगळवार, 08/08/2023 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
कॉस्मिक सेन्सॉरशिप भाग -५ संध्याकाळचे पाच वाजले असावेत. रोज ह्याच वेळेला राघव 11KM रस्त्यावरून एक चक्कर टाकतो. राघव जिथे रहातो त्या कॉलनीच्या जवळून हा रस्ता जातो. संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरलं कि मन थोडं उल्हसित होत. “संध्याकाळचं फिरणं” ही थेरपी त्याच्या मनोवैज्ञानिक चिकित्सकानं सुचवली होती. आज्ञाधारक मुलाप्रमाणे राघव काटेकोरपणे त्याचं पालन करत होता. घराबाहेर पडायच्या आधी त्याने नेहमीची कवायत केली. शर्टाचा वरचा खिसा तपासला. खिशात स्वतःचे नाव, पत्ता आणि टेलेफोन नंबर लिहिलेले कार्ड असल्याची खात्री करून घेतली. हे कार्ड जवळ असणे फार महत्वाचं होतं.

पाहिले म्यां डोळा..

लेखक आजी यांनी मंगळवार, 08/08/2023 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यू! एक भयभीत करणारा शब्द! पण जन्मलेल्या प्रत्येकाला तो अटळ आहे. मृत्यूचा विषय निघाला की बरेच जण रादर सगळेच गंभीर होतात. नको तो अभद्र विषय अशीच बहुतेकांची प्रतिक्रिया असते. काहीजण मात्र थोड्या वेगळ्या प्रतिक्रिया देतात, अर्थात् त्यातली अटळता स्वीकारुन. "येईल तेव्हा बघू. आत्तापासूनच कशाला काळजी?" "मरणाच्या भीतीने काय काही मजा करायचीच नाही?" "भीतीपोटी काय घाबरत घाबरत जन्म काढायचा की काय?" "येऊ दे. यायचा तेव्हा येईल. तेव्हाचं तेव्हा बघता येईल. " "प्रत्येकाला जायचंच आहे. कुणीही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलं नाही. " "मरणात खरोखर जग जगते." कुणीतरी मरतं त्याचवेळी कुणीतरी जन्म घेतं.

वार्तालाप: दुर्जनांचा ही सन्मान करा.

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 08/08/2023 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्जन प्राणी समजावे. परी ते प्रगट न करावे. सज्जना परीस आळवावे. महत्त्व देऊनी. समर्थ म्हणतात राजकारण करताना, दुर्जन लोक असतील ते ओळखून ठेवावे पण त्यांचा दुर्जनपणा प्रगट करू नये. इतकेच नव्हे, तर त्यांना सज्जनापेक्षाही अधिक मोठेपण देऊन प्रसन्न ठेवावे. राजकारणात दुर्जन लोक तुम्हाला त्रास देऊ शकता तर त्यांना महत्त्व देऊन संतुष्ट करावे. त्यांच्या उपयोग करून त्यांना आपल्या शत्रू वर सोडावे. योग्य वेळी त्यांना नष्ट ही करून टाकावे.

अमेरिका ३ - पर्याय सापळा..

लेखक निमी यांनी मंगळवार, 08/08/2023 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस इथल्या मॉलमध्ये खरेदीला गेलो होतो...एकतर अवाढव्य मॉल असतात. खरेदीच्या आनंदापेक्षा 'हरवू आपण' ही भीतीच वाटते. 'ग्रोसरी स्टोअर्स' मध्ये केवळ खाण्यापिण्याच्या गोष्टी असल्याने ते थोडं आपल्या सरावाचं वाटतं. भारतात पण डी मार्ट सारख्या ठिकाणी भाज्या, फळं, दूध इत्यादी विभाग आपण पाहिलेला असतो. त्यामुळे थोडसं 'घरेलू' फिलिंग येत. अशीच काहीशी खरेदी करायला आम्ही गेलो. डॉलर्स गुणिले ८० हा मनातील कॅल्क्युलेटर 'सायलेंट मोड'ला टाकला कारण खरंच इथे 'लेकीच्या बापाचं' काही जाणार नव्हतं ! तरीही इथे वस्तू सापळ्याचे दर्शन घडलेच. इथे सॅन्टा क्लॅराजवळ 'आपना बजार' नावाचा एक बजार आहे.

अमेरिका २- बावळट आम्ही..!!

लेखक निमी यांनी रविवार, 06/08/2023 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
'खुदके गली मे कुत्ता भी शेर होता है ।' असा कुण्या एका हिंदी सिनेमामध्ये डायलॉग होता. पण आपल्या घरात-कामात-गावात 'शेर' नसलो तरी काहीतरी साध्य केलेल्या आमच्यासारख्या पालकांना 1-2 टक्के ते 100 % इन्फिरीएरीटी कॉम्प्लेक्स इथे आल्यावर येत असणार. याची झलक खरंतर एअरपोर्टला आल्यावरच सगळ्या भारतीय आई-बाबांच्या चेहऱ्यावर दिसायला लागते. भारतातून निघतानाच ठासून भरलेल्या बॅगा, वजनाला जास्त झालं की विमानतळावर होणारे चेक इन बॅगेतून 'वस्तूहरण' आणि केबिन बॅगेमध्ये 'वस्तूभरण' होते. नव्याने घेतलेल्या बुटांमधून अवघडत चालणार्या, मुद्दाम परदेश प्रवासासाठी घेतलेली नवी पर्स सांभाळणाऱ्या आया लगेच ओळखू येतात.