Skip to main content

दोन लोकगीते आणि थोडे माझे:

लेखक पथिक यांनी सोमवार, 19/10/2015 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
दीवा बले सारी रात, मेरया जाल्मा दीवा बले सारी रात। बत्तियां बटा रखदी, मेरया जाल्मा दीवा बले सारी रात। आवेंगा तां पुच्छ लवांगी, मेरया जाल्मा कित्थे गुज़ारी सारी रात। बत्तियां बटा रखदी, मेरया जाल्मा दीवा बले सारी रात। आवेंगा तां बुज्झ लवांगी, मेरया जाल्मा कित्थे गुज़ारी सारी रात। दीवा बले सारी रात, मेरया जाल्मा दीवा बले सारी रात। -- दीया रात भर जलता है, ओ मेरे ज़ालिम दीया रात भर जलता है। बत्तियां तैय्यार करा रखती हूं, ओ मेरे ज़ालिम दीया सारी रात जलता है। तू आयगा तो मैं पूछ लूंगी, ओ मेरे ज़ालिम कहां बिताई सारी रात। बत्तियां तैय्यार करा रखती हूं, ओ मेरे ज़ालिम दीया सारी र

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ८ ऋषीकेश दर्शन

लेखक मार्गी यांनी सोमवार, 19/10/2015 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

(तेव्हा तुम्ही कुठे होता?) (बारा ची मती)

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 19/10/2015 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा दिल्लीहून जेट लीमिटेड़ ते उडती म्हणे आय लव्ह काकांची बारामती हे काय आज आमी डोळ्याने पाहीले का भक्तगण असे तोंडावरी पडले ? जेव्हा आलेले हे आपल्या दारी म्हणाले संपवू काका पुतण्यांची जुलुमगिरी थापा मारिल्या जनतेच्या सामोरी दिसू लागली आता ती फेकुगिरी दिले काकाला विकासपुरुषाचे सर्टिफिकेट . सिंचनघोटाळा गेला बँकसीटच्या बासनात म्हणे आमुचे सहिष्णू राजकारण भारतात. पण हे आजच कसे घडले?

नवरात्र जल जागर : माळ सातवी

लेखक नाखु यांनी सोमवार, 19/10/2015 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी...

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 19/10/2015 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे. १. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल : पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले.

अपरिग्रह

लेखक बाजीगर यांनी सोमवार, 19/10/2015 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
मावशी थायलंड ला चाललीस न ,येतांना माझ्यासाठी पेन्सील शार्पनर्स आणायला विसरू नकोस" राजू मावशीला म्हणाला.पलीकडून मावशी म्हणाली "अरे तू सांगायला विसरला असतास तरी मी आणायचे ठरवलेच आहे, कारण स्टेशनरी मध्ये पेन्सील शार्पनर्स बघीतली कि आम्हाला तूच आठवतोस .किचन म्हधून आई कौतुकाने ऐकत होती. राजूचा पेन्सील शार्पनर्स चा संग्रह प्रचंडच वाढला होता.वेगवेगळ्या रंगांचा ,आकारांचा हा संग्रह पाहून घरात येणारे इम्प्रेस होत ,मग राजूची कॉलर टाइट.रोज ती ढीगभर पेन्सील शार्पनर्स राजू पुसून ठेवायचा आणि शाळेतून आला कि आधी त्या कॉर्नरवर एक नजर टाकणार, जर एक हि वस्तू एकद्च तिकडे झाली कि त्याला कळायचे मग राजूचा त्रागा आण

उंबरखिंड

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 19/10/2015 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!! "नेमेची येतो " म्हणत म्हणत पावसाने या वर्षी टांग दिली आणि पावसाळी ट्रेक करण्याचे आमचे स्वप्न हवेतच विरले .आता पावसाळी नाही तर निदान हिवाळी ट्रेक करूया असे म्हणून मागच्या विकांताला ट्रेक करायचे ठरले.चंदन-वंदन की उंबरखिंड यावर चर्चा चालू होती. पण कल्याण डोंबिवलीहुन काही जण येणार होते आणि ट्रेक वन डे करायचा होता त्यामुळे उंबरखिंड ने बाजी मारली . मी हा ट्रेक आधी खोपोली ते लोणावळा असा उलट दिशेने केला होता. पण त्याला खूप वर्षे झाली होती आणि वाट धुसर आठवत होती. शिवाय आम्ही मध्ये कुठेतरी एक रात्र मुक्काम केला होता व दुसऱ्या दिवशी नागफणी बघुन लोणावळ्याला आलो होतो.

राजकारण

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी सोमवार, 19/10/2015 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
"सोसायटीचे सेक्रेटरी" "होय" "कॉर्पोरेशन निवडणुकीचा फ़ॉर्म भरलाय?" "होय"! "मी भीमराव बाजूची झोपडपट्टी माझ्या ताब्यात असती " "बरं मग?" "मागच्या टायमाला बायको कॉर्पोरेटर हुति !" "माहीत आहे !" "या टायमाला मी फ़ॉर्म भरलाय !" "पुढं ?" "या ब्यागेत पांच पेटी हायंत !" "चालायला लागा !" " जादा पायजेत?" " लोकांनी उभं केलंय मला !मी उमेदवारी परत नाही घेणार!" "हे बगा हे पांच ठिवा." "५००मतं फीक्‍स आहेत, सोसायटीतली ,तुम्ही चालायला लागा " "तुमच्या शेजारच्या सोसायटीतल्या पाटलानं बी फॉर्म भरलाय न्हवं?" "अं ?

कास पठार आणि वजराई धबधबा...

लेखक शब्दबम्बाळ यांनी रविवार, 18/10/2015 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
वेळेच्या अभावी सगळेच सविस्तर लिहिणे शक्य झाले नाही त्यामुळे थोडक्यात वर्णन केले आहे. मागच्या महिन्यात कासला जाउन आलो. तिथे काढलेले काही फोटो इथे प्रकाशित करत आहे...