Skip to main content

आई.........

लेखक एकप्रवासी यांनी मंगळवार, 27/10/2015 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
पावसात भिजली लाकड जमवत होती आई काम अर्ध सोडून, घरात शिरली घाई घाई शाळेतून भिजून आल तिचं बाळ, दारात उभी होती दुर्लक्ष करून तो निघून गेला, जशी ती कोणी नव्हती दिलं दफ्तर फेकून त्याने, जेवायला वाढ म्हणाला करपलेली भाकरी त्याने फेकून दिली बाजूला काही जमत का तुला? चवच नाही हाताला ताट भिरकाउन बोलला, नाही जेवायचं मला गेला पावसात खेळायला, नाही वाटली फिकीर त्याला सांडलेले जेवण शांतपणे आई लागली उचलायला रात्री झोपताना अंग त्याचं तापू लागलं सकाळी डोक्यावर पट्टी बघून आश्चर्य त्याला वाटलं शाळेला उशीर झालाय, काय बनवलं डब्याला?

स्थापत्य- एक कला भाग २

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 27/10/2015 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग लिहील्यानंतर बर्‍याच लोकांनी अकॅडेमिक नको म्हणून सांगितलं. तरीही काही मूलभूत संकल्पना ठाऊक असणं आवश्यक आहे असं म्हणून अट्टहास करतोय. मात्र जोकरच्या झोपडपट्टी लेखातला १२०० स्क्वेफु चा मुद्दा (कुणी तरी इथं लिंक अपडेट करावी अशी विनंती) ऐरणीवर आल्यानंतर तदनुषंगिक मुद्दे आणि संकल्पना मांडावेत असं वाटलं म्हणून ते लिहीत आहे. थोडं विस्कळीत होतंय पण पुन्हा गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न होईल. किंवा कदाचित .... बघू ओ पुढचं पुढं! -------------- प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपलं स्वतःचं हक्काचं घर. 'माझं एक टुमदार दुमजली छानसं घर असावं' अशी अपेक्षा माणूस करत असतो.

रिकोटा लेमन केक

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 27/10/2015 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरती पाकृ विभागाचे उद्घाटन मी गुलखंडाच्या रेसिपीने केले आणि आता ही माझी शतकी पाकृही डेझर्टची च देते. चीज केकच्या अनेकानेक रेसिप्या आहेत त्यातील ही एक तुम्हाला माहिती आहेच. चीजकेक म्हणजे कॅलरीबाँब! पण सणासुदीच्या उत्सवी दिवसात एखादेवेळी चालतात असे पदार्थ.. तर हा केक करण्यासाठी- साहित्य- ५०० ग्राम रिकोटा चीज १ मध्यम लिंबू (ऑरगॅनिक) लिंबू आदल्या दिवशी फ्रिजरमध्ये ठवून द्या कारण आपल्याला त्याची किसलेली साल हवी आहे.

हवे आहेत - श्रीपतराव शिंदे व श्री. डिकास्टा

लेखक अन्या दातार यांनी मंगळवार, 27/10/2015 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
. . सिंहासन - १९७९ sinhasan मराठी चित्रपटसृष्टीला वेगळं परिमाण देणार्‍या चित्रपटांची यादी करायची झाल्यास 'सिंहासन'ला कुणीच वगळू शकणार नाही.

रक्त पिपासू

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 27/10/2015 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
१९६० - ६५ मधले नाशिक आठवले. आता तिथेच काय, पण इतर शहरात देखील बहुदा, ढेकूण औषधाला देखील सापडत नसावेत. चांगलेच आहे म्हणा! पण साधारण दोन वर्षापूर्वी अमेरिकेत देखील ढेकणाचा (गावाचे नाव आठवत नाही) सुळसुळाट झाल्याची बातमी वाचली होती. म्हणजे काय, हे चिवट प्राणी कुठेना कुठे दबून रहात आपले रक्त शोषण करीत असतात. त्यां बोचऱ्या आठवणीसाठी शांता शेळके ह्यांची क्षमा मागून, एका गोड गीताचे विडंबन देत आहे.
काव्यरस

चौदहवी कि रात

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 27/10/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चौदहवी कि रात १९९२ साल आठ ऑक्टोबर सकाळ एक तरुण युगुल आदल्या दिवशी (०७ ऑक्टोबर १९९२) लग्न झालेलं. अत्यंत उत्साहात आणी आनंदात मुलुंडहून बसने मरोळपर्यंत आणी त्यापुढे रिक्षाने सांताक्रूझ विमानतळावर सकाळी १० च्या मुंबई कोईम्बतूर विमानाने निघाले. विमान १२ ला कोईम्बतूर ला पोहोचले. विमानातील एक मध्यमवयीन गृहस्थाने विचारले तुम्ही उटी ला जात आहात? ते हो म्हणाले. असेच एक दुसरे नाव परिणीत जोडपे त्यानाही त्याने विचारले. तो उटीच्या एका हॉटेलचा मालक होता त्याला उटीला जायचे होते. दोन जोडपी आणी तो असे पाच जण माणशी ५० रुपये देऊन मारुती व्हान ने निघाले.

द गडू शेट द गडू शेट ......:)

लेखक दमामि यांनी मंगळवार, 27/10/2015 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
द गडू शेट द गडू शेट भरले का हो तुमचे पेट? तुम्ही म्हणे उडवून लावता भल्या भल्यांचे जम्बो जेट? इकडून सूड तिकडून अभ्या बॅट्या टक्या किसन प्यारे उचकायाचा मामिला उगा का रे लावता नेट? व्यासपीठ हे विरंगुळ्याचे मामू , मामे, फरक काय? पदर खोचून उभा/भी आहे तुमच्या समोर मामि थेट.:) काय सांगू कस्सं सांगू खरं काय खोटं काय कधी तरी कुठेतरी कट्ट्यामध्ये होइल भेट. ( ट ला ट लावून पाडलेली कविता:))
काव्यरस

लॉटरी

लेखक सायकलस्वार यांनी मंगळवार, 27/10/2015 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रेकफास्ट आणि लंचच्या मधलीच वेळ असल्यामुळे कॅफेटेरिया तसा मोकळाच होता. एका कोपर्‍यात अमोल आणि प्रितेश समोर कॉफीचे रिकामे कप घेऊन टाईमपास करत बसले होते. दोघांनाही डेस्कवर परतायची घाई नव्हती. अमोल बेंचवर होता म्हणून आणि प्रितेशला तशीही काम करण्याची फारशी हौस नसे म्हणून. तेवढ्यात दोघांना समीर कॉफी घेऊन त्यांच्याच दिशेने येताना दिसला. 'काय रे भाऊ. लई बिझी झाला आजकाल. दिसत नाही कुठे तो?' अमोलने काहीतरी बोलायचे म्हणून उगीचच विचारले. खरे तर दिवसातले अकरा तास सगळे एकाच फ्लोअरवर एकमेकांसमोर असत. 'नाही रे बिझी कसला! चाललंय नेहमीसारखंच' कॉफी टेबलावर ठेवून एक खुर्ची खेचत समीर म्हणाला.

बालपण

लेखक एकप्रवासी यांनी सोमवार, 26/10/2015 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी जाऊया आपल्या गावी, आठवणींनी भिजलेल्या वाटा धुंडाळत लपंडाव, विटी दांडू, सागरगोटीचे खेळ खेळत, आंबा फणसाच्या, चिंच आवळ्याच्या झाडात आपलं बालपण शोधत, कधीतरी जाऊया आपल्या गावी………… हिरवळीत जीर्ण झाडात लपलेली आपली शाळा शोधत, खेळाचे मैदान, शाळेची घंटा, फळ्यावरचे सुविचार वाचत, आपला वर्ग, आपली जागा, रंग उडालेला फळा अंधुक झालेल्या आठवणीत आपले सवंगडी शोधत, कधीतरी जाऊया आपल्या गावी…………