Skip to main content

परीकथा भाग ४ - (फेसबूक स्टेटस १.६ ते १.७ वर्षे)

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 26/10/2015 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
. ३० सप्टेंबर २०१५ पापा ! ते सुद्धा पा पा पा पा नाही तर सुस्पष्ट आणि खणखणीत पापा .. ते सुद्धा मम्मा बोलायच्याही आधी आधी.. फिलिंग शब्द, इमॉटिकॉन्स आणि स्मायलींच्या पलीकडले :) . . २ ऑक्टोबर २०१५ वीज चमकते तेव्हा आधी प्रकाश दिसतो, मग थोड्यावेळाने आवाज ऐकू येतो. हेच सायन्स वापरून आम्ही ब्रश केल्यावर चूळ भरतो. आधी शांतपणे ग्लासातले पाणी पिऊन घेतो, मग फुर्रर करून आवाज काढतो. वीज काही आपल्या डोक्यावर कोसळत नाही, आणि आमच्या तोंडातले पाणी काही बेसिनमध्ये पडत नाही :) . . ५ ऑक्टोबर २०१५ मोठी माणसं विनोद करतात, लहान मुलं विनोद घडवतात. शनिवारी परीबरोबर तिच्या आजोळी चाललो होतो.

माळी पुनेव

लेखक ऊध्दव गावंडे यांनी सोमवार, 26/10/2015 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
माळी पुनेव! माळी पुनेवचा चंद्र जशी पन्हावली गाय धारा लागल्या दुधाच्या भिजते धरनी माय चांदन्याचं वावरातं डोले पीक हिर्वं गारं पाना पानाऊनं झरे गोळं अमृताची धारं कन्सा कन्सा वरं झाली चांदन्याची आबादानी कन्सातला दाना कसा हासे तान्ह्या पोरा वानी नयतुर्न्या पोरी वानी चंद्र हरखूनं जाये वायत्या पान्यातं नदीच्या रूपं निरखूनं पाये धुंद झाली चांदन्यानं मैना फूगळी धरते धरनीच्या मळक्यातं रई गर्गरं फिरते

पाण्याचे जगने

लेखक आनंद कांबीकर यांनी सोमवार, 26/10/2015 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
आवडत नाही त्यास तुंबायला गुरफटुन सडायला जरी गटारात, आवडते वहायला जळमट सोडून पुढे पळायला छंदच त्याचा पळायचा झाडाच्या बुंध्याशि खेळायचा खेळहि त्याचे न्यारे अडमुठ ढेकळांना घुसळायाचे खडकांना पाझर फोडायाचे ताकत तेच्यात कोमा ला झाड तर ताड़ा माडाला मातीमोल करायची ते मुक्त आहे, मोफत आहे पर आपण त्यास बांध घालतो अन बाटलित भरतो तरी ते कुणावर ही रुसत नाही या खिशातून त्या खिशात घुसत नाही

महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 26/10/2015 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते. 1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही. 2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला. 3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले. 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. 5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली. 6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे. 7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला. 8.

स्वागत दीपावलीचे...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 26/10/2015 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
. . a सांज ती तेजाळलेली हासली लाजून वदली डोंगराच्या पायथ्याशी उजळला अंधार आहे चंद्र सजला चांदण्याने मुग्ध सारी रात्र झाली छेडलेला राग कोमल धुंद तो गंधार आहे मेघतोरण बांधलेले, स्वागता आकाश नटले नभधरेच्या संगमाचा आगळा शृंगार आहे वृक्षगर्भी दाटलेले ओज ओसंडून न्हाले या धरेने अन नभाने गायला मल्हार आहे देखणी ती

ये 'रेषेवरची अक्षरे' क्या हय?

लेखक रेषेवरची अक्षरे यांनी सोमवार, 26/10/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
'रेषेवरची अक्षरे' हे नाव इंटरनेटवरच्या जुन्याजाणत्यांना तसं ओळखीचं आहे. तशी अगदी नावागावापासून सुरुवात करायला नको आहे. पण झालं काय, की मधल्या काळात आम्ही घेतला होता थोडा ब्रेक. त्या दिवसांत अनेक नव्या वाचका-लेखकांची भर इथे पडली आहे. त्यांच्यासाठी हा कोराकरकरीत इंट्रो. :) तर - इंटरनेटवर मराठीतून लिहिण्याची सोय होऊन, फ्याशन येऊन आणि त्याचा पायंडा पडूनही आता बर्‍यापैकी वर्षं लोटली. आधी ब्लॉग्स जोरात होते, मग मराठी संस्थळं येऊन स्थिरावली, लोक हळूहळू फेसबुकावर रमले आणि आता फेसबुकही स्थिरावून व्हॉट्सॅपकडे असूयेनं बघायला लागलंय.

जाह्नवे! येशिल बाळंतून?

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 26/10/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
. . (प्रेरणा :- पाखरा! येशिल का परतून?) जाह्नवे! येशिल बाळंतून? महत्प्रयासाने, किती मास झाले ते अठवून? जाह्नवे! ||१|| सेटवर मिसळलेल्या श्रीच्या निःश्वासा वळखून? जाह्नवे! ||२|| टाळशील अजून किती दिवस 'काहीही हं' म्हणून? जाह्नवे! ||३|| थांब, मोजू दे एपिसोड हे झाले किति पाहून! जाह्नवे! ||४|| टीव्ही उघडता मज दिसे ही डोहाळ्याची खूण! जाह्नवे!